एक्स्प्लोर

Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट, मराठवाड्यात तब्बल एवढ्या कुणबी नोंदी सापडल्या

Maratha Reservation Update : तपासणीत आढळलेल्या नोंदीचा सविस्तर अंतिम अहवाल शिंदे समितीकडे सादर केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Maratha Reservation Update : मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) मराठवाड्यातून (Marathwada) मोठी अपडेट समोर येत आहे. राज्य शासनाच्या आदेशावरून विविध विभागाने मराठवाड्यात त्यांच्याकडे असलेल्या जवळपास जुन्या 2 कोटी कागदपत्रांची तपासणी केली असून, यामध्ये 27 हजार 534  कुणबी नोंदी (Kunbi Records) आढळून आल्या आहेत. विशेष म्हणजे सर्वाधिक 13 हजार 128 नोंदी एकट्या बीड जिल्ह्यात आढळून आले आहे. तर, तपासणीत आढळलेल्या नोंदीचा सविस्तर अंतिम अहवाल शिंदे समितीकडे सादर केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्यासाठी या नोंदी महत्वाच्या ठरणाऱ्या असल्याचे बोलले जात आहे1.

कोणत्या जिल्ह्यात किती नोंदी आढळल्या

छत्रपती संभाजीनगर 
2447887 कागदपत्रांची तपासणी 
1278 नोंदी आढळल्या

जालना
2160615 कागदपत्रांची तपासणी
3318 नोंदी आढळल्या

परभणी 
2119994 कागदपत्रांची तपासणी
2891 नोंदी आढळल्या

हिंगोली
1262219 कागदपत्रांची तपासणी
3468 नोंदी आढळल्या

नांदेड
2568942 कागदपत्रांची तपासणी
1204 नोंदी आढळल्या

बीड 
2381553 कागदपत्रांची तपासणी
13128 नोंदी आढळल्या

लातूर 
2264493 कागदपत्रांची तपासणी
809 नोंदी आढळल्या

धाराशिव 
4185029 कागदपत्रांची तपासणी
1438 नोंदी आढळल्या

सरसकट आरक्षणाची मागणी... 

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्याकडून राज्यभरात सभा घेण्यात येत आहे. दरम्यान, मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीमधून सरसकट आरक्षण देण्याची मागणी जरांगे यांनी केली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून निजामकालीन नोंदी शोधल्या जात असून, राज्यभरात आतापर्यंत अनेक नोंदी सापडल्या आहेत. मराठवाड्यात देखील सर्वच आठ जिल्ह्यात नोंदी शोधण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांना प्रशासनाकडून कुणबी प्रमाणपत्र देखील दिले जात आहे. 

मराठा समाजाला सरसकट आरक्षण देता येणार नाही: गिरीश महाजन 

एकीकडे मराठा समाजाकडून सरसकट ओबीसी आरक्षणाची मागणी होत असतानाच, दुसरीकडे भाजप नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांनी मराठा समाजाला सरसकट आरक्षण देता येणार नसल्याचे म्हटले आहे. छत्रपती संभाजीनगर येते माध्यमांशी संवाद साधतांना महाजन म्हणाले की, "मराठा आरक्षण प्रकरणी सरकार गंभीर आहे. य संदर्भात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री स्वत: लक्ष घालत आहे. मनोज जरांगेंचीची सरसकट प्रमाणपत्र मिळावे ही मागणी शक्य नाही. मी स्वत: ज्यावेळी त्यांच्या भेटीसाठी गेलो त्यावेळी मी त्यांना या संदर्भात सांगितले आहे. आतापर्यंत जेवढ्या कुणबी नोंदी मिळल्या त्यानुसार कुणबी प्रमाणपत्र देण्याचे काम सुरू आहे. मराठा समाजाला सरसकट आरक्षण देणार कसं? असा सवाल देखील महाजन यांनी यावेळी उपस्थित केला.

इतर महत्वाच्या बातम्या: 

मराठा समाजाचे सर्वेक्षण होणार; राज्य मागासवर्ग आयोगाचा सरकारकडे प्रस्ताव, मतभेदावरुन एका सदस्याचा राजीनामा

मागील 23 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

भाषणात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून नंतर भाजपत घेतलं त्यांच्यासाठी पहिल्यांदा फास्ट ट्रॅक कोर्ट करा, त्यांची सीबीआय चौकशी का थांबवली? कपिल सिब्बलांचा मोदींवर हल्लाबोल
भाषणात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून नंतर भाजपत घेतलं त्यांच्यासाठी पहिल्यांदा फास्ट ट्रॅक कोर्ट करा, त्यांची सुरु असलेली सीबीआय चौकशी का थांबवली? कपिल सिब्बलांचा मोदींवर हल्लाबोल
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात कार थेट पाण्यात; वसईत पावसामुळे पाणीच पाणी, सुदैवाने कारमधील चौघे बचावले
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात कार थेट पाण्यात; वसईत पावसामुळे पाणीच पाणी, सुदैवाने कारमधील चौघे बचावले
गोदावरीला मोठा पूर, दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत पाणी;होळकर पुलाखालून 24 हजार क्युसेक विसर्ग
गोदावरीला मोठा पूर, दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत पाणी;होळकर पुलाखालून 24 हजार क्युसेक विसर्ग
CJP Protest: जंतरमंतरवरती आंदोलनावेळी शांत उभारलेल्या महिलेच्या कानाखाली मारली; व्हिडीओ व्हायरल झाला, ADCP ची पोस्टिंग केली थेट....
जंतरमंतरवरती आंदोलनावेळी शांत उभारलेल्या महिलेच्या कानाखाली मारली; व्हिडीओ व्हायरल झाला, ADCP ची पोस्टिंग केली थेट....

व्हिडीओ

NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भाषणात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून नंतर भाजपत घेतलं त्यांच्यासाठी पहिल्यांदा फास्ट ट्रॅक कोर्ट करा, त्यांची सीबीआय चौकशी का थांबवली? कपिल सिब्बलांचा मोदींवर हल्लाबोल
भाषणात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून नंतर भाजपत घेतलं त्यांच्यासाठी पहिल्यांदा फास्ट ट्रॅक कोर्ट करा, त्यांची सुरु असलेली सीबीआय चौकशी का थांबवली? कपिल सिब्बलांचा मोदींवर हल्लाबोल
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात कार थेट पाण्यात; वसईत पावसामुळे पाणीच पाणी, सुदैवाने कारमधील चौघे बचावले
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात कार थेट पाण्यात; वसईत पावसामुळे पाणीच पाणी, सुदैवाने कारमधील चौघे बचावले
गोदावरीला मोठा पूर, दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत पाणी;होळकर पुलाखालून 24 हजार क्युसेक विसर्ग
गोदावरीला मोठा पूर, दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत पाणी;होळकर पुलाखालून 24 हजार क्युसेक विसर्ग
CJP Protest: जंतरमंतरवरती आंदोलनावेळी शांत उभारलेल्या महिलेच्या कानाखाली मारली; व्हिडीओ व्हायरल झाला, ADCP ची पोस्टिंग केली थेट....
जंतरमंतरवरती आंदोलनावेळी शांत उभारलेल्या महिलेच्या कानाखाली मारली; व्हिडीओ व्हायरल झाला, ADCP ची पोस्टिंग केली थेट....
संभाजीनगरमधील प्रसिद्ध हॉटेल FDA कडून सील; जिलेबीच्या गोडव्यात भेसळ, तुकाराम मुंढेंच्या विभागास काय आढळल्या त्रुटी
संभाजीनगरमधील प्रसिद्ध हॉटेल FDA कडून सील; जिलेबीच्या गोडव्यात भेसळ, तुकाराम मुंढेंच्या विभागास काय आढळल्या त्रुटी
जंतरमंतरवर पोलिसांचा मार खात विद्यार्थ्यांचा न्यायासाठी संघर्ष सुरुच असतानाच आता संसदेच्या दारात खडाजंगी; खासदार आमनसामने, प्रियांका गांधी घोषणाबाजी करतच एनडीएच्या खासदारांकडे पोहोचल्या
जंतरमंतरवर पोलिसांचा मार खात विद्यार्थ्यांचा न्यायासाठी संघर्ष सुरुच असतानाच आता संसदेच्या दारात खडाजंगी; खासदार आमनसामने, प्रियांका गांधी घोषणाबाजी करतच एनडीएच्या खासदारांकडे पोहोचल्या
Police Threats Students :
"पुन्हा दिसलात तर 50 ग्रॅम ड्रग्स टाकून आत टाकू!"; नीट पेपर फुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबई पोलिसांची धमकी; व्हिडिओ व्हायरल होताच चौकशीचे आदेश
बीडमध्ये विद्यार्थ्यास NEET मध्ये 95 गुण; हायकोर्टाचे एनटीएला नोटीस, उत्तरपत्रिका कोर्टात जमा करण्याचे आदेश
बीडमध्ये विद्यार्थ्यास NEET मध्ये 95 गुण; हायकोर्टाचे एनटीएला नोटीस, उत्तरपत्रिका कोर्टात जमा करण्याचे आदेश
Embed widget