एक्स्प्लोर

Chhatrapati Sambhaji Nagar : सकाळी प्रवेश, रात्री थेट उमेदवारी; संभाजीनगरमध्ये एमआयएमला शह देण्यासाठी आंबेडकरांची खेळी

Lok Sabha Election 2024 : संभाजीनगरमध्ये एमआयएम आणि इम्तियाज जलील यांना शह देण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी अफसर खान यांना मैदानात उतरवले असल्याची चर्चा आहे. 

Lok Sabha Election 2024 : प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडीकडून (Vanchit Bahujan Aaghadi) तिसरी उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून (Chhatrapati Sambhaji Nagar Lok Sabha Constituency) काँग्रेसचे माजी नगरसेवक अफसर खान (Afsar Khan) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अफसर खान यांनी मंगळवारी सकाळी काँग्रेसमधून वंचितमध्ये प्रवेश केला आणि रात्री त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. विशेष म्हणजे संभाजीनगरमध्ये एमआयएम (MIM) आणि इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांना शह देण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी अफसर खान यांना मैदानात उतरवले असल्याची चर्चा आहे. 

प्रकाश आंबेडकर यांनी संभाजीनगरमध्ये उमेदवार देतांना जलील यांच्या मुस्लीम मतांचा विचार करता शहरातील मुस्लीम नेत्याला संधी दिली आहे. तसेच, जलील आणि अफसर खान यांच्यातील वाद नेहमी चर्चेचा विषय ठरला आहे. अनेकदा अफसर खान यांनी जलील यांच्यावर गंभीर आरोप देखील केले आहेत. त्यामुळे जलील यांचा कट्टर विरोधक आणि त्यात मुस्लीम चेहरा रिंगणात उतरवून जलील यांची लढाई आणखी कठीण करण्याचा प्रयत्न आंबेडकरांकडून करण्यात आल्याची चर्चा आहे. 

एमआयएमचा बदला घेणार? 

मागील लोकसभा निवडणुकीत एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये युती करण्यात आली होती. युतीमधील सर्वच उमेदवार जिंकून आणण्यासाठी 'वंचित'ने जिवाचे रान केले. मात्र, याचवेळी एमआयएमने संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ सोडला तर इतर मतदारसंघांत 'वंचित'ला साथ दिली  नसल्याचा आक्षेप प्रकाश आंबेडकरांचे आहे. त्यामुळे राज्यात जलील सोडता एकही उमेदवार निवडून आला नाही. स्वतः प्रकाश आंबेडकर यांना देखील पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे मागील लोकसभा निवडणुकीचा बदला घेण्यासाठी आणि राज्यातील एमआयएमचा एकमेव खासदाराचा पराभव करण्यासाठी वंचितने अफसर खान सारखा चेहरा शोधून काढल्याची चर्चा आहे. 

अफसर खान यांच्यामुळे जलील यांना किती फटका बसणार?

जलील यांच्या विरोधात वंचितने रिंगणात उतरवलेले अफसर खान यांच्या उमेदवारीमुळे जलील यांना किती फटका बसणार याबाबत देखील चर्चा होत आहे. मात्र, अफसर खान आणि जलील यांच्या जनसंपर्काचा विचार केल्यास अफसर खान हे फक्त शहरातील काही भागापुरते मर्यादित चर्चेत असतात. मात्र, खासदार असल्याने जलील यांची मागील पाच वर्षात शहरासह जिल्ह्यात च्नागली पकड निर्माण