एक्स्प्लोर

Asaduddin Owaisi : ओवेसींनी सकाळीच संभाजीनगर गाठलं, जलील यांच्या प्रचारासाठी घेणार बैठका; ग्रामीण भागाचाही दौरा करणार

Asaduddin Owaisi : गेल्या महिन्याभरात असदुद्दीन ओवेसी हे चौथ्यांदा संभाजीनगर जिल्ह्याचा दौरा करत आहे. ओवेसी हे आज शहरात बैठका घेणार आहेत.

Sambhaji Nagar Lok Sabha Constituency : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) अनुषंगाने एमआयएम (MIM) पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) हे आज संभाजीनगर (Sambhajinagar) दौऱ्यावर आहेत. विद्यमान खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांच्या प्रचारासाठी ओवेसी हे आज शहरात बैठका घेणार आहेत. गेल्या महिन्याभरात ते चौथ्यांदा संभाजीनगर जिल्ह्याचा दौरा करत आहे. एकीकडे वंचितने दिलेला उमेदवार मुस्लिम समुदायातील असल्याने जलील यांच्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा (Vanchit Bahujan Aaghadi) उमेदवार जलील यांच्यासाठी डोकेदुखी ठरते की काय हे पाहणे तितकच महत्त्वाच ठरणार आहे. त्यामुळे एमआयएमला संभाजीनगर लोकसभेची (Sambhajinagar Lok Sabha) जागा टिकवणं हे मोठं आव्हान असणार असल्याची चर्चा आहे. 

मराठवाड्याची राजधानी असलेल्या संभाजीनगरची लोकसभा जागा मागील काही दिवसांत चर्चेत आहेत. विशेष म्हणजे राज्यातील एकमेव एमआयएमचा खासदार म्हणजेच इम्तियाज जलील याच मतदारसंघातून 2019 मध्ये निवडून आले होते. त्यामुळे पुन्हा जलील यांच्या विजयासाठी आता स्वतः असदुद्दीन ओवेसी मैदानात उतरले आहे. आज ओवेसी संभाजीनगर शहरात अनेक ठिकाणी बैठका घेणार आहेत. शहरात मुस्लीम मतदारांची संख्या मोठी असल्याने ओवेसी यांच्याकडून अनेक भागात भेठीगाठी देखील घेतल्या जाण्याची शक्यता आहे. 

ग्रामीण भागाचाही दौरा करणार....

यंदाची लोकसभा निवडणूक इम्तियाज जलील यांच्यासह ओवेसी यांच्यासाठी महत्वाची असणार आहे. मागील वेळी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीसोबत असल्याने जलील यांनी शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला होता. मात्र, यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी जलील यांच्या विरोधात मुस्लीम उमेदवार रिंगणात उतरवला आहे. त्यामुळे मागील निवडणुकीत शहरात सर्वाधिक लक्ष देणारे ओवेसी आता ग्रामीण भागाचा देखील दौरा करणार आहेत. आजच्या दौऱ्यात देखील ते ग्रामीण भागात नागरिकांच्या भेठीगाठी घेण्याची शक्यता आहे. 

महायुतीचा उमेदवार ठरेना!

एकीकडे महाविकास आघाडीने चंद्रकांत खैरे आणि एमआयएमने इम्तियाज जलील यांच्या उमेदवारीची घोषणा केली असतानाच, दुसरीकडे महायुतीकडून अजूनही उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही. भाजप आणि शिंदेसेना यांच्यात संभाजीनगरच्या जागेवरून जोरदार रस्सीखेच सुरु असून, त्यामुळे तिढा सुटत नसल्याची माहिती मिळत आहे. महायुतीकडून अनेकजण इच्छुक असून, ज्यात भागवत कराड, अतुल सावे, विनोद पाटील, संदिपान भुमरे यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. त्यामुळे महायुतीकडून कुणाला उमेदवारी जाहीर होणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

Chhatrapati Sambhaji Nagar : सकाळी प्रवेश, रात्री थेट उमेदवारी; संभाजीनगरमध्ये एमआयएमला शह देण्यासाठी आंबेडकरांची खेळी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra ElectionRaj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मलाNashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडाShreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
मोठी बातमी! भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
Embed widget