एक्स्प्लोर

वाहन पकडल्यावर होणारे वाद टाळण्यासाठी 'हे' करा; वाहतूक पोलिसांनी सुचवले पर्याय

Traffic Rules : वाद टाळण्यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीण पोलिसांकडून एक महत्त्वाचे आवाहन करण्यात आले आहे.

Traffic Rules : वाहतूक पोलिसांनी (Traffic Police) वाहन पकडल्यावर अथवा कारवाई केल्यावर अनेकदा पोलीस आणि वाहनचालक यांच्यात वाद होतात. त्यातच अशात सरकारने वाहतूक दंड बऱ्याच प्रमाणात वाढवल्याने असे होणारे वाद आणखीच वाढले आहे. त्यामुळे असे वाद टाळण्यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीण पोलिसांकडून एक महत्वाचे आवाहन करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) ग्रामीण पोलीस दलातील वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी याबाबत एक प्रेस नोट काढली आहे. ज्यात त्यांनी महत्वाचे आवाहन केले आहे. 

पवार यांनी दिलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे की, सध्या आपल्या सरकारने वाहतूक चालान (दंड) बऱ्याच प्रमाणात वाढवला आहे. त्यामुळे नागरिक आणि पोलिस यामध्ये वाद वाढत आहे. पण हा दंड सरकारने वाढवला आहे, पोलिसांनी नाही, हे नागरिकांनी लक्षात घेतले पाहिजे. म्हणजे पोलीस नागरिकांकडून वाहतूक नियम भंग झाले वर जो E-chalan मशीन द्वारे दंड आकारतात तो सरकार जमा होतो. तर नागरिकांकडून वाहतूक नियम भंग झाला की, दंड आकरण्याचे काम सरकारने पोलिसाना दिले आहे. त्यामुळे एक तर वाहतूक नियम पाळा, नाहीतर दंड भरा, पण आपली चूक असताना पोलिसांशी वाद घालत बसू नका. त्या पोलिसांना दिवसभरात आपल्यासारख्या किती तरी नागरिकांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे आपल्याला दंड भरावा लागू नये आणि पोलिसांशी वाद घालण्याचे टाळण्यासाठी खालील वाहतूक नियम पाळा असे आवाहन पोलिसांनी केले आहे. 

'हे' नियम पाळा...

1) आपल्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तर सर्वप्रथम काढून घ्या, त्याशिवाय गाडी चालवू नका.
2) टू व्हीलरवर जाताना गाडी चालवणाऱ्याने हेल्मेट घाला आणि शक्य झाले तर गाडीमागे बसणाऱ्या व्यक्तीला देखील हेल्मेट घालायला सांगा.
3) गाडी चालवताना आपल्या गाडीची कागदपत्रे तसेच ड्रायव्हिंग लायसन्स, सोबत बाळगावे.
4) गाडीचा इन्शुरन्स अद्ययावत ठेवा, संपला असेल तर पुन्हा अपडेट करुन घ्यावा. 
5) आपली गाडी शक्यतो दुसऱ्या व्यक्तीला चालवण्यासाठी देऊ नका आणि जर द्यावीच लागली तर त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे का ते चेक करुनच द्यावी.
6) आपल्या टू व्हीलरवर तिसरा व्यक्ती बसवू नका.
7) आपली गाडी जर आपण एखाद्या व्यक्तीला विकली असेल किंवा विकत असाल तर ती गाडी त्या व्यक्तीने त्याच्या नावावर करुन घेतली आहे का? ते पाहा, कारण जर ती गाडी तुमच्याच नावावर राहिली तर त्या गाडीवर पडणारा ऑनलाईन दंड आपल्या नावावर आपल्या घरच्या पत्यावर येणार,(वाहतूक कोर्टचे पत्र आपल्या घरी येणार) 
8) लहान मुलांना गाडी चालवण्यास देऊ नका, जोपर्यंत मुलगा ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याच्या नियमात बसत नाही, तोपर्यंत त्यास गाडी चालवण्यास देऊ नका.
9) गाडी चालवताना सिग्नल कटिंग करु नका, सिग्नलला कॅमेरा असतो, आपल्या वाहनावर CCTV कॅमेरामार्फत दंड पडतो आणि आपल्या गाडी नंबरवरुन आपल्या घरच्या पत्यावर येतो.
10) सिग्नलला झेब्रा क्रॉसिंगवर वाहन थांबवू नका.
11) लाल सिग्नल लागते वेळी गाडीचा वेग वाढवू नका, पिवळा सिग्नल लागताच गाडीचा वेग कमी करुन गाडी थांबवा.
12) जवळचा रस्ता पडेल म्हणून उलट्या दिशेने (Wrong Side) ने वाहन चालवू नका.
13) गाडी नो पार्किंग एरिया किंवा फुटपाथवर पार्क करु नका. पार्किंग असलेल्या ठिकाणी गाडी पार्क करा.
14) गाडी चालवण्या आगोदर गाडीच्या टायर मधील हवा आणि पेट्रोल चेक करा, कमी असेल तर भरून घ्यावे.
15) वेळीच गाडीची सर्व्हिसिंग करुन घ्या म्हणजे गाडी रस्त्यात कधी बंद पडू नये याची काळजी घावी.
16) जड वाहतूक दिलेल्या वेळेत आणि दिलेल्या रोडने घेऊन जावा.
17) फोर व्हीलर, किंवा मोठी गाडी चालवताना नेहमी सीट बेल्टचा वापर करावा.
18) गाडीची नंबर प्लेट फॅन्सी असेल किंवा तुटलेली असेल तर ती बदलून टाका, व्यवस्थित मोठ्या अक्षरात गाडी नंबर दिसेल अशी नंबर प्लेट गाडीला लावा.
19) खाजगी गाड्यावर पोलीस किंवा इतर काही मजकूर लिहू नका.
20) आपल्या वाहनाला दोन्ही बाजूला आरसे असणे गरजेचे आहे.
21) आपल्या वाहनाला कर्कश्य हॉर्न बसवू नका.
22) चारचाकीला डार्क काळ्या काचा बसवू नका, गाडीमधील माणूस बाहेरच्या व्यक्तीला दिसेल अशी काच बसवावी
23) गाडीची फ्रंट लाईट आणि बॅक लाईट आणि पुढील व मागील इंडिकेटर बंद असेल किंवा तुटलेले असेल तर ते दुरुस्त करुन घ्यावे.
24) गाडीवर किंवा गाडीमध्ये बसून राहून गाडी रस्त्यावर थांबवून मागून येणाऱ्या वाहतुकीस अडथळा निर्माण करु नका.

अन् वादही होणार...

आपण जर वरील सर्व नियम आपल्या वाहनांच्या बाबतीत पाळत असाल, तर आपल्या हातून कधीही वाहतूक नियमांचा भंग होणार नाही. तसेच आपल्याला कोणताही दंड भरावा लागणार नाही. जर आपण कोणताही नियम मोडला तर वाहतूक पोलिसांना दोष देऊ नका, दंड भरा, आणि निघून जा, आणि यावेळी दंडाची रक्कम सरकारने बऱ्याच प्रमाणात सरकारने वाढवली आहे. ती रक्कम सामन्य नागरिकाला भरणे कठीण वाटते, त्यामुळे आपण आपले वाहन योग्य रितीने वापरा. म्हणजेच नियम तुटणार नाही आणि वादही होणार नाही. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

Chhatrapati Sambhaji Nagar Violence: छत्रपती संभाजीनगरच्या राड्याचा मास्टर माईंड पोलिसांच्या रडारवर; तरुणांना भडकावल्याचा संशय

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
Embed widget