एक्स्प्लोर

Imtiaz Jalil: अपघात नव्हे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी केलेली हत्या; बुलढाणा अपघातावर जलील यांची प्रतिक्रिया

Imtiaz Jaleel : बुलढाणा अपघाताला मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस दोघेही जबाबदार असल्याचा आरोप जलील यांनी केला आहे. 

Imtiaz Jaleel Reaction On Buldhana Accident: बुलढाणा जिल्ह्यातील (Buldhana District) सिंधखेड राजा जवळ असलेल्या समृद्धी महामार्गावर आज पहाटे झालेल्या अपघातात एकूण 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेने महाराष्ट्रावर शोकाकुळ पसरली आहे. दरम्यान आता या अपघातावरून अनेक राजकीय प्रतिक्रिया देखील येत आहे. तर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी बुलढाणा अपघातावरून (Buldhana Accident) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केली आहे. हा अपघात नसून घात आहे. तसेच याला मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस दोघेही जबाबदार असल्याचा आरोप जलील यांनी केला आहे. 

दरम्यान या अपघातावर प्रतिक्रिया देतांना जलील म्हणाले की, कोणताही एक्सप्रेस-वे किंवा सुपर एक्सप्रेस-वे तयार होतो त्यावेळी रोड सेफ्टीचे नियम असतात. त्यामुळे समृद्धी महामार्गबाबत रोड सेफ्टीचे क्लियरेंस मिळाले होते का?, या महामार्गावर नेहमीच अपघात का होतात?. मी फक्त याच अपघातबद्दल बोलत नाही. मात्र समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनासाठी मिडीया इव्हेंट करण्यात आला. उपमुख्यमंत्री फडणवीस गाडी चालवत आहे, त्यांच्या बाजूला मुख्यमंत्री शिंदे बसले असल्याचे दाखवण्यात आले. या दोघांना फक्त काळजी याची वाटत होती की, आपली सत्ता गेल्यावर दुसरं कोणीतरी याचं उद्घाटन करेल. यासाठीच घाईघाईने या रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले आणि त्याचेच हे परिणाम आहे. त्यामुळे याला मी अपघात म्हणत नाही. ही हत्या असून, या हत्यांना मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस दोघे जबाबदार असल्याचे जलील म्हणाले. 

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री अपघातास्थळी...

बुलढाणा येथे झालेल्या भीषण अपघाताच्या घटनेने महाराष्ट्र हादरला आहे. दरम्यान या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपघातास्थळी भेट दिली आहे. यावेळी त्यांनी अपघातस्थळाची पाहणी केली. तसेच अधिकाऱ्यांकडून अपघाताबाबत माहिती जाणून घेतली. सोबतच मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अपघात झाल्यावर घटनास्थळी मदतीसाठी धावून आलेल्या स्थानिकांशी देखील चर्चा करत नेमकं काय घडलं होतं याबाबत जाणून घेतलं. तसेच अपघातस्थळाची पाहणी केल्यावर दोघेही नेते जखमी असलेल्या अपघातग्रस्तांची भेट घेऊन त्यांची विचारपूस करणार आहे. 

गावकऱ्यांची मोठी गर्दी...

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिक घटनास्थळी गर्दी करत आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आल्यावर देखील अशीच गर्दी या ठिकाणी पाहायला मिळाली. त्यामुळे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना तपासात अडचणी येत आहे. तर घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे. मात्र नागरिकांना बाजूला हटवण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागत आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Buldhana Accident : बुलढाणा अपघातस्थळी जाणाऱ्या मुख्यमंत्री शिंदेंच्या ताफ्यातील वाहनांची संभाजीनगरच्या विमानतळावर तपासणी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण?  बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण? बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर : 10 Jan 2025 : ABP MajhaAmol Kolhe on Shiv Sena UBT Congress : अमोल कोल्हेंची ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसवर जोरदार टीकाMaharashtra MVA : जागावाटप आणि वादाचं अटक मटक; वडेट्टीवार-राऊत आमनेसामनेABP Majha Headlines : 06 PM : 10 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण?  बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण? बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
मंत्री धनंजय मुंडे एक्टीव्ह मोडवर; आधी भुजबळांची भेट, नंतर मंत्रालयात कामकाज सुरू
मंत्री धनंजय मुंडे एक्टीव्ह मोडवर; आधी भुजबळांची भेट, नंतर मंत्रालयात कामकाज सुरू
Sania Mirza : सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
मोठी बातमी! अखेर राहुल गांधी न्यायालयात हजर; पुणे कोर्टाकडून 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन
मोठी बातमी! अखेर राहुल गांधी न्यायालयात हजर; पुणे कोर्टाकडून 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन
90 तासांच्या कामाची चर्चा! जगातील कोणत्या देशात सर्वात जास्त वेळ लोक काम करतात?  
90 तासांच्या कामाची चर्चा! जगातील कोणत्या देशात सर्वात जास्त वेळ लोक काम करतात?  
Embed widget