एक्स्प्लोर

संभाजीनगर दरोडा प्रकरणात मोठी अपडेट! एन्काउंटर झालेल्या आरोपीनेच पहिली गोळी झाडली; मैत्रिणीच्या जबाबातून धक्कादायक माहिती उघड

Chhatrapati Sambhajinagar Crime : छत्रपती संभाजीनगर येथील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरी सर्वात मोठा दरोडा टाकण्यात आलेला होता. या प्रकरणातील आरोपी अमोल खोतकरचा एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला होता.

Chhatrapati Sambhajinagar Crime : छत्रपती संभाजीनगरच्या वाळूजमधील उद्योजक संतोष लड्डा (Santosh Ladda) यांच्या निवासस्थानी काही दिवसांपूर्वी मोठा दरोडा पडला होता. आता या प्रकरणात एक अत्यंत महत्त्वाचा खुलासा झाला आहे. एन्काउंटरमध्ये ठार झालेल्या मुख्य आरोपी अमोल खोतकरनेच पोलिसांवर पहिली गोळी झाडल्याचा जबाब त्याच्या मैत्रीणीने दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. 

एन्काउंटरच्या वेळी अमोल खोतकरच्या गाडीत त्याची मैत्रीण खुशी शेख देखील उपस्थित होती. ती या घटनेची प्रत्यक्षदर्शी असून, तिचा जबाब आता पोलिसांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. यामुळे पोलिसांना त्यांच्या कारवाईसाठी क्लीनचिट मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

खुशी शेखचा ताबा देण्यासाठी पोलिसांचे सीआयडीला पत्र

तसेच उद्योजक लड्डा दरोडा प्रकरणात चोरी गेलेल्या सोन्यापैकी अजूनही 5 किलो सोन मिळालेलं नाही. केवळ 60 तोळेच सोन हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. अमोल खोतकरच्या एन्काऊंटरचा तपास सीआयडी करत असून त्याची मैत्रीण खुशी शेख ही प्रत्यक्षदर्शी आहे. त्यामुळे ती सीआयडीच्या ताब्यात आहे. तर खुशी शेखचा ताबा देण्यासाठी पोलिसांनी आता सीआयडीला पत्र पाठवले आहे. चोरीनंतर पुढचे काही दिवस आणि एन्काऊंटरवेळी अमोल खोतकरची मैत्रीण खुशी शेख ही त्याच्यासोबत होती. तर उर्वरित 5 किलो सोन्याचा तपास लावण्यासाठी खुशीची चौकशी करायची असल्याने पोलिसांकडे तिचा ताबा मिळावा, यासाठी सीआयडीला पत्र पाठवण्यात आले आहे.  

नेमकं प्रकरण काय? 

उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरी 14 मे रोजी मध्यरात्री दरोडा टाकण्यात आला होता. या दरोड्यात साडेपाच किलो सोनं 32 किलो चांदी आणि 70 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला होता. पोलिसांकडून 15 तारखेला सकाळपासून या गुन्ह्याचा तपास सुरू होता. सुरुवातीला पोलिसांनी वॉचमन असलेल्या व्यक्तीला ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी सुरू केली. तब्बल 10 दिवस या प्रकरणात एकही आरोपीला अटक झालेली नव्हती. यानंतर या प्रकरणात 16 जणांना अटक करण्यात आली. तर मुख्य आरोपी अमोल खोतकर हा फरार होता. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवले होते. यावेळी अमोलकडून पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न झाला. गाडी घालून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपी अमोल याच्यावर पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात अमोल खोतकर हा जागीच ठार झाला होता. आता या प्रकरणात आता एक नवा खुलासा झाला आहे. एन्काउंटरमध्ये ठार झालेल्या मुख्य आरोपी अमोल खोतकरनेच पोलिसांवर पहिली गोळी झाडल्याचा जबाब त्याच्या मैत्रीणीने दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.  

आणखी वाचा 

Chhatrapati Sambhaji Nagar crime: छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांकडून गुन्हेगाराचा एन्काऊंटर, वडगाव-कोल्हाटीत मध्यरात्री धडाधड फायरिंग अन्...

