Chhatrapati Sambhaji Nagar: बहिणीने आंतरजातीय विवाह केल्याचा राग, चिमुकल्या भाच्यासोबत महिलेचं अघोरी कृत्य
Chhatrapati Sambhaji Nagar : यात पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली असून, तिचा पती मात्र फरार झाला आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar News: पाच वर्षांपूर्वी बहिणीने आंतरजातीय विवाह केल्याचं राग मनात ठेवत, एका महिलेने पतीच्या मदतीने बहिणीच्या दोन वर्षाच्या मुलाचा कैचीने सुन्ता केल्याचं संतापजनक प्रकार छत्रपती संभाजीनगर शहरात (Chhatrapati Sambhaji Nagar City) समोर आला आहे. पीडित मुलाची आई घरी आल्यावर हा प्रकार उघडकीस आला. तर 25 एप्रिल रोजी बायजीपुरा भागात ही घटना घडली असून, या प्रकरणी 7 मे रोजी जिन्सी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली असून, तिचा पती मात्र फरार झाला आहे.
या बाबत सलमा (वय 24, काल्पनिक नाव) महिलेने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, त्या अंबरहिल परिसरात आपल्या पतीसह राहतात. दरम्यान पाच वर्षांपूर्वी त्यांनी आंतरजातीय विवाह केला होता. मात्र लग्न झाल्यावर पतीकडे त्यांचे नाव नीता (काल्पनिक नाव) ठेवण्यात आले. त्यांना दोन वर्षांचा मुलगा आहे. पण सर्व काही सुरळीत सुरु असताना, 25 एप्रिलला दोघांमध्ये भांडण झाले. त्या रागातून नीता दोन वर्षाच्या मुलासह आपली बहिण फातेमा आणि मेहुणा शमशेर (दोन्ही नावे काल्पनिक) यांच्या घरी गेली.
बहिणीकडे आल्यावर नीता काम पाहण्यासाठी तीला सोबत घेऊन बाहेर गेली होती. दोन्ही बहिणी काम पाहण्यासाठी गेल्याने नीताचं दोन वर्षांचा मुलगा शमशेरजवळ घरीच होता. दरम्यान काही वेळाने फातेमा नीताला सोडून घरी आली. घरी आल्यावर तिने आपल्या पतीच्या मदतीने बहिणीच्या दोन वर्षाच्या मुलाची कैचीने सुन्ता केली. यामुळे होणाऱ्या त्रासामुळे मुलगा जोराने किंचाळत रडत होता. पण निर्दयी पती-पत्नीला काहीच फरक पडला नाही. दरम्यान एक तासाने नीताही घरी पोहचली. तेव्हा तिचा मुलगा रडत होता. तिने जवळ घेऊन त्याला समजावले. मात्र, तो रडायचा थांबत नव्हता. तर त्याच्या गुप्तांगाला गंभीर दुखापत दिसून आली. तेव्हा फातेमा व शमशेर यांनी तिला मुलाची सुन्ता केल्याचे सांगितले. तसेच, हा प्रकार कोणाला सांगितला, तर जीवे मारण्याची धमकी दिली.
अखेर सर्व हकिकत पतीला सांगितली.
घडलेला प्रकार कोणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी फातेमा व शमशेर यांनी नीताला दिली होती. तसेच तिचा मोबाइलही हिसकावून घेतला. मात्र काही दिवसांनी नीता मुलासह पतीकडे आली. तसेच तिने सर्व हकिकत पतीला सांगितली. त्यानंतर 7 मे रोजी या प्रकरणी जिन्सी ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तत्काळ गुन्हा दाखल करीत फातेमाला अटक केली. न्यायालयाने तिला 9 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तर तिचा पती शमशेर हा रेकॉर्डवरील आरोपी असून, सध्या तो फरार झाला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: