एक्स्प्लोर

Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगरमधील मास कॉपीप्रकरणी त्रिस्तरीय चौकशी समितीची नियुक्ती

Chhatrapati Sambhaji Nagar : डॉ. भालचंद्र वायकर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी कमिटी नियुक्ती करण्यात आली असून, 24  तासात चौकशी कमिटी अहवाल देणार आहेत. 

Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षेत चक्क मास कॉपी सुरु असल्याचा प्रकार समोर आला होता. सकाळी परीक्षेवेळी विद्यार्थी कोरी पानं सोडून, पुन्हा सायंकाळी विद्यार्थ्यांना पेपर सविस्तर लिहिण्यासाठी दिला जात असल्याचा प्रकारही समोर आला होता. दरम्यान आता याची गंभीर दखल विद्यापीठ प्रशासनाने घेतली असून, मास कॉपीप्रकरणी त्रिस्तरीय चौकशी समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. भालचंद्र वायकर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी कमिटी नियुक्ती करण्यात आली असून, 24 तासात चौकशी समिती अहवाल देणार आहेत. 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेंद्रा गावात वाल्मीकराव दळवी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्राशेजारी मास कॉपी सुरु असल्याचा आरोप करण्यात आला होता. फोटो स्टुडिओ आणि झेरॉक्स दुकानदारांकडून हे सर्व पेपर ऑपरेट केले जात होते. यामध्ये हे दुकानदार फक्त 300 ते 500 रुपये घेऊन विद्यार्थ्यांना मासकॉपी पुरवत असल्याचा आरोप झाला आहे. तर एका विद्यार्थिनीने या सर्व प्रकरणाचा भांडाफोड केला आहे. ज्यात मास कॉपी करतानाचा व्हिडिओ समोर आला होता. त्यानंतर माध्यमांमध्ये बातम्या येताच विद्यापीठ प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. 

तसेच विद्यापीठाने या मास कॉपीप्रकरणी त्रिस्तरीय चौकशी समितीची नियुक्ती केली आहे. डॉ. भालचंद्र वायकर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी कमिटी नियुक्ती करण्यात आली असून, 24 तासात चौकशी कमिटी अहवाल देणार आहेत. त्यामुळे या महाविद्यालयाची मान्यता रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे किंवा परीक्षा सेंटर हलवण्याची शक्यता असून, त्या परीक्षा केंद्रावर झालेले सर्व पेपर पुन्हा घेण्याचाही विचार होऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे डॉ. भालचंद्र वायकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेली चौकशी समिती काय अहवाल देणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. 

फोटो स्टुडिओ, झेरॉक्स दुकानदार करतात पेपर ऑपरेट 

शेंद्रा गावात वाल्मीकराव दळवी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे परीक्षा केंद्र असून, याच ठिकाणी मास कॉपी झाल्याचा आरोप केला जात आहे. तर परीक्षा केंद्राच्या शेजारी ए. के. फोटो स्टुडिओ आणि झेरॉक्स दुकान असून, त्यांच्याकडून या सर्व परीक्षाच्या पेपर सेटिंग केली जात असल्याचा देखील आरोप होत आहे. यासाठी दुकानदार मुलांकडून 300 ते 500 रुपये घेत होते. विशेष म्हणजे संस्थाचालकाच्या मदतीने पेपर लिहण्याची ही विशेष 'सोय' उपलब्ध करुन दिली जात असल्याचा देखील आरोप होत आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

काय सांगता! तीनशे रुपयात मिळतो पेपर लिहून, छत्रपती संभाजीनगरमध्ये भरतोय शिक्षणाचा बाजार

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ratnagiri Rain: गुहागरमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग, शहरातील मुख्य बाजारपेठेत पाणीच पाणी, भरतीची वेळ महत्त्वाची, प्रशासन सतर्क
गुहागरमध्ये पावसाचा कहर,मुख्य बाजारपेठेत पाणी शिरलं, खबरदारी म्हणून 10 जणांचं स्थलांतर
Majha Impact: माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद;  आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद; आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
Pench Tiger Reserve : तोतलाडोह धरणात अवैध मासेमारी करणार्‍यांवर मोठी कारवाई; दोन बोटीसह मासेमारी साहित्य जप्त
तोतलाडोह धरणात अवैध मासेमारी करणार्‍यांवर मोठी कारवाई; दोन बोटीसह मासेमारी साहित्य जप्त
Maharashtra Weather Update :राज्यात उद्या मुसळधार पावसाचा इशारा, उद्या तुमच्या  जिल्ह्यात कोणता अलर्ट?
राज्यात उद्या मुसळधार पावसाचा इशारा, उद्या तुमच्या जिल्ह्यात कोणता अलर्ट?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange Full Speech : भुजबळ मला गावठी म्हणतात...मला लग्न करायचे का तुझ्या सोबत?Sharad Pawar Speech Sangli : येणाऱ्या काळात रोहितला ताकद द्या, आबांच्या लेकासाठी खुद्द पवार मैदानातRamdas Athwale On Chandrakant Patil | निमंत्रण स्वीकारूनही गैरहजेरी! चंद्रकांत पाटलांवर आठवले नाराजPune Hit And Run Case | खडकी हिट अँण्ड रनमधील आरोपीला पुणे पोलिसांनी केली अटक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ratnagiri Rain: गुहागरमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग, शहरातील मुख्य बाजारपेठेत पाणीच पाणी, भरतीची वेळ महत्त्वाची, प्रशासन सतर्क
गुहागरमध्ये पावसाचा कहर,मुख्य बाजारपेठेत पाणी शिरलं, खबरदारी म्हणून 10 जणांचं स्थलांतर
Majha Impact: माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद;  आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद; आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
Pench Tiger Reserve : तोतलाडोह धरणात अवैध मासेमारी करणार्‍यांवर मोठी कारवाई; दोन बोटीसह मासेमारी साहित्य जप्त
तोतलाडोह धरणात अवैध मासेमारी करणार्‍यांवर मोठी कारवाई; दोन बोटीसह मासेमारी साहित्य जप्त
Maharashtra Weather Update :राज्यात उद्या मुसळधार पावसाचा इशारा, उद्या तुमच्या  जिल्ह्यात कोणता अलर्ट?
राज्यात उद्या मुसळधार पावसाचा इशारा, उद्या तुमच्या जिल्ह्यात कोणता अलर्ट?
Rajinder Khanna : माजी रॉ प्रमुख राजिंदर खन्नांसाठी सरकारनं तयार केलं नवीन पद; अजित डोवालांसाठी संदेश आहे का?
माजी रॉ प्रमुख राजिंदर खन्नांसाठी सरकारनं तयार केलं नवीन पद; अजित डोवालांसाठी संदेश आहे का?
Nashik Crime : महाविद्यालयातील शिपायाचा प्रताप; पालक, व्यवस्थापनाची तब्बल 44 लाखांची फसवणूक
महाविद्यालयातील शिपायाचा प्रताप; पालक, व्यवस्थापनाची तब्बल 44 लाखांची फसवणूक
शहीद जवान प्रवीण जंजाळ यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार, मोरगाव भाकरे ग्रामस्थांकडून भावपूर्ण अखेरचा निरोप
शहीद जवान प्रवीण जंजाळ यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार, मोरगाव भाकरे ग्रामस्थांकडून भावपूर्ण अखेरचा निरोप
Sharad Pawar NCP : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दिलासा; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय!
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दिलासा; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय!
Embed widget