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog: मुंबईच्या बीडीडी चाळीतील वृद्ध डिजिटल अरेस्टचा बळी, 75 लाख गमावले
Maharashtra Live blog: मुंबईच्या बीडीडी चाळीतील वृद्ध डिजिटल अरेस्टचा बळी, 75 लाख गमावले
कृषी समृद्धी योजनेला मंजुरी, शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान मिळणार, 5668 कोटी मंजूर : दत्तात्रय भरणे
कृषी समृद्धी योजनेतून शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान : दत्तात्रय भरणे
Asia Cup : आशिया कप ट्रॉफीसाठी बीसीसीआयचं मोठं पाऊल, आयसीसीच्या बैठकीत मुद्दा मांडला, अखेर काय ठरलं?
आशिया कप साठी बीसीसीआयचं मोठं पाऊल, ICC च्या बैठकीत मुद्दा मांडला, काय घडलं? 
Rahul Gandhi on Parth Pawar : मतचोरी करुन बनलेल्या सरकारची जमीन चोरी, मोदीजी तुमचं शांत राहणं खूप काही सांगतं, पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणी राहुल गांधींचा हल्लाबोल
पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरण, राहुल गांधींचा राज्य सरकारवर हल्लाबोल अन् थेट मोदींना सवाल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pawar Land Scam: 'माझा त्या गोष्टीशी संबंध नाही', जमीन घोटाळ्यावर Ajit Pawar यांचे स्पष्टीकरण
Pune Land Scam: 'कोणीही दोषी आढळला तरी कारवाई होईल', मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट इशारा
Pune Land Scam: '…या प्रकरणी कारवाई केली जाईल', पोलीस आयुक्त Amitesh Kumar यांचा इशारा
Parth Pawar Land Scam:: रद्द केला व्यवहार, वाचणार पार्थ पवार? Special Report
Lonar Lake : लोणारच्या खाऱ्या पाण्यात चक्क मासे, पर्यावरणाला मोठा धोका Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog: मुंबईच्या बीडीडी चाळीतील वृद्ध डिजिटल अरेस्टचा बळी, 75 लाख गमावले
Maharashtra Live blog: मुंबईच्या बीडीडी चाळीतील वृद्ध डिजिटल अरेस्टचा बळी, 75 लाख गमावले
कृषी समृद्धी योजनेला मंजुरी, शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान मिळणार, 5668 कोटी मंजूर : दत्तात्रय भरणे
कृषी समृद्धी योजनेतून शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान : दत्तात्रय भरणे
Asia Cup : आशिया कप ट्रॉफीसाठी बीसीसीआयचं मोठं पाऊल, आयसीसीच्या बैठकीत मुद्दा मांडला, अखेर काय ठरलं?
आशिया कप साठी बीसीसीआयचं मोठं पाऊल, ICC च्या बैठकीत मुद्दा मांडला, काय घडलं? 
Rahul Gandhi on Parth Pawar : मतचोरी करुन बनलेल्या सरकारची जमीन चोरी, मोदीजी तुमचं शांत राहणं खूप काही सांगतं, पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणी राहुल गांधींचा हल्लाबोल
पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरण, राहुल गांधींचा राज्य सरकारवर हल्लाबोल अन् थेट मोदींना सवाल
नितेश राणेंनी पालकमंत्री म्हणून भान ठेवलं पाहिजे; महायुतीवरुन दीपक केसरकरांचा राणेंना घरचा अहेर
नितेश राणेंनी पालकमंत्री म्हणून भान ठेवलं पाहिजे; महायुतीवरुन दीपक केसरकरांचा राणेंना घरचा अहेर
शरद पवारांच्या खासदारकीची गोपीचंद पडळकरांना चिंता; म्हणाले, 10 आमदारांवर राज्यसभेत कसं जाणार?
शरद पवारांच्या खासदारकीची गोपीचंद पडळकरांना चिंता; म्हणाले, 10 आमदारांवर राज्यसभेत कसं जाणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 नोव्हेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 नोव्हेंबर 2025 | शुक्रवार
मोठी बातमी! अखेर पुण्यातील जमिनीचा व्यवहार रद्द, अजित पवारांनी दिली माहिती; कुणाचे फोन आले, कुणी मदत केली सर्व चौकशी होणार
मोठी बातमी! अखेर पुण्यातील जमिनीचा व्यवहार रद्द, अजित पवारांनी दिली माहिती; कुणाचे फोन आले, कुणी मदत केली सर्व चौकशी होणार
Embed widget