एक्स्प्लोर

संभाजीनगरात राडा, महापालिकासह पोलिसांच्या पथकावर हल्ला; अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या

Chhatrapati Sambhaji Nagar : सध्या घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तर, वरिष्ठ अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. 

Chhatrapati Sambhaji Nagar : जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येत असून, अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या महानगरपालिका आणि पोलिसांच्या पथकावर हल्ला करण्यात आला आहे. शहरातील मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन परिसरात हा प्रकार समोर आला आहे. यावेळी अतिक्रमणधारकांनी पोलिसांच्या पथकावर थेट दगडफेक केल्याचे पाहायला मिळाले. यावेळी पोलिसांकडून अश्रू धुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे 

छत्रपती संभाजीनगर शहरात मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन परिसरात असणाऱ्या विश्रांती नगरमध्ये पोलीस आणि नागरिकांमध्ये मोठा राडा झाला आहे. पोलिसांसह महापालिकेचे पथक या ठिकाणी अतिक्रमण तोडण्यासाठी गेले होते. यावेळी नागरिकांनी कारवाईला विरोध करत पथकावर दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून नागरिकांना पिटाळून लावलं. तसेच त्यानंतर जेसीबीच्या माध्यमातून अतिक्रमण उध्वस्त करण्यात आले आहे. सध्या घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तर, वरिष्ठ अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. 

अचानक नागरिकांनी पथकावर दगडफेक सुरु केली.

आज सकाळीच अनाधिकृत अतिक्रमण काढण्यासाठी मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन परिसरात असणाऱ्या विश्रांती नगरमध्ये महापालिका प्रशासन पोलीसांच्या मोठ्या फौजफाट्यासह दाखल झाले होते. यावेळी पोलिसांकडून नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र, स्थानिक नागरिकांनी कारवाईला विरोध केला. तसेच थेट रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलन सुरु केले. यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. तसेच जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. त्यानंतर काही महिलांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला आणि अचानक नागरिकांनी पथकावर दगडफेक सुरु केली. त्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. अंगावर दगड येत असल्याने पथकातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. शेवटी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि जमाव पांगवला. पोलिसांचा फौजफाटा वाढवण्यात आला असून, अतिक्रमण देखील काढण्यात येत आहे. 

नागरिकांनी केली होती कारवाईची मागणी...

छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन परिसरात मागील काही दिवसांपासून अवैधधंदे वाढल्याने येथील नागरिकांनी प्रशासनाकडे तक्रार केली होती. या भागात काही लोकांनी अतिक्रमण करून त्यात अवैधधंदे सुरु केले होते. त्यामुळे आज महानगरपालिकेच्या पथकासह पोलिसांचं पथक या अतिक्रमणावर कारवाई करण्यासाठी याठिकाणी गेले होते. मात्र, यावेळी अतिक्रमणधारकांनी कारवाईला विरोध करत पथकावरच हल्ला केल्याचा प्रकार समोर आला. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

‘राज्य आमचे आहे, तुमची गुर्मी उतरवू’; भाजप नेत्याची पोलिसांना 'धमकी', व्हिडिओ व्हायरल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shaina NC on Vidhan sabha Result | विजय आपलाच होणार, शायना एनसींना विश्वास ABP MajhaAmol Mitkari on Vidhan Sabha Result | अजित पवारांचा पराभव झाला तर आव्हाडांचा गुलाम म्हणून काम करेलKisse Pracharache : किस्से प्रचाराचे, रिपोर्टर 'माझा'चे; महायुती की मविआ कुणाची बाजी?Kisse Pracharache Seg 03 : किस्से प्रचाराचे, रिपोर्टर 'माझा'चे; महायुती की मविआ कुणाची बाजी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
Embed widget