एक्स्प्लोर

परीक्षेला निघालेल्या तीन भावंडांना चिरडले; दोन ट्रकमध्ये ओव्हरटेक करण्याच्या स्पर्धेतून भीषण अपघात

Chhatrapati Sambhaji Nagar Accident : अपघातानंतर हायवा चालक घटनास्थळावरून गाडीसह फरार झाला असल्याची माहिती उपस्थितीत नागरिकांनी दिली आहे.

Chhatrapati Sambhaji Nagar Accident : छत्रपती संभाजीनगर शहरातील बीड बायपास परिसरातल्या बाळापूर फाट्यावर हायवा आणि दुचाकीचा भीषण अपघात (Accident) झालाय. या अपघातात दुचाकीवर असणाऱ्या तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडलीय. अपघातात मृत असलेले तिघेही बहिण-भाऊ असल्याची माहिती समोर येत आहे. अपघाताची माहिती मिळतात पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले आहेत.  तर, मयत झालेले तिघेजण परभणी जिल्ह्यातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळत असून, ते मागील काही दिवसांपासून ते सातारा परिसरातील शिवछत्रपतीनगर भागात राहत होते. प्रवीण अंभोरे, प्रतिभा अंभोरे आणि लखन अंभोरे अशी मृत बहीण भावाची ( Sister Brother) नावं आहेत. 

पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास बीड बायपासवरील बाळापूर फाटा परिसरातील पाटीलवाडा हॉटेल समोर आपल्या दुचाकीवरून अंभोरे बहिण भाऊ प्रवास करत होते. याचवेळी दोन हायवांमध्ये ओव्हरटेक करण्याची स्पर्धा सुरु होती. याच स्पर्धेच्या नादात दोन्ही पैकी एका हायवा चालकाने अंभोरे यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. थेट अंगावरून हायवा गेल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे या अपघातानंतर हायवा चालक घटनास्थळावरून गाडीसह फरार झाला असल्याची माहिती उपस्थितीत नागरिकांनी दिली आहे. तर, तिनही मृतदेह शासकीय घाटी रूग्णालयात (Government Hospital) पाठवले आहे. 

तिघेही बहीण भाऊ परीक्षा देण्यासाठी निघाले होते...

अपघातात मृत झालेले तिघेही बहीण-भाऊ आहेत. तिघांचे वय वीस ते पंचवीस वर्षे असण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तर घटनास्थळी वन विभागाच्या परीक्षेचे हॉलतिकीट आढळून आले आहेत. त्यामुळे तिघेही बहीण भाऊ परीक्षा देण्यासाठी जात असल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तवला जात आहे. पोलिसांकडून त्यांच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली आहे. तर अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. 

पोलीस घटनास्थळी... 

छत्रपती संभाजीनगर शहरातील बीड बायपास परिसरातल्या बाळापूर फाट्यावर हायवा आणि दुचाकीचा भीषण अपघात झाल्याची माहिती मिळताच चिकलठाणा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी मृतदेह घाटी रुग्णालयात पाठवले आहेत. पोलिसांकडून घटनास्थळी पंचनामा करण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांकडून अपघात करणाऱ्या हायवा ट्रकचा शोध घेतला जात आहे. यासाठी पोलीस सीसीटीव्हीची पाहणी करत आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

Ratnagiri Bus Fire : मोठा अनर्थ टळला! चालत्या बसने घेतला पेट; तरुणाचं प्रसंगावधान, 19 प्रवासी बचावले

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पालकमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांनी आपला चॉइस सांगितला; भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणतात, तशी गडचिरोलीकरांची इच्छा!
पालकमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांनी आपला चॉइस सांगितला; भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणतात, तशी गडचिरोलीकरांची इच्छा!
गरिबांच्या, वारकऱ्यांच्या विठ्ठल मंदिरात चांदीचा दरवाजा; 30 किलो चांदीत कोरीव काम; भक्तानं दिलं दान
गरिबांच्या, वारकऱ्यांच्या विठ्ठल मंदिरात चांदीचा दरवाजा; 30 किलो चांदीत कोरीव काम; भक्तानं दिलं दान
शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करणार, आगामी अधिवेशनात कायदा करणार : माणिकराव कोकाटे
शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करणार, आगामी अधिवेशनात कायदा करणार : माणिकराव कोकाटे
भाजप नेत्यानंच सुरू केली लाडकी बहीण योजना, 1100 रुपयांचे वाटप सुरू; बंगल्याबाहेर महिलांची मोठी गर्दी
भाजप नेत्यानंच सुरू केली लाडकी बहीण योजना, 1100 रुपयांचे वाटप सुरू; बंगल्याबाहेर महिलांची मोठी गर्दी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shirdi : आठवड्यातून एक दिवस प्रत्येक मंदिरात सामूहिक आरती : महाराष्ट्र मंदिर न्याय परिषदABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 25 December 2024 दुपारी 3 च्या हेडलाईन्सKalyan Girl Murder News : अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर केला तसाच विशाल गवळीचाही करा, कल्याणमधील महिलांची मागणीVinod Kambli Bhiwandi Hospital News : विनोद कांबळींवर भिवंडीच्या आकृती रुग्णालयात उपचार सुरु, ख्रिसमसचा आनंद लुटता यावा यासाठी खास सजावट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पालकमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांनी आपला चॉइस सांगितला; भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणतात, तशी गडचिरोलीकरांची इच्छा!
पालकमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांनी आपला चॉइस सांगितला; भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणतात, तशी गडचिरोलीकरांची इच्छा!
गरिबांच्या, वारकऱ्यांच्या विठ्ठल मंदिरात चांदीचा दरवाजा; 30 किलो चांदीत कोरीव काम; भक्तानं दिलं दान
गरिबांच्या, वारकऱ्यांच्या विठ्ठल मंदिरात चांदीचा दरवाजा; 30 किलो चांदीत कोरीव काम; भक्तानं दिलं दान
शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करणार, आगामी अधिवेशनात कायदा करणार : माणिकराव कोकाटे
शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करणार, आगामी अधिवेशनात कायदा करणार : माणिकराव कोकाटे
भाजप नेत्यानंच सुरू केली लाडकी बहीण योजना, 1100 रुपयांचे वाटप सुरू; बंगल्याबाहेर महिलांची मोठी गर्दी
भाजप नेत्यानंच सुरू केली लाडकी बहीण योजना, 1100 रुपयांचे वाटप सुरू; बंगल्याबाहेर महिलांची मोठी गर्दी
Beed : बीडची गुंडागर्दी...जिल्ह्यात ड्रायव्हिंग लायसन्स दिल्यासारखे बंदुक परवाने; 1281 अधिकृत पिस्तुल; खासदारांचा संताप
बीडची गुंडागर्दी... जिल्ह्यात ड्रायव्हिंग लायसन्स दिल्यासारखे बंदुक परवाने; 1281 अधिकृत पिस्तुल; खासदारांचा संताप
Fact Check :राहुल गांधी यांच्या भाषणाचा व्हिडीओ कट करुन क्लीप पुन्हा व्हायरल करत चुकीचा दावा, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर
राहुल गांधी यांच्या भाषणाचा व्हिडीओ कट करुन क्लीप पुन्हा व्हायरल करत चुकीचा दावा, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर
मंत्री महोदयांनी घेतली विनोद कांबळींची भेट, रुग्णालयातच ख्रिसमस साजरा; आर्थिक मदत पत्नीकडे सुपूर्द
मंत्री महोदयांनी घेतली विनोद कांबळींची भेट, रुग्णालयातच ख्रिसमस साजरा; आर्थिक मदत पत्नीकडे सुपूर्द
मोठी बातमी ! कझाकिस्तानमध्ये विमान क्रॅश; 25 प्रवशांना वाचविण्यात यश, रुग्णालयात उपचार सुरू
मोठी बातमी ! कझाकिस्तानमध्ये विमान क्रॅश; 25 प्रवशांना वाचविण्यात यश, रुग्णालयात उपचार सुरू
Embed widget