एक्स्प्लोर

Rohit Pawar : ईडीच्या जप्तीच्या कारवाईनंतर रोहित पवारांची कन्नड साखर कारखान्याला भेट; कामगारांशी संवाद साधणार

Rohit Pawar visit to Kannad Sugar Factory : ईडीच्या कारवाईनंतर स्वतः रोहित पवार आता या कारखान्याला भेट देण्यासाठी पोहचले आहेत. 

Rohit Pawar visit to Kannad Sugar Factory : आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या बारामती ॲग्रोमार्फत (Baramati Agro) चालवण्यात येणाऱ्या छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) कन्नड साखर कारखान्यावर (Kannad Sugar Factory) चार दिवसांपूर्वी ईडीने (ED) जप्तीची कारवाई केली होती. दरम्यान, या कारवाईनंतर आज त्याच कारखान्याला भेट देण्यासाठी रोहित पवार कन्नडला पोहचले आहेत. काही वेळापूर्वीच त्यांचे हेलिकॉप्टर कन्नडमध्ये पोहचले आहे. या भेटीदरम्यान रोहित पवार हे ऊस उत्पादक शेतकरी आणि कामगारांशी संवाद साधणार असल्याची माहिती मिळत आहे. 

कन्नड येथील बारामती ॲग्रो युनिट 2 हा साखर कारखाना सक्त वसुली संचालनालयाने (इडी) जप्त केल्याची बातमी पसरल्याने खळबळ उडाली. मात्र, अद्याप कारखान्याचे ऊस गाळप सुरळीतपणे सुरु आहे. तर, “ही कारवाई पूर्णतः बेकायदा असून, याविरोधात न्यायालयात दाद मागितली जाईल. त्यामुळं कर्मचाऱ्यांनी कोणतीही काळजी करु नये. पण प्रश्न इतकाच आहे की, अशी कारवाई केवळ माझ्याविरोधातच का? पण सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना आज तरी असा प्रश्न विचारण्यात काही अर्थ नाही, अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली होती. दरम्यान, ईडीच्या कारवाईनंतर स्वतः रोहित पवार आता या कारखान्याला भेट देण्यासाठी पोहचले आहेत. 

काय आहे या कारखान्याचा इतिहास?

कन्नड सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम तत्कालीन संचालक मंडळाने 2001 मध्ये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत माजी आमदार तेजस्वी जाधवांच्या नेतृत्वाखाली निवडून आलेले संचालक मंडळ बरखास्त करून हा कारखाना अवसायनात गेला. या कारखान्यावर 2007  मध्ये माजी आमदार नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली अवसायक मंडळ आले. त्यांनी कारखाना सुरु केला, मात्र तो चालु शकला नाही. त्यानंतर पुन्हा निवडणुक होऊन आलेल्या संचालक मंडळाने काही साखर विक्री करून बँकेची काही रक्कम भरली. मात्र  कारखान्यावरील कर्जामुळे अवसायनात गेल्यानंतर शिखर बँकेने ऑक्टोबर 2012 मध्ये कारखान्याच्या ताब्यातील 161 एकर जमिनीसह विक्री केला. हा कारखाना आमदार रोहीत पवार यांच्या बारामती ॲग्रोने 50  कोटी 20 लाख रुपयांना खरेदी केला. हा कारखाना विक्री करतांना घोटाळा झाल्याचे आरोप कामगार संघटनेने केले होते. त्यानंतर 5 जानेवारी 2024 रोजी सक्त वसुली संचालनालयाच्या पथकाने कारखान्यावर धाड टाकुन काही कागदपत्र चौकशी साठी ताब्यात घेतल्याची चर्चा होती. बारामती ॲग्रो युनिट 2 हा साखर कारखाना सक्त वसुली संचालनालयाने जप्त केल्याचे सांगितले जातय. पण कारखान्याच्या गळीत हंगामावर आणि कार्यप्रणालीवर कुठलाही परिणाम झालेला नाही.

इतर महत्वाच्या बातम्या : 

Rohit Pawar : मोठी बातमी : रोहित पवारांना ED चा सर्वात मोठा झटका, बारामती अॅग्रोने खरेदी केलेला कारखाना जप्त!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed : सुटीवर असलेल्या पोलिसाचा कर्तव्यदक्षपणा, चोराकडे सापडले 63 मोबाईल, आंतरराज्यीय टोळीचा छडा लागला
सुटीवर असलेल्या पोलिसाचा कर्तव्यदक्षपणा, चोराकडे सापडले 63 मोबाईल, आंतरराज्यीय टोळीचा छडा लागला
न्या. आलोक आराधे मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायमूर्ती; राजभवनमध्ये शपथविधी संपन्न
न्या. आलोक आराधे मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायमूर्ती; राजभवनमध्ये शपथविधी संपन्न
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
फाडफाड इंग्रजी बोलणारं राज्य कोणतं? भारताचा जगात कितवा क्रमांक; काय सांगतय सर्वेक्षण
फाडफाड इंग्रजी बोलणारं राज्य कोणतं? भारताचा जगात कितवा क्रमांक; काय सांगतय सर्वेक्षण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 21 January 2024Special Report Donald Trump : नागरिकत्व ते मंगळवार स्वारी...निर्णयांचा धडाका; कशी असेल ट्रम्प सरकारची भविष्यातील वाटचाल?Special Report Walmik Karad CCTV : आवादा कंपनीला खंडणी मागितली 'त्या' दिवशीचं सीसीटीव्ही फुटेजSpecial Report Sanjay Shirsat VS Abdul Satta : शिरसाट विरुद्ध अब्दुल सत्तार वादाचा नवा अंक, पालकमंत्री शिरसाट आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : सुटीवर असलेल्या पोलिसाचा कर्तव्यदक्षपणा, चोराकडे सापडले 63 मोबाईल, आंतरराज्यीय टोळीचा छडा लागला
सुटीवर असलेल्या पोलिसाचा कर्तव्यदक्षपणा, चोराकडे सापडले 63 मोबाईल, आंतरराज्यीय टोळीचा छडा लागला
न्या. आलोक आराधे मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायमूर्ती; राजभवनमध्ये शपथविधी संपन्न
न्या. आलोक आराधे मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायमूर्ती; राजभवनमध्ये शपथविधी संपन्न
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
फाडफाड इंग्रजी बोलणारं राज्य कोणतं? भारताचा जगात कितवा क्रमांक; काय सांगतय सर्वेक्षण
फाडफाड इंग्रजी बोलणारं राज्य कोणतं? भारताचा जगात कितवा क्रमांक; काय सांगतय सर्वेक्षण
उद्धव ठाकरे-शरद पवार लवकरच केंद्रात मोदींसोबत दिसतील; माजी मंत्र्यांचा खळबळजनक दावा
उद्धव ठाकरे-शरद पवार लवकरच केंद्रात मोदींसोबत दिसतील; माजी मंत्र्यांचा खळबळजनक दावा
संजय राऊतांना काळा फासणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस; शिंदेंच्या शिवसेना शहरप्रमुखाची घोषणा 
संजय राऊतांना काळा फासणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस; शिंदेंच्या शिवसेना शहरप्रमुखाची घोषणा 
Manoj Jarange Patil : ही धनंजय मुंडेंची टोळी, तिचा नायनाट होणे गरजेचे; CCTV फुटेज समोर येताच मनोज जरांगेंनी सगळंच काढलं
ही धनंजय मुंडेंची टोळी, तिचा नायनाट होणे गरजेचे; CCTV फुटेज समोर येताच मनोज जरांगेंनी सगळंच काढलं
Saif ali khan हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
Embed widget