एक्स्प्लोर

लढणार युतीतच, अमित शाहांसोबत स्पष्ट संवाद झालाय; शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा

Sanjay Shirsat : शिंदे गटाचे नेते कमळावर निवडणूक लढवण्याचा प्रश्नच येत नाही असेही संजय शिरसाट म्हणाले आहे.

छत्रपती संभाजीनगर : आगामी निवडणुका (Elections) आम्ही भाजपसोबत (BJP) युतीत लढणार असून, त्या धनुष्यबाणावरच लढल्या जाणार असल्याचे स्पष्ट संवाद भाजप नेते अमित शाह (Amit Shah) यांच्यासोबत झाला असल्याचा दावा शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केला आहे. त्यामुळे शिंदे गटाचे नेते कमळावर निवडणूक लढवण्याचा प्रश्नच येत नाही असेही शिरसाट म्हणाले आहे. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना शिरसाट बोलत होते.

आगामी निवडणुका भाजप एकट्याने लढवणार असून, ज्यांना भाजपसोबत निवडणुका लढवायची आहे त्यांनी कमळावर निवडणूक लढवण्याचे भाजप आणि आरआरएसच्या बैठकीत ठरले असल्याचा दावा शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, यालाच उत्तर देतांना शिंदे गटाचे आमदार तथा प्रवक्ते संजय शिरसाट यांनी, "आगामी निवडणुका आम्ही धनुष्यबाणावरच लढवणार असल्याचे म्हटले आहे. सोबतच भाजपसोबत युतीत शिवसेना (शिंदे गट) निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्टपणे बातचीत अमित शाह यांच्यासोबत झाल्याचं" देखील शिरसाट म्हणाले. 

पक्ष संपतोय, त्याकडे आधी लक्ष द्यावे...

दरम्यान याचवेळी आव्हाड यांच्यावर टीका करतांना शिरसाट म्हणाले की, "राजकारणात भविष्य पाहणारे लोकांची संख्या जास्त झाली आहे. तुम्ही अनेकवेळा पक्षाशी गद्दारी केली आहे. त्यामुळे आता तुम्ही आम्हाला शिकवू नयेत. तुम्हाला आता आतल्या मीटिंगमध्ये मुद्दे देखील कळत असेल तर तुमचं कठीण आहे. तुम्ही कुठेही कान लावू नका, तुमच्या पक्षाचे अस्तित्व संपले आहे, तिकडे आधी बघा नंतर दुसरीकडे बघा," असा खोचक टोलाही शिरसाट यांनी आव्हाडांना लगावला.

निकाल आमच्याच बाजूने...

आम्हाला अपात्र किंवा पात्रताबाबत चिंता नाही. इतिहास पाहिला तर या आधी सर्व बाबींमध्ये अधिकृत पक्ष म्हणून आम्हालाच मान्यता मिळाली आहे आणि चिन्ह देखील मिळाले आहे. आत्ता झालेल्या सुनावणीत आम्ही सगळे पुरावे दिले आहेत. त्यामुळे 10 जानेवारी रोजी येणारा निर्णय आमच्याच बाजूने लागेल असा आम्हाला विश्वास असल्याचे शिरसाट म्हणाले आहे.

उद्धव ठाकरेंवर टीका...

उद्धव ठाकरे यांनी हिवाळी अधिवेशनात हजेरी लावली होती. दरम्यान, यावरून देखील शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. फक्त यायचं, बसायचं, जेवायचं, चहा घ्यायचं इतकच काम उद्धव ठाकरे यांनी नागपुरात केले. त्याऐवजी काही चांगले बोलले असते तर बरं झालं असते. त्यामुळे दर्शनापुरते आले आणि गेले इतकच काम उद्धव ठाकरे यांनी नागपूर अधिवेशनात केल्याचं शिरसाट म्हणाले.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Jitendra Awhad on Ajit Pawar: अजित पवार मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल, पण... : जितेंद्र आव्हाड

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra ElectionRaj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मलाNashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडाShreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
मोठी बातमी! भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
Embed widget