डेटिंग ॲपवर ओळख, शासकीय ठेकेदाराचा महिलेवर ऑफिसमध्येच बलात्कार; अश्लिल व्हिडीओ-फोटोही काढले
Chhatrapati Sambhaji Nagar Crime News : शासकीय ठेकेदाराने पतीपासून विभक्त झालेल्या 26 वर्षीय महिलेवर ऑफिसमध्येच बलात्कार (Rape) केल्याचा प्रकार समोर आला आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar Crime News : शहरात एक धक्कादायक घटना समोर आली असून, डेटिंग ॲपवर (Dating App) ओळख झालेल्या शासकीय ठेकेदाराने पतीपासून विभक्त झालेल्या 26 वर्षीय महिलेवर ऑफिसमध्येच बलात्कार (Rape) केल्याचा प्रकार समोर आला आहे. सिडको भागातील भोज हॉटेलच्या बाजूला असलेल्या एका ऑफिसमध्ये हा सर्व प्रकार घडला. विशेष म्हणजे यावेळी ठेकेदाराने संबंधित महिलेचे अश्लिल व्हिडीओ-फोटो काढून पुढे ते व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार तिच्यावर अत्याचार केला. अमोल विठ्ठल पाटील (वय 40 वर्ष, रा. टाऊन सेंटर, सिडको) असे आरोपीचे नाव आहे.
पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, फेब्रुवारी 2022 रोजी तिने एका मुस्लीम मुलासोबत लग्न केले होते. परंतु, काही दिवसांतच त्यांच्यात वाद झाल्याने एप्रिल 2022 पासून ती त्याच्यापासून विभक्त एकटीच शहरात राहत आहे. एका खाजगी शिकवणी येथे शिक्षिका म्हणून ती काम करते. दरम्यानच्या काळात तिने डेटिंग ॲपवर खाते उघडले होते. त्यावेळी तिची अमोल पाटील याच्याशी ओळख झाली. तसेच तुझा बायोडाटा घेऊन माझ्या ऑफिसला ये असे पाटीलने पिडीत महिलेला सांगितले. पीडिता बायोडेटा घेऊन त्याच्या ऑफिसला गेली. तेव्हा त्याने माझी पत्नी मला सोडून नाशिकला राहते. मी सध्या आई वडील आणि भावासोबत राहतो. तू मला खूप आवडली असून आपण काही दिवसांनंतर लग्न करू असे म्हटला. तेव्हा तिने त्याला लग्नास नकार दिला. तेव्हा अमोलने तिच्यावर ऑफिसमध्येच बलात्कार करून तिचे फोटो आणि व्हिडीओ तयार केले. कोणाला काही सांगितले तर जगू देणार नाही अशी धमकी दिली. त्याच्या धाकाने तिने पोलिसात तक्रार दिली नव्हती.
महिलेचे अश्लिल फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत पाटील तिच्यावर वारंवार अत्याचार करत होता. नेहमीच्या या अत्याचाराला कंटाळून अखेर महिलेने एमआयडीसी सिडको पोलीस ठाणे गाठून 12 जानेवारीला तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
कारमध्ये अत्याचार
अमोल पाटीलकडे महिलेचे अश्लिल फोटो आणि व्हिडीओ असल्याने तो तिला नेहमी ब्लॅकमिल करून तिच्यावर अत्याचार करायचा. एका दिवशी त्याने पुन्हा फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन फोन करून महिलेला दर्गा भागात बोलावून घेतले. स्वतःच्या कारमध्ये बसवून सायंकाळच्या सुमारास पीडितेला घेऊन आडूळजवळ असलेल्या आडगाव फाटा भागात गाडी झाडामध्ये लावली. तिथे पीडितेने त्याला गाडी का थांबवली, अशी विचारणा केली तेव्हा त्याने कारमध्येच तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर देखील त्याने अनेकवेळा ऑफिसला बोलावून तिला धमकावून वारंवार अत्याचार केले. तसेच बेल्टने मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: