एक्स्प्लोर

कलेक्टर सकाळीच पायऱ्यावर येऊन बसले; 10 वाजेपर्यंत केवळ 3 कर्मचारी हजर, 30 जणांची पगारकपात

छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सरकारी कार्यालयातील लेट लथीपांची चांगलीच हजेरी घेतल्याचं पाहायला मिळालं.

छ. संभाजीनगर : सरकारी काम अन् 6 महिने थांब अशी म्हणत प्रचलित आहे. कारण, सरकारी कर्मचाऱ्यांकडून लाल फितीत कामे अडकवून ठेवण्याची पद्धत सर्रासपणे नागरिकांना त्रासदायक ठरते. अनेकदा कार्यालयीन वेळा न पाळणे, कार्यालयात वेळेत न येणे आणि लवकरच निघून जाण्याचे प्रकार घडतात. काही दिवसांपूर्वीच पिंपरी चिंचवडमधील महापालिकेत अधिकारी वेळेत न पोहोचल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. सकाळी 10 वाजता कार्यालयीन वेळेत पोहोचणे सरकारी कर्मचाऱ्यांना बंधनकारक असते. मात्र, आपल्याला कोण विचारतंय अशा अविर्भावात हे कर्मचारी वागतात. पण, (Sambhajinagar) छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी (Collector) आज उशिरा येणार्‍या कर्मचाऱ्यांचा स्वत: क्लास घेतला. चक्क हाती हेजरी रजिस्टर बुक घेऊन कलेक्टर साहेब स्वत: तहसील कार्यालयाच्या पायरीवर बसले होते. त्यांचा हा व्हिडिओ (Viral video) चांगलाच व्हायरल झाला आहे. 

छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सरकारी कार्यालयातील लेट लथीपांची चांगलीच हजेरी घेतल्याचं पाहायला मिळालं. फुलंब्री येथील तहसील कार्यालयाच्या पायरीवर चक्क जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी खुर्चीवर बसून कर्मचाऱ्यांची हजेरी घेतली. यावेळी, सकाळी 10 वाजेपर्यंत केवळ तीनच कर्मचारी आले होते. त्यामुळे जोपर्यंत पूर्ण कर्मचारी येत नाहीत, तोपर्यंत हजेरी मस्टर घेऊन जिल्हाधिकारी  स्वतःच  पायऱ्यांवर बसले होते. पंचायत समिती अंतर्गत 40 कर्मचाऱ्यापैकी 10 कर्मचाऱ्यांची सकाळी दहा वाजता कार्यालयात उपस्थिती होती. तर भूमी अभिलेख, सहाय्यक निबंधक, पुरवठा विभाग, दारूबंदी विभाग, कृषी विभाग, या कार्यालयातील मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची गैरहजेरी जिल्हाधिकाऱ्यांच्या मस्टरवर लागली. गैरहजर कर्मचाऱ्यांना एका दिवसाचा पगार कापण्यात येणार असून त्याची नोंद सर्व्हिस बुकमध्ये केली जाणार असल्याचेही यावेळी जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले. तर, यावेळी, फुलंब्री कार्यालयात कामासाठी आलेल्या शेतकरी व नागरिकांशी देखील त्यांनी संवाद साधता त्यांचे गाऱ्हाणे ऐकून घेतले. कलेक्टर महोदयांची ही धाड सरकारी कर्मचाऱ्यांच्या एक दिवसाच्या वेतनकपातीला कारणीभूत ठरली. 

व्हिडिओ झाला व्हायरल

जिल्हाधिकारी महोदयांचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला असून यातून इतर सरकारी कर्मचारी व अधिकाऱ्यांनी धडा घ्यायला हवा, अशी चर्चा सोशल मीडियात होत आहे. तसेच, सरकारी अधिकाऱ्यांबद्दलचा संतापही नागरिकांकडून व्यक्त होत आहे. आता तरी कर्मचाऱ्यांनी वेळेत पोहोचून नागरिकांची कामे मार्गी लावावीत, असाही सूर बोलला जात आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी स्वामी यांनी घेतलेल्या भूमिकेनं प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून अनेक कर्मचाऱ्यांची झोड उडाल्याचं पाहायला मिळालं. 

