Chhatrapati Sambhaji Nagar: धक्कादायक! घरमालकांकडून विद्यार्थ्यांवर चाकू हल्ला, छत्रपती संभाजीनगर हादरलं
Chhatrapati Sambhaji Nagar : घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णालयात भेट देऊन जखमींची माहिती घेतली असल्याचे समोर येत आहे.
![Chhatrapati Sambhaji Nagar: धक्कादायक! घरमालकांकडून विद्यार्थ्यांवर चाकू हल्ला, छत्रपती संभाजीनगर हादरलं Maharashtra News Chhatrapati Sambhaji Nagar Knife attack on students by landlords Incident in Chhatrapati Sambhaji Nagar Chhatrapati Sambhaji Nagar: धक्कादायक! घरमालकांकडून विद्यार्थ्यांवर चाकू हल्ला, छत्रपती संभाजीनगर हादरलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/14/98d02ddd39b86b0863fe16809ca57bcd1684074953868729_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Chhatrapati Sambhaji Nagar Crime News : भाड्याच्या घरात राहणाऱ्या चार विद्यार्थ्यांवर घरमालकाने दारू पिऊन चाकूने हल्ला केल्याची घटना छत्रपती संभाजीनगरात (Chhatrapati Sambhaji Nagar) घडलीय. या घटनेत सैनिकी पूर्व शिक्षण घेणारे चार विद्यार्थी जखमी झाले असून, त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धक्कादायक म्हणजे घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर रक्ताचा सडा पाहायला मिळत आहे. याप्रकरणी अद्याप पोलिसात गुन्हा दाखल झाला नसल्याचे समोर आले आहे. मात्र घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णालयात भेट देऊन जखमींची माहिती घेतली असल्याचे समोर येत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फुलंब्री तालुक्यातल्या वाघोळा येथील चार विद्यार्थी सैनिकी पूर्व शिक्षण घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडकोमध्ये राहत होते. ज्या भाड्याच्या घरामध्ये ते राहत होते त्या मालकांनी तुमच्या रूमचा दरवाजा बंद करा असे सांगितले. त्यावेळी विद्यार्थ्यांनी आम्ही स्वयंपाक करून लगेच दरवाजा बंद करतो असे सांगितल्यानंतर शाब्दिक वाद झाला. दरम्यान याचवेळी घरमालकाच्या मुलाने चाकू घेऊन विद्यार्थ्यांवर हल्ला केला. ज्यात चार जण जखमी झाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)