एक्स्प्लोर

छ्त्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पहिला तुफान पाऊस, जोरदार वारेही; रिक्षांवर झाडं उन्मळून पडले

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात (Chhatrapati Sambhaji Nagar District) जोरदार पावसाने (Rain) हजेरी लावली आहे.

Chhatrapati Sambhaji Nagar ; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात (Chhatrapati Sambhaji Nagar District) जोरदार पावसाने (Rain) हजेरी लावली आहे. गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरकर उकाड्याने पुरते हैराण झाले होते. मात्र आज पावसाच्या सरी कोसळल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला असून, त्यामुळे संभाजीनगरकर सुखावले आहेत. पावसाने शहरात आणि ग्रामीण भागात देखील हेजरी लाभली आहे. विशेष म्हणजे या वर्षातील हा पहिला पाऊस असून,पहिलाच पाऊस जोरदार झाल्यानं शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केला जात आहे. 


आज (10 जून) रोजी दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार झाले. दरम्यान चार वाजेनंतर ग्रामीण भागात पावसाला सुरवात झाली. ज्यात वैजापूरमध्ये जोरदार पाऊस झाला. तर वैजापूर तालुक्यातील लोणी खुर्द येथेही पावसाने हजेरी लावली. तर सिल्लोडमध्ये देखील जोरदार पाऊस झाल्याचं पाहायला मिळत आहे. पैठण तालुक्यातील अडुळ येथेही जोरदार पाऊस कोसळला. तर छत्रपती संभाजीनगर शहरात देखील पावसाने हजेरी लावली आहे. आज सकाळपासून प्रचंड उकाडा जाणवत होता, मात्र संध्याकाळी पावसाने हजेरी लावल्याने शहरवासीयांना दिलासा मिळाला आहे. तर अनेकांनी पाहिल्याच पावसात भिजण्याचा आंनद घेतला. तर काही ठिकाणी बच्चेकंपनी यांनी देखील पहिल्या पावसाचा मनसोक्त आनंद घेतला.

जोरदार वारा....

आज दुपारपासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जोरदार वारा पाहायला मिळतोय. यामुळे रस्त्यावर सर्वत्र धुळीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर काही ठिकाणी विजेच्या तारा तुटल्याने वीज खंडित झाली आहे. या वाऱ्याचा वेग एवढा होता की, रस्त्यावर दुचाकी चालवणे अशक्य होत होते. तर काही ठिकाणी वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या तुटल्या आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पावसाने देखील हजेरी लावली.

रिक्षांवर झाड कोसळले...

आज दुपारपासून छत्रपती संभाजी नगर मध्ये जोरदार वारा पाहायला मिळाला. दरम्यान रेल्वे स्टेशन परिसरातील वेदांतनगर भागात रस्त्यावर उभ्या असलेल्या दोन रिक्षांवर एक झाड अक्षरशः उन्मळून पडला. तर यात एक मुलगा गंभीर जखमी देखील झाला असल्याचे उपस्थित नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर झाडाखाली फसलेल्या रिक्षा काढण्यासाठी अग्निशमन दलाल माहिती देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

पहिल्याच पावसाची जोरदार बॅटींग...

जून महिना सुरू झाल्यावर पावसाचा अंदाज वर्तवण्यात येतो. सहसा 7 जून पासून पावसाळा सुरू होतो. पण यावेळी पावसाने उशिराच हजेरी लावली. मात्र पहिल्याच पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली. वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.तर काही ठिकाणी गारपीट देखील दिसून आली.

महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगेंकडे पोहोचली चौकशी समिती; 500 कोटींच्या संवादाच्या क्लिपची मागणी, पाटील म्हणाले...
मनोज जरांगेंकडे पोहोचली चौकशी समिती; 500 कोटींच्या संवादाच्या क्लिपची मागणी, पाटील म्हणाले...
पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला
पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला
Maharashtra Vidhan Parishad Result 2026 Winner Candidate List: तब्बल 45 तासांनी विधान परिषदेच्या 5 पैकी 5 जागांचा निकाल जाहीर; सर्व विजयी उमेदवारांची यादी
तब्बल 45 तासांनी विधान परिषदेच्या 5 पैकी 5 जागांचा निकाल जाहीर; सर्व विजयी उमेदवारांची यादी
...अन्यथा पक्षाला आगामी निवडणुकांमध्ये किंमत मोजावी लागू शकते; राष्ट्रवादीच्या पराभवानंतर अमोल मिटकरींची पहिली प्रतिक्रिया
...अन्यथा पक्षाला आगामी निवडणुकांमध्ये किंमत मोजावी लागू शकते; राष्ट्रवादीच्या पराभवानंतर अमोल मिटकरींची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
Gold Silver Rate Hike : अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव, सोने आणि चांदीमध्ये तुफान तेजी,चांदी 7775 रुपयांनी महागली, जाणून घ्या IBJA चे नवे दर
अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव होताच सोने,चांदीच्या दरात तुफान तेजी, जाणून घ्या IBJA चे नवे दर
धर्मरक्षणासाठी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत समर्पित राहणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
सत्तेपेक्षा सिद्धांत मोठा, अधिकारापेक्षा धर्म आणि कर्तव्य श्रेष्ठ! : एकनाथ शिंदे
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
Ravindra Dhangekar on Gokul Election : एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
मोठी बातमी, सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा,75 टक्के अग्निवीरांना 2 वर्षांच्या अतिरिक्त सेवेनंतर संधी मिळणार, केंद्राचा मोठा निर्णय
सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा, केंद्राचा अग्निवीर योजनेत मोठा बदल, अश्विनी वैष्णव यांची माहिती
Embed widget