एक्स्प्लोर

एसीबीची संभाजीनगरात मोठी कारवाई, दुय्यम निबंधकाच्या घरात तब्बल 1 कोटी 35 लाखांची कॅश मिळाली

Chhatrapati Sambhaji Nagar Crime : एसीबीच्या पथकाने याबाबतचा पंचनामा केला असून, छगन पाटील याला देखील अटक करण्यात आली आहे. 

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात एसीबीने (ACB) मोठी कारवाई केली असून, दुय्यम निबंधकाला लाच घेतांना रंगेहात पकडले आहेत. धक्कादायक म्हणजे दुय्यम निबंधकाच्या घरात तब्बल 1 कोटी 35 लाखांची कॅश मिळून आल्याने खळबळ उडाली आहे. योगायोग म्हणजे बेकायदेशीर दस्त नोंदणी प्रकरणात या दुय्यम निबंधकाच्या निलंबनाचे आदेश सकाळी सिल्लोड कार्यालयात धडकले, त्याची अंमलबजावणी होण्यापर्वीच लाच घेतांना त्याला रंगेहात पकडण्यात आले. छगन उत्तमराव पाटील (वय 49 वर्ष, रा. छत्रपती संभाजीनगर) असे या अधिकाऱ्याचे नाव असून, तो सिल्लोड येथील नोंदणी कार्यालयात कार्यरत होता. 

अधिक माहितीनुसार, सिल्लोडच्या नोंदणी कार्यालयात दुय्यम निबंधक म्हणून छगन उत्तमराव पाटील कार्यरत आहेत. दरम्यान, सिल्लोड तालुक्यातील आमठाना येथील तक्रारदार व त्यांची भावजयी यांची धावडा शिवारातील गट क्रमांक 47/1 मध्ये सामाईक शेती आहे. या शेतीचा दस्त तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावे करण्यासाठी अर्ज करण्यात आला होता. मात्र दुय्यम निबंधक छगन पाटील याने 5 हजारांची मागणी केली. परंतु तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यामुळे एसीबीच्या पथकाने 1 मार्च रोजी दुपारी दुय्यम निबंधक कार्यालयातच सापळा लावला. यावेळी तक्रारदाराकडून 5 हजार रुपयाची लाच घेण्यात आली. या प्रकरणी छगन पाटील आणि स्टॅम्प वेंडर भीमराव किसन खरात या दोघांना रंगेहात पकडण्यात आले आहे.

घरात तब्बल 1 कोटी 35 लाखांची कॅश....

सिल्लोडच्या नोंदणी कार्यालयात दुय्यम निबंधक म्हणून कार्यरत असलेल्या छगन पाटील याला लाच घेतांना पकडण्यात आल्यावर, एसीबीच्या पथकाने तात्काळ त्याच्या घरावर छापेमारी केली. यावेळी कारवाईसाठी गेलेल्या पथकाला देखील धक्का बसला. कारण पाटील यांच्या घरात तब्बल 1 कोटी 35 लाखांची कॅश पथकाला मिळून आली आहे. पथकाने याबाबतचा पंचनामा केला असून, छगन पाटील यांना देखील अटक करण्यात आली आहे.
एसीबीची संभाजीनगरात मोठी कारवाई, दुय्यम निबंधकाच्या घरात तब्बल 1 कोटी 35 लाखांची कॅश मिळाली

लाच लुचपत विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, "सापळा कारवाईनंतर तात्काळ आरोपी लोकसेवक छगन उत्तमराव पाटील यांच्या छत्रपती संभाजीनगर शहरातील हिमायतबाग परिसरातील प्लॉट नं. 30  येथे राहत्या घराची झडती घेतली असता घरझडती दरम्यान खालील प्रमाणे स्थावर व जंगम मालमत्ता मिळून आली आहे.

  • रोख रक्कम रुपये 1,36,77,400 रुपये (एक कोटी, छत्तीस लाख, सत्त्यात्तर हजार, चारशे रुपये)
  • सोने 28 तोळे, अंदाजे किमंत 14,18,925 रुपये (चौदा लक्ष, अठरा हजार, नऊशे पंचवीस रुपये)
  • विविध ठिकाणी स्थावर मालमत्ताबाबत कागदपत्रे.
  • विविध बँकामध्ये मुदत ठेवी.
  • एक चारचाकी वाहन, एक दुचाकी स्पोर्टस मोटारसायकल.

सकाळी निलंबनाचे आदेश, दुपारी लाच घेतांना अटक 

सिल्लोड नोंदणी कार्यालयाची नोंदणी विभागाने अंतर्गत तपासणी केली. त्यावेळी 7 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2023 या काळात तुकडेबंदी कायद्याचे उलंघन करून तब्बल 44 दस्तांची नोंदणी करण्यात आल्याचे समोर आले. यातील 42 दस्तांमध्ये मुल्यांकन कमी करून दस्तांची नोंदणी करीत 48 लाख 6 हजार 273 रुपयांचा शासनाचा महसूल बुडाल्याचे निदर्शनास आले. अशा प्रकारे एकूण 86 दस्तांमध्ये नोंदणी नियमांचा भंग केल्याचा ठपका चौकशी पथकाने पाटील याच्यावर ठेवला आहे. या चौकशी अहवालावरून 29  फेब्रुवारी 2024 रोजी पाटील यांना निलंबीत करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. विशेष म्हणजे निलंबनाचे आदेश सकाळी सिल्लोड कार्यालयात धडकले, त्याची अंमलबजावणी होण्यापर्वीच लाच घेतांना पाटील याला रंगेहात पकडण्यात आले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

शिंदे गटाच्या मंत्र्यांवर एमआयडीसी भूखंड घोटाळ्याचा आरोप; काय आहे नेमकं प्रकरण?

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

रिॲलिटी चेक - आदित्य ठाकरेंनी दाखवली 38 मतदारांची यादी, त्या खोलीत आता कुणीही राहात नाही
रिॲलिटी चेक - आदित्य ठाकरेंनी दाखवली 38 मतदारांची यादी, त्या खोलीत आता कुणीही राहात नाही
जळगावमध्ये एसटी बसचा भीषण अपघात, एका महिलेचा जागीच मृत्यू, टायर फुटल्याने झाल अपघात 
जळगावमध्ये एसटी बसचा भीषण अपघात, एका महिलेचा जागीच मृत्यू, टायर फुटल्याने झाल अपघात 
जाऊ दे रे गाडी... मुंबईकरांच्या सेवेत 150 बेस्ट बस; 21 मार्गावर धावणार लाल परी, 1.9 लाख प्रवाशांना सवारी
जाऊ दे रे गाडी... मुंबईकरांच्या सेवेत 150 बेस्ट बस; 21 मार्गावर धावणार लाल परी, 1.9 लाख प्रवाशांना सवारी
Gold Silver Rate Update : गुड न्यूज, 24 तासांत सोन्याच्या दरात मोठी घसरण; तर चांदी सहा हजारांनी स्वस्त, जाणून घ्या आजचे नवे दर 
गुड न्यूज, 24 तासांत सोन्याच्या दरात मोठी घसरण; तर चांदी सहा हजारांनी स्वस्त, जाणून घ्या आजचे नवे दर 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sushma Andhare vs Nimbalkar : मी कुणाला भीक घालत नाही, सुषमा अंधारेंचा Nimbalkar यांना थेट इशारा
Cabinet Review : 'शिवसेनेच्या मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेतला जाणार', Eknath Shinde ॲक्शन मोडमध्ये
Phaltan Doctor Case : माझ्या मुलीनं जीवन संपवलं नाही, तिची हत्याच!; वडिलांचा गंभीर आरोप
Suresh Dhas : फलटण महिला डॉक्टर प्रकरणी राजकारण नको, SIT चौकशी करा; धस यांची मागणी
Maharashtra Superfast News : 28 OCT 2025 : सुपरफास्ट बातम्या : ABP Majha

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रिॲलिटी चेक - आदित्य ठाकरेंनी दाखवली 38 मतदारांची यादी, त्या खोलीत आता कुणीही राहात नाही
रिॲलिटी चेक - आदित्य ठाकरेंनी दाखवली 38 मतदारांची यादी, त्या खोलीत आता कुणीही राहात नाही
जळगावमध्ये एसटी बसचा भीषण अपघात, एका महिलेचा जागीच मृत्यू, टायर फुटल्याने झाल अपघात 
जळगावमध्ये एसटी बसचा भीषण अपघात, एका महिलेचा जागीच मृत्यू, टायर फुटल्याने झाल अपघात 
जाऊ दे रे गाडी... मुंबईकरांच्या सेवेत 150 बेस्ट बस; 21 मार्गावर धावणार लाल परी, 1.9 लाख प्रवाशांना सवारी
जाऊ दे रे गाडी... मुंबईकरांच्या सेवेत 150 बेस्ट बस; 21 मार्गावर धावणार लाल परी, 1.9 लाख प्रवाशांना सवारी
Gold Silver Rate Update : गुड न्यूज, 24 तासांत सोन्याच्या दरात मोठी घसरण; तर चांदी सहा हजारांनी स्वस्त, जाणून घ्या आजचे नवे दर 
गुड न्यूज, 24 तासांत सोन्याच्या दरात मोठी घसरण; तर चांदी सहा हजारांनी स्वस्त, जाणून घ्या आजचे नवे दर 
आदित्यने पप्पू असल्याचं प्रदर्शन करू नये, मुख्यमंत्र्यांची ठाकरेंवर बोचरी टीका, रोहित पवारांनाही इशारा
आदित्यने पप्पू असल्याचं प्रदर्शन करू नये, मुख्यमंत्र्यांची ठाकरेंवर बोचरी टीका, रोहित पवारांनाही इशारा
Amazon Layoffs :  आता अमेझॉनमध्ये लेऑफ्सचं वारं, 14000 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार, कारण समोर
आता अमेझॉनमध्ये लेऑफ्सचं वारं, 14000 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार, कारण समोर
Nashik Crime Prakash Londhe: प्रकाश लोंढे टोळीला मोठा दणका; नाशिक पोलिसांकडून थेट मकोका अंतर्गत कारवाई
प्रकाश लोंढे टोळीला मोठा दणका; नाशिक पोलिसांकडून थेट मकोका अंतर्गत कारवाई
मल्टीप्लेक्सचे तिकीट दर 100 ते 150 करा, चित्रपट संघटनेची मंत्रालयात बैठक; सकारात्मक चर्चा
मल्टीप्लेक्सचे तिकीट दर 100 ते 150 करा, चित्रपट संघटनेची मंत्रालयात बैठक; सकारात्मक चर्चा
Embed widget