एक्स्प्लोर

'सरकार आपल्या दारी' योजनेची भाजप आमदाराकडून पोलखोल; फाईल मंजूर होत नसल्याने 'आमदार प्रशासनाच्या दारी' आंदोलन

Chhatrapati Sambhaji Nagar : फाईल शासकीय कार्यालयात धुळखात पडून असल्याने आमदार बागडे यांनी 'आमदार प्रशासनाच्या दारी' आंदोलन केलं.

Chhatrapati Sambhaji Nagar News : शिंदे-फडणवीस सरकारकडून मोठा गाजावाजा करत 'शासन आपल्या दारी' (Shasan Aplya Dari) हे अभियान राबवले जात आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात या अभियानाअंतर्गत कार्यक्रम घेतले जात आहे. एवढेच नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडून 'शासन आपल्या दारी' योजनाच्या सभा राज्यातील वेगवेगळ्या भागात घेतल्या जात आहेत. मात्र भाजपच्याच (BJP) एका आमदाराने 'शासन आपल्या दारी' योजनेची पोलखोल केली असून, शासकीय योजनांसाठी नागरिकांना कशा खेट्या माराव्या लागतात हे समोर आणले आहे. सोबतच अधिकारी सर्वसामान्य लोकांच्या फाईल वर्षानुवर्षी कशी अडकवून ठेवतात हे सुद्धा दिसून आले आहेत.

त्याचं झालं असे की, छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री पंचायत समिती कार्यालयात वर्षभरापासून दाखल केलेल्या सिंचन विहीर व गोठ्याच्या तब्बल 700 फाइल धूळखात पडून आहेत. अधिकाऱ्यांकडून या फाइल मंजूर करण्यातच आल्या नसल्याने त्या पडून होत्या. त्यामुळे जोपर्यंत या फाइल मंजूर केल्या जाणार नाहीत, तोपर्यंत पंचायत समिती कार्यालयातून उठणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेत माजी विधानसभा अध्यक्ष भाजप आमदार हरिभाऊ बागडे (Haribhau Bagade) यांनी घेतला होता. बागडे यांनी थेट पंचायत समितीमध्येच आंदोलन सुरू केल्याने प्रशासनाची धावपळ उडाली. विशेष म्हणजे आज (24 जून) रोजी आयोजित 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करायचे होते. मात्र अधिकारी फाईलवर सही करत नसल्याने हे सर्व प्रकरण प्रलंबित पडले. त्यामुळे संतापलेल्या बांगडेंनी थेट पंचायत समिती कार्यालय गाठले आणि आंदोलनाला सुरुवात केली.

आमदार प्रशासनाच्या दारी!

सरकारकडून 'प्रशासन आपल्या दारी' ही योजना राबवली जात आहे. मात्र आपल्या मतदारसंघातील लोकांचे काम मंजूर होत नसल्याने आणि त्यांच्या फाइल शासकीय कार्यालयात धुळखात पडून असल्याने आमदार बागडे यांनी 'आमदार प्रशासनाच्या दारी' आंदोलन केलं. यावेळी त्यांनी तब्बल 8 तास पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकाऱ्यांच्या खुर्चीसमोर  ठिय्या आंदोलन केले. तर जेवण देखील तिथेच केले. शेवटी जिल्हा परिषद सीईओ यांनी उद्या सर्व फाइल मार्गी लागतील असे आश्वासन देऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. तसेच आंदोलन मागे न घेतल्यास मी स्वतः भेटण्यासाठी येतो असे सांगितल्यावर बागडे यांनी आपले आंदोलन मागे घेतलं.

एका दिवसांत 465 फायली मंजूर! 

पंचायत समितीमध्ये आमदार हरिभाऊ बागडे यांनी विहिरीच्या फायली पूर्ण करण्यासाठी 8 तास ठिय्या आंदोलन केले होते. आमदार बागडे यांच्या आक्रमक भूमिकेनंतर रात्री 12 ते 1 पर्यंत 150 फायली पूर्ण झाल्या होत्या. तसेच शुक्रवारी  दिवसभरात अनेक फायली पूर्ण झाल्या आहे. अशाप्रकारे एकूण 465 फायली पूर्ण झाल्या. सध्या गटविकास अधिकारी नसल्याने यावर स्वाक्षऱ्या बाकी आहे. तर येथील गटविकास अधिकारी ज्योती कवडदेवी यांची रात्रीतूनच बदली करण्यात आली. त्यांच्या जागेवर संजय गायकवाड हे बीडीओ म्हणून रुजू झाले. ते या सर्व विहिरीच्या कार्यरंभ आदेशावर स्वाक्षऱ्या करणार आहे.

इतर महत्वाच्या बातम्या: 

जुगार अड्डे बंद करण्याच्या मागणीसाठी अर्धनग्न आंदोलन करणाऱ्यावर चक्क विनयभंगाचा गुन्हा; संभाजीनगर पोलिसांचा 'हम करो सो कायदा'?

About the author मोसीन शेख

मोसीन शेख
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Sunil Kendrekar Majha Katta : माहिती नसलेलं FDA तुकाराममुळे समजलं, तो जे काम करतोय ते उत्कृष्ट, माजी सनदी अधिकारी सुनील केंद्रेकरांकडून 'माझा कट्टा'वर कौतुक
माहिती नसलेलं FDA तुकाराममुळे समजलं, तो जे काम करतोय ते उत्कृष्ट, माजी सनदी अधिकारी सुनील केंद्रेकरांकडून 'माझा कट्टा'वर कौतुक
Abhijeet Dipke on RSS: ज्यांनी गांधींची हत्या केली, डॉ. आंबेडकरांचा विरोध केला त्यांनी आम्हाला संविधान शिकवू नये, अभिजीत दिपकेंनी RSS च्या बड्या नेत्याला सुनावलं
ज्यांनी गांधींची हत्या केली, डॉ. आंबेडकरांचा विरोध केला त्यांनी आम्हाला संविधान शिकवू नये, अभिजीत दिपकेंनी RSS च्या बड्या नेत्याला सुनावलं
Abhijeet Dipke: आधी वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी, आता अभिजीत दिपकेंविरोधात पोलिसांत तक्रार, नेमकं काय घडलं?
आधी वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी, आता अभिजीत दिपकेंविरोधात पोलिसांत तक्रार, नेमकं काय घडलं?
Abhijeet Dipke on PM Modi: आधी मोदींना त्यांची डिग्री दाखवायला सांगा, मग मी....; वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी होताच अभिजीत दिपके संतापले
आधी मोदींना त्यांची डिग्री दाखवायला सांगा, मग मी....; वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी होताच अभिजीत दिपके संतापले

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget