नामांतराविरोधात 11 हजार 767 आक्षेप अन् समर्थनात 35 अर्ज; आक्षेप नोंदवण्यासाठी शेवटचे नऊ दिवस
Chhatrapati Sambhaji Nagar: आता सुटीचे दिवस वगळून फक्त नऊ दिवस समर्थन व आक्षेप अर्ज दाखल करण्यासाठी शिल्लक आहेत.
Chhatrapati Sambhaji Nagar News: औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्याचे नाव बदलून आता छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) करण्यात आला आहे. मात्र या नामांतराच्या शासन निर्णयाविरोधात विभागीय आयुक्तालयात 27 मार्चपर्यंत आक्षेप, हरकती नोंदविण्याची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे नामांतराविरोधात आणि समर्थनात असे दोन्ही बाजूने अर्ज दाखल करण्यात येत आहे. दरम्यान सोमवारी (13 मार्च) सायंकाळपर्यंत विभागीय आयुक्त कार्यालयात 11 हजार 767 आक्षेप, हरकतींची नोंद झाली. तर छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनार्थ 35 अर्ज दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे आता सुट्टीचे दिवस वगळून फक्त नऊ दिवस समर्थन आणि आक्षेप अर्ज दाखल करण्यासाठी शिल्लक आहेत.
छत्रपती संभाजीनगरच्या नामांतराच्या निर्णयाला कुठे विरोध होत आहे, तर कुठे समर्थन केले जात आहे. दरम्यान नामांतराविरोधात 27 मार्चपर्यंत आक्षेप, हरकती नोंदवण्याची मुदत प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे औरंगाबाद नामांतर विरोधी कृती समितीकडून आक्षेप, हरकतीचे अर्ज दाखल करण्यात येत आहे. यासाठी विशेष कॅम्प घेतले जात आहे. त्यामुळे आतापर्यंत नामांतराविरोधात 11 हजार 767 आक्षेप दाखल झाले आहे. तर दुसरीकडे सोमवारपासून समर्थनात देखील अर्ज विभागीय आयुक्त कार्यलयात दाखल करण्यात येत आहे. ज्यात पहिल्या दिवशी समर्थनार्थ 35 अर्ज दाखल करण्यात आले आहेत. तर हा आकडा आज वाढण्याची शक्यता आहे. तर विरोधात देखील मोठ्याप्रमाणावर आक्षेप दाखल करण्यात येत आहे.
आक्षेप नोंदवण्यासाठी शेवटचे नऊ दिवस शिल्लक...
महसूल आणि वनविभागाने औरंगाबाद विभागाऐवजी छत्रपती संभाजीनगर नामांतराचा निर्णय घेत, तसे राजपत्र काढले होते. मात्र या निर्णयावर आक्षेप किंवा हरकती असल्यास त्या 27 मार्चपर्यंत छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल करण्याचा पर्याय शासनाने दिला आहे. त्यामुळे नामांतराच्या विरोधात आणि समर्थनात अर्ज विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल होत आहे. तर हे अर्ज दाखल करण्यासाठी सुटीचे दिवस वगळून फक्त नऊ दिवस शिल्लक राहिले आहे. त्यामुळे आता दोन्ही बाजूने आणखी मोठ्याप्रमाणावर अर्ज येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे मुदतीनंतर आलेल्या आक्षेप, समर्थन अर्जाचा विचार केला जाणार नाही.
'आय लव्ह छत्रपती संभाजीनगर'चे स्टिकर
ठाकरे गट शिवसेनेच्या वतीने गुलमंडीवर 'आय लव्ह छत्रपती संभाजीनगर'चे स्टिकर विविध घर आणि दुकानांवर लावण्याचा अनोखा उपक्रम शिवसेना (ठाकरे गट) जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी राबवण्यात आला. 'छत्रपती संभाजीनगर आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे' असा घोषणा देखील यावेळी देण्यात आल्याचे पाहायला मिळाले.
इतर महत्वाच्या बातम्या :
Imtiyaz Jaleel : नामांतराविरोधात आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला तर...; जलील यांचा फडणवीसांना इशारा