हेही वाचा

मी तुम्हाला 2 कोटी देते, माझ्या वडिलांना परत आणा; अपघातात वडिल गमावलेली लेक 'एअर इंडिया'वर संतापली

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Chhatrapati Sambhajinagar : सत्ताधारी नगसेवकांच्या अवैध बांधकामावर बुलडोझर कधी? इम्तियाज जलील यांच्या प्रश्नावर मनपा आयुक्तांची सारवासारव
सत्ताधारी नगसेवकांच्या अवैध बांधकामावर बुलडोझर कधी? इम्तियाज जलील यांच्या प्रश्नावर मनपा आयुक्तांची सारवासारव
Chhatrapati Sambhajinagar Crime:  एमआयएमला आणखी एक धक्का; बनावट बोनाफाईडच्या आधारे निवडणूक लढवली; नगरसेवक मेराज खानला अटक, सात जणांविरोधात गुन्हा दाखल
एमआयएमला आणखी एक धक्का; बनावट बोनाफाईडच्या आधारे निवडणूक लढवली; नगरसेवक मेराज खानला अटक, सात जणांविरोधात गुन्हा दाखल
Imtiaz Jaleel : एमआयएम नगरसेवक मतीन पटेलांवरील कारवाईवरून इम्तियाज जलील भडकले; म्हणाले, न्यायाधिशांना हे मान्य आहे का?
एमआयएम नगरसेवक मतीन पटेलांवरील कारवाईवरून इम्तियाज जलील भडकले; म्हणाले, न्यायाधिशांना हे मान्य आहे का?
Nida Khan Home Demolition : मतीन पटेलांना मोठा दणका; जिकडे निदा खानला लपवलं, 'त्या' घरावर चालला पालिकेचा बुलडोझर; घरही जमीनदोस्त; मोठ्या बंदोबस्तात कारवाई
मतीन पटेलांना मोठा दणका; जिकडे निदा खानला लपवलं, 'त्या' घरावर चालला पालिकेचा बुलडोझर; घरही जमीनदोस्त; मोठ्या बंदोबस्तात कारवाई

व्हिडीओ

Petrol Diesel Price Hike : मोठी बातमी, पेट्रोल 3 रुपये तर डिझेल 3.11 रुपयांनी महागलं
Pune Hospital Bomb Case | हॉस्पिटलमध्ये बॉम्ब, सुरक्षेची बोंब | ABP Majha Special Report
Inflation Rate Hike | महागाईचा भडका, धोरणांचा फटका; खापर युद्धावर फोडणं योग्य? | | Special Report
Maharashtra Minsiter On PM Modi Appeal : ईव्ही कार वापरुन अर्थव्यवस्था चार्ज होणार? | Special Report
Politics Over Rahul Gandhi foreign trip : राहुल गांधींचा परदेश दौरा, भाजपचे आरोप | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Petrol and Diesel price hike: महागाईचा भडका! पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी वाढ, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात किती दर?
महागाईचा भडका! पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी वाढ, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Sharad Pawar On Sunil Tatkare And Praful Patel: शरद पवारांकडून सुनील तटकरे आणि प्रफुल पटेलांचं कौतुक; सुनेत्रा पवारांनाही सुचवलं?, म्हणाले, दोन्ही नेते...
शरद पवारांकडून सुनील तटकरे आणि प्रफुल पटेलांचं कौतुक; सुनेत्रा पवारांनाही सुचवलं?, म्हणाले, दोन्ही नेते...
Mumbai Indians : जसप्रीत बुमराह कॅप्टन बनला अन् तिलक वर्माकडून मुंबईला विजयाचा तिलक, पंजाबचा सलग पाचवा पराभव
जसप्रीत बुमराह कॅप्टन बनला अन् तिलक वर्माकडून मुंबईला विजयाचा तिलक, पंजाबचा सलग पाचवा पराभव
Ashok Kharat : अशोक खरात प्रकरणी उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे निलंबित, तब्बल 143 वेळा कॉल, खरातच्या पत्नीच्या नावे गुंतवणूक केल्याचा आरोप
अशोक खरात प्रकरणी उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे निलंबित, तब्बल 143 वेळा कॉल, खरातच्या पत्नीच्या नावे गुंतवणूक केल्याचा आरोप
तुम्ही मुख्यमंत्री असता महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा राहिला असता; प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
तुम्ही मुख्यमंत्री असता महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा राहिला असता; प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
HSRP : एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्यासाठी शेवटची मुदतवाढ, 1 जुलैपासून नियमभंग केल्यास 1 हजार रुपयांचा दंड
एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्यासाठी शेवटची मुदतवाढ, 1 जुलैपासून नियमभंग केल्यास 1 हजार रुपयांचा दंड
मुंबईने तिसऱ्यांदा कर्णधार बदलला, सूर्या-हार्दिक बाहेर, कर्णधार म्हणून Jasprit Bumrahच्या नावाची घोषणा
मुंबईने तिसऱ्यांदा कर्णधार बदलला, सूर्या-हार्दिक बाहेर, कर्णधार म्हणून Jasprit Bumrahच्या नावाची घोषणा
Video: रुपाली चाकणकरांची 6 तास ईडी चौकशी, बाहेर येताच माध्यमांशी बोलल्या; गुवाटही दौऱ्याबाबतही सांगितलं
Video: रुपाली चाकणकरांची 6 तास ईडी चौकशी, बाहेर येताच माध्यमांशी बोलल्या; गुवाटही दौऱ्याबाबतही सांगितलं
Embed widget