एक्स्प्लोर

Bees Attack: वेरूळ लेणी परिसरात मधमाशांचा पर्यटकांवर हल्ला; 15 ते 20 जण जखमी

Bees Attack In Ellora Caves : विशेष म्हणजे वेरूळ लेणीच्या परिसरात पर्यटकांवर मधमाशांच्या हल्ल्याची गेल्या 15 वर्षांतील ही तिसरी घटना आहे. 

Bees Attack In Ellora Caves : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील (Chhatrapati Sambhaji Nagar District) जगप्रसिद्ध वेरूळ लेणीत (Ellora Caves) मधमाशांनी शनिवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास अचानक पर्यटकांवर हल्ला चढवला. ज्यात 15 ते 20  पर्यटक जखमी झाले आहे. तर सर्व जखमी पर्यटकांवर वेरूळ येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले. अचानक झालेल्या मधमाशांच्या हल्ल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. तर प्रत्येकजण आपला जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागला होता. विशेष म्हणजे वेरूळ लेणीच्या परिसरात पर्यटकांवर मधमाशांच्या हल्ल्याची गेल्या 15 वर्षांतील ही तिसरी घटना आहे. 

शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवशी वेरूळ लेणी पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक असते. तर काल देखील लेणी परिसरात पर्यटकांची चांगली गर्दी होती. दरम्यान 16 क्रमांकाची कैलास लेणी पाहत असताना अचानक आग्या मोहळाच्या माशांनी पर्यटकांवर हल्ला चढवला. त्यामुळे एकच धावपळ उडाली. अचानक झालेल्या आग्या मोहळाच्या हल्ल्याने पर्यटक आरडाओरडा करू लागले. तर प्रत्येकजण जीव मुठीत धरून सैरावैरा पळू लागले. तर मधमाशांच्या हल्ल्यात पर्यटक रघुनंदन कडापा, कार्तिका कडापा, स्पंदना कडापा, सहाना कड़ापा, पलानीस्वामी, रेखा कुमारी यांच्यासह 15  ते 20 पर्यटक जखमी झाले. 

जखमी पर्यटक दोन तास निरीक्षणाखाली

मधमाशांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या पर्यटकांना वेरूळ येथील शेख आसिफ, संजय बनकर, भास्कर घाडगे, मनोज मडकर यांनी तत्काळ वेरूळ येथील प्राथमिक आरोग्य रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी श्रेयस वाघमारे यांनी सर्व जखमींच्या अंगावरील मधमाशांनी चावा घेतलेले काटे काढले व आईस पॅक लावून उपचार केले. तसेच याची माहिती मिळताच अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी जी. एम. कुंडलीवार यांनीही येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जखमी झालेल्या पर्यटकांची भेट घेऊन पाहणी केली. तसेच जखमी पर्यटकांना दोन तास निरीक्षणाखाली ठेवण्याचे सांगितले, त्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. 

पुरातत्त्व विभागाने दक्षता घेण्याची गरज 

वेरूळ येथील जगप्रसिद्ध लेण्या पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक येत असतात. मात्र येथे असलेल्या 34 लेण्यांपैकी बऱ्याच लेण्यात आग्या मोहळ बसलेले आहे. दरम्यान 10 वर्षांपूर्वी लेणी क्रमांक 29 व 16 मध्ये मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात विदेशी पर्यटक गंभीर जखमी झाले होते. त्यापूर्वी 2007 मध्येही आग्यामोहळाने पर्यटकांवर हल्ला चढवल्याची घटना समोर आली होती. आता पुन्हा तिसऱ्यांदा अशीच घटना समोर आली आहे. त्यामुळे पुरातत्त्व विभागाने दक्षता घेण्याची गरज असून, याकडे त्यांचे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचा आरोप केला जात आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

इन्स्टाग्रामवर लायटर पिस्तुल घेऊन व्हिडीओ बनवणे पडलं महागात; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rainfall: महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
Maharashtra Assembly Election 2024 : मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
Dhule Crime News : धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
Govinda Gunfire: गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 11 AM : 1 ऑक्टोबर 2024 :  ABP MajhaMVA Seat Sharing : महाविकास आघाडी याच आठवड्यात जागावाटप पूर्ण करणारABP Majha Headlines :  11 AM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut Full PC : राज्यातील सरकार बैलपुत्र, बुद्धीही बैलाचीच; गोमातेबाबतच्या निर्णयावरून टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Rainfall: महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
Maharashtra Assembly Election 2024 : मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
Dhule Crime News : धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
Govinda Gunfire: गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
Mumbai Crime News : क्षुल्लक कारणावरुन वादाची ठिणगी, 80 वर्षीय बापानं लेकाला संपवलं, दादरमध्ये धक्कादायक प्रकार
क्षुल्लक कारणावरुन वाद, बापानं लेकाला संपवलं, मुंबईतील दादरमध्ये खळबळजनक घटना
Govinda Gunfire: रिव्हॉल्व्हरची गोळी लागून गोविंदाच्या पायातून प्रचंड रक्तस्त्राव, तातडीचं ऑपरेशन, कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
अभिनेता गोविंदा रिव्हॉल्व्हरची गोळी लागून जखमी, कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Govinda Gunfire: अभिनेता गोविंदा बंदुकीची गोळी लागून जखमी, गोळी पायात नेमकी कशी शिरली, संभ्रमात टाकणारा सस्पेन्स
अभिनेता गोविंदाला रिव्हॉल्व्हरची गोळी कशी लागली? पहाटेच्या वेळचा संभ्रमात टाकणारा सस्पेन्स
'15 लाख रुपये दे नाही तर...', पिस्तुलाचा धाक दाखवून व्यापाऱ्यास लुटलं, बारामतीतील धक्कादायक प्रकार
'15 लाख रुपये दे नाही तर...', पिस्तुलाचा धाक दाखवून व्यापाऱ्यास लुटलं, बारामतीतील धक्कादायक प्रकार
Embed widget