Buldhana Accident : बुलढाणा अपघातस्थळी जाणाऱ्या मुख्यमंत्री शिंदेंच्या ताफ्यातील वाहनांची संभाजीनगरच्या विमानतळावर तपासणी
Buldhana Accident : मुख्यमंत्री समृद्धी महामार्गावरून करणार असल्याने त्यांच्या ताफ्यातील वाहनांची संभाजीनगरच्या विमानतळावर आरटीओकडून तपासणी करण्यात आली आहे.
Buldhana Accident : बुलढाण्यात (Buldhana) एका प्रवासी बसचा भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना आज (1 जुलै) रोजी पहाटे घडली आहे. या बसमध्ये एकूण 33 प्रवासी होते आणि अपघातात 25 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही अपघातस्थळी भेट देणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे हे विमानाने छत्रपती संभाजीनगरला येणार आहे. त्यानंतर विमानतळावरून चारचाकी गाडीने बुलडाण्याकडे रवाना होणार आहे. विशेष म्हणजे, हा सर्व प्रवास मुख्यमंत्री समृद्धी महामार्गावरून करणार असल्यानं त्यांच्या ताफ्यातील वाहनांची संभाजीनगरच्या विमानतळावर आरटीओकडून तपासणी करण्यात आली आहे.
बुलढाणा येथील समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातस्थळी भेट देण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे मुंबईहून निघाले आहेत. तर छत्रपती संभाजीनगर येथे ते विमानाने येणार आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून मुख्यमंत्री चारचाकीने बुलढाण्याच्या दिशेने जाणार आहे. विशेष म्हणजे त्यांचा हा संपूर्ण प्रवास समृद्धी महामार्गावरून असणार आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर विमानतळावर त्यांच्या ताफ्यातील वाहनांची तपासणी आरटीओच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे. ज्यात वाहनाची हवा, किलोमीटर, ताफ्यातील वाहनांची परिस्थिती या सर्वांची चौकशी करण्यात आली. तसेच सर्व वाहनांची तपासणी केल्यावर आरटीओच्या अधिकाऱ्यांकडून ग्रीन सिग्नल दलेल्या वाहनांनाच ताफ्यात प्रवेश असणार आहे.
एक गाडीला 'रेड सिग्नल'
मुख्यमंत्री शिंदे छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून बुलढाण्याला जाणार असल्याने त्यांच्यासाठी महागड्या गाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती. दरम्यान यावेळी मुख्यमंत्री यांच्या ताफ्यात असणाऱ्या सर्व गाड्यांची आरटीओच्या अधिकाऱ्यांना तपासणी केली. यावेळी एका गाडीचं किलोमीटर अधिक झाल्याने ती गाडी ताफ्यात वापरता येणार नसल्याचे सांगत आरटीओच्या अधिकाऱ्यांनी 'रेड सिग्नल' दिल्याने ती गाडी बाहेर काढावी लागली. त्यामुळे रटीओच्या अधिकाऱ्यांना तपासणी करून पास केलेल्या गाड्याच मुख्यमंत्री शिंदे यांच्या ताफ्यात असणार आहे.
मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी DNA टेस्ट करणार...
बुलढाणा येथे समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघाताच्या घटनेत एकूण 25 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातानंतर बसने पेट घेतला, ज्यात आतमध्ये अडकलेले प्रवासी जळून खाक झाले. त्यामुळे अनेक मृत प्रवाशांची ओळख पटू शकली नाही. त्यामुळे मृत व्यक्तींची DNA चाचणी केली जाणार असून, त्यानंतर ओळख पटवली जाणार आहे. तर मृत व्यक्तींच्या कुटुंबाना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर केंद्राकडून 2 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: