एक्स्प्लोर

मोठी बातमी! संभाजीनगरसह नांदेड, लातूर जिल्ह्यांवर शिंदे समिती नाराज; पुराव्यांचे आढळलेले प्रमाण कमी

Maratha Reservation : मराठवाड्यात अपेक्षित कुणबी नोंदी सापडत नसल्याने मनोज जरांगे यांनी देखील नाराजी व्यक्त केली होती. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष घालण्याची मागणी केली होती.

छत्रपती संभाजीनगर : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावे यासाठी सरकारने शिंदे समितीच्या मार्फत मराठा कुणबी नोंदी शोधण्याची मोहीम हाती घेतली आहे. मात्र, ज्या मराठवाड्यातून या मोहिमेची सुरवात झाली तिथेच लोकसंख्येच्या तुलनेत मराठा-कुणबी पुराव्यांचे (Maratha Kunbi Evidence) आढळलेले प्रमाण कमी असल्याने शिंदे समिती (Shinde Committee) नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. 'लोकमत'ने याबाबत वृत्त दिले आहे. विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगरसह (Chhatrapati Sambhaji Nagar) नांदेड (Nanded), लातूर (Latur) जिल्ह्यांमध्ये अपेक्षित कुणबी नोंदी सापडत नसल्याने शिंदे समितीने नाराजी व्यक्त केल्याची देखील माहिती मिळत आहे. 

मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने सरकराने शासन स्तरावर सेवानिवृत्त न्या. संदीप शिंदे समितीकडे मराठा कुणबी नोंदी शोधण्याची जबाबदारी दिली आहे. मात्र, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरसह नांदेड, लातूर जिल्ह्यांमध्ये अपेक्षित कुणबी नोंदी सापडत नसल्याने शिंदे समितीने नाराजी व्यक्त केली आहे. तर, नाराजी व्यक्त केल्यानंतर हिंगोली जिल्ह्यातील एका पथकाला छत्रपती संभाजीनगरमधील पुराव्यांची जंत्री पुन्हा तपासण्यासाठी शासनाने पाठविले आहे. विशेष म्हणजे, गेल्या आठवड्यात झालेल्या ऑनलाइन बैठकीत समिती अध्यक्षांनी तीन जिल्ह्यांतील अहवालांच्या फेरतपासणीचे आदेश दिले होते. तर, मराठवाड्यात जवळपास जुन्या 2 कोटी कागदपत्रांची तपासणी करण्यात आली असून, यामध्ये 27 हजार 534 कुणबी नोंदी (Kunbi Records) आढळून आल्या आहेत.

कोणत्या जिल्ह्यात किती नोंदी आढळल्या

छत्रपती संभाजीनगर 
2447887 कागदपत्रांची तपासणी 
1278 नोंदी आढळल्या

जालना
2160615 कागदपत्रांची तपासणी
3318 नोंदी आढळल्या

परभणी 
2119994 कागदपत्रांची तपासणी
2891 नोंदी आढळल्या

हिंगोली
1262219 कागदपत्रांची तपासणी
3468 नोंदी आढळल्या

नांदेड
2568942 कागदपत्रांची तपासणी
1204 नोंदी आढळल्या

बीड 
2381553 कागदपत्रांची तपासणी
13128 नोंदी आढळल्या

लातूर 
2264493 कागदपत्रांची तपासणी
809 नोंदी आढळल्या

धाराशिव 
4185029 कागदपत्रांची तपासणी
1438 नोंदी आढळल्या

मनोज जरांगे यांनी देखील नाराजी व्यक्त केली...

दरम्यान, मराठवाड्यात मराठा कुणबी नोंदी शोधण्याची मोहीम गेल्या काही दिवसांपासून प्रशासनाकडून सुरु आहे. मात्र, मराठवाड्यातील मराठा समाजाच्या लोकसंख्येच्या तुलनेत मराठा-कुणबी पुराव्यांचे आढळलेले प्रमाण कमी असल्याचे मनोज जरांगे यांनी देखील काही दिवसांपूर्वी आपल्या सभेतून सांगितले होते. यासाठी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घालण्याची मागणी देखील जरांगे यांनी केली होती. 

शिंदे समती रद्द करा, भुजबळांची मागणी...

एकीकडे शासनाकडून मराठा कुणबी नोंदी शोधून, कुणबी प्रमाणपत्र देण्याची मोहीम सुरु आसताना याला अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी मात्र विरोध केला आहे. कुणबी नोंदी शोधून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रकिया राबवणाऱ्या न्या. संदीप शिंदे समिती तात्काळ बरखास्त करावी, अशी मागणी भुजबळ यांनी केली आहे. सोबतच, मागील दोन महिन्यांत वाटप करण्यात आलेले कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्याची मागणीही भुजबळ यांनी केली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा फैसला होणार! सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे राज्याचं लक्ष

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget