एक्स्प्लोर

मोठी बातमी! आज पुन्हा सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला; नवीन 'ड्राफ्ट' सादर केला जाणार

Maratha Reservation : विशेष म्हणजे यावेळी शिष्टमंडळाच्या वतीने नवीन 'ड्राफ्ट' सादर केला जाणार आहे. त्यामुळे यावर जरांगे यांची भूमिका काय असणार हे पाहणं महत्वाचे असणार आहे. 

जालना : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे मुंबई आंदोलनावर ठाम असल्याने, आता सरकारकडून देखील त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात असून, आज पुन्हा एकदा सरकारचे एक शिष्टमंडळ मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या भेटीला येत आहे. ज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे ओएसडी मंगेश चिवटे (Mangesh Chivate) यांचा समावेश आहे. सोबतच, बच्चू कडू (Bachchu Kadu) देखील उपस्थित राहणार आहे. विशेष म्हणजे यावेळी शिष्टमंडळाच्या वतीने नवीन 'ड्राफ्ट' सादर केला जाणार आहे. त्यामुळे यावर जरांगे यांची भूमिका काय असणार हे पाहणं महत्वाचे असणार आहे. 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे हे मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण करणार असून, यासाठी 20 जानेवारीला ते आंतरवाली सराटी गावातून पायी दिंडी काढणार आहे. त्यांच्या याच आंदोलनामुळे सरकारची अडचण वाढू शकते. त्यामुळे, सरकारकडून 20 जानेवारीला सुरु होणाऱ्या आंदोलनापूर्वी मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्यासाठी हालचाली वाढल्या आहेत. काल बच्चू कडू यांनी जरांगे यांची भेट घेऊन, अनेक मुद्द्यावर चर्चा केली. यावेळी जरांगे यांनी काही दुरूस्ती करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर आज सरकारच एक शिष्टमंडळ जरांगे यांची भेट घेण्यासाठी येत आहे. त्यामुळे आजच्या या भेटीत काही मार्ग निघतो का? हे पाहणं महत्वाचे असणार आहे. 

राजू शेट्टी जरांगेंच्या भेटीला...

दरम्यान मनोज जरांगे आणि शेतकरी नेते राजू शेट्टी यांची देखील सोमवारी भेट झाली आहे. दोघांमध्ये आंतरवाली सराटीमध्ये भेट झाली असून, यावेळी मराठा आरक्षणा संदर्भात चर्चा देखील झाली. राजू शेट्टी सोमवारपासून जालना दौऱ्यावर असून, आज जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातल्या भारत येथे दुष्काळ परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेमध्ये सोयाबीन आणि कापसाच्या हमीभाव बरोबरच मराठा आरक्षणाची मागणी करण्यात आली आहे. त्यापूर्वी शेट्टी यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. 

मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठींबा: शेट्टी 

या भेटीनंतर राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया आली आहे. "इथं अंत बघू नका आणि विषाची परीक्षा घेऊ नका. ही आग आहे, हात घालायला गेलात तर हात भाजल्याशिवाय राहणार नाही, असा सरकारला शेट्टी यांनी इशारा दिला आहे. तसेच, मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. शेतकऱ्यांमधील एक मोठा घटक मराठा समाज असून, शेतकऱ्यांचा नेता म्हणून मी त्यांच्याबरोबर राहणार असून, हे माझं कर्तव्य आहे. 20 तारखेच्या मुंबई आंदोलनाला आमचा पाठिंबा असून, या आंदोलनामध्ये स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांना सहभागी होण्याचं आवाहन देखील शेट्टी यांनी केले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

सग्यासोयऱ्यांवरून काथ्याकुट सुरुच; बच्चू कडू मनधरणीला गेले, पण मनोज जरांगेचा प्रश्नांचा भडिमार!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! लेकाच्या जन्मदाखल्यासाठी 2 वर्षांपासून महापालिकेच्या पायऱ्या झिजवतोय 'बाप', जगायचं कस?
धक्कादायक! लेकाच्या जन्मदाखल्यासाठी 2 वर्षांपासून महापालिकेच्या पायऱ्या झिजवतोय 'बाप', जगायचं कस?
Vicky Kaushal Chhava: 'छावा'चा ट्रेलर आला अन् विक्कीनं मोबाईल थेट देवघरात जाऊन ठेवला; देवाला म्हणाला...
'छावा'चा ट्रेलर आला अन् विक्कीनं मोबाईल थेट देवघरात जाऊन ठेवला; देवाला म्हणाला...
Share Market Crash :ट्रम्पच्या ट्रेड वॉरचा इफेक्ट, FPI कडून विक्री, शेअर मार्केट क्रॅश, सेन्सेक्स 1000 अंकांनी कोसळला
सेन्सेक्स क्रॅश, 1000 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान, ट्रम्पच्या टॅरिफ वॉरचा धक्का, FPI कडून विक्री सुरुच
जुगलबंदी... सुनेत्रा पवार राज्यसभेत पीठासीन सभापती, प्रफुल्ल पटेलांना म्हणाल्या, तुमची वेळ संपली
जुगलबंदी... सुनेत्रा पवार राज्यसभेत पीठासीन सभापती, प्रफुल्ल पटेलांना म्हणाल्या, तुमची वेळ संपली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rushiraj Sawant : मुरलीअण्णांचा आदेश, विमानाचा यू टर्न; सावंतांच्या लेकाच्या परतीची INSIDE STORYPune Athawale Group Protest : पुण्यात राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात आता भीम अनुयायी आक्रमकRaigad DPDC Meeting Update : शिवसेना आमदारांशिवाय जिल्हा वार्षिक नियोजन बैठक, महायुतीत धुसफूसSuresh Dhas PC : जितेंद्र आव्हाड यांना फक्त रॉकेल टाकण्याच कळतं का? धस यांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! लेकाच्या जन्मदाखल्यासाठी 2 वर्षांपासून महापालिकेच्या पायऱ्या झिजवतोय 'बाप', जगायचं कस?
धक्कादायक! लेकाच्या जन्मदाखल्यासाठी 2 वर्षांपासून महापालिकेच्या पायऱ्या झिजवतोय 'बाप', जगायचं कस?
Vicky Kaushal Chhava: 'छावा'चा ट्रेलर आला अन् विक्कीनं मोबाईल थेट देवघरात जाऊन ठेवला; देवाला म्हणाला...
'छावा'चा ट्रेलर आला अन् विक्कीनं मोबाईल थेट देवघरात जाऊन ठेवला; देवाला म्हणाला...
Share Market Crash :ट्रम्पच्या ट्रेड वॉरचा इफेक्ट, FPI कडून विक्री, शेअर मार्केट क्रॅश, सेन्सेक्स 1000 अंकांनी कोसळला
सेन्सेक्स क्रॅश, 1000 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान, ट्रम्पच्या टॅरिफ वॉरचा धक्का, FPI कडून विक्री सुरुच
जुगलबंदी... सुनेत्रा पवार राज्यसभेत पीठासीन सभापती, प्रफुल्ल पटेलांना म्हणाल्या, तुमची वेळ संपली
जुगलबंदी... सुनेत्रा पवार राज्यसभेत पीठासीन सभापती, प्रफुल्ल पटेलांना म्हणाल्या, तुमची वेळ संपली
Anna hazare : आधी अरविंद केजरीवालांना सुनावलं, आता अण्णा हजारेंनी उद्धव ठाकरेंनाही सोडलं नाही, म्हणाले...
आधी अरविंद केजरीवालांना सुनावलं, आता अण्णा हजारेंनी उद्धव ठाकरेंनाही सोडलं नाही, म्हणाले...
बाबा रामदेव यांच्या कंपनीने मोडले सर्व विक्रम, नफ्यात झाली मोठी वाढ, तेलाच्या विक्रीतून सर्वाधिक कमाई 
बाबा रामदेव यांच्या कंपनीने मोडले सर्व विक्रम, नफ्यात झाली मोठी वाढ, तेलाच्या विक्रीतून सर्वाधिक कमाई 
Champions Trophy :चॅम्पियन्स ट्रॉफीतील धोकादायक संघ कोणता? भारत, पाकिस्तान की.... रवी शास्त्रींनी कोणत्या संघाचं नाव घेतलं?
चॅम्पियन्स ट्रॉफीतील धोकादायक संघ कोणता? भारत, पाकिस्तान की.... रवी शास्त्रींनी कोणत्या संघाचं नाव घेतलं?
Tanaji Sawant: 'तो' प्रकार टाळण्यासाठी तानाजी सावंतांनी डाव टाकला, पोराला थांगपत्ता लागून न देता विमानाने यू टर्न घेतला!
बाप बाप होता है! तानाजी सावंतांनी डाव टाकला, पोराला कळायच्या आत विमानाने यू टर्न घेतला!
Embed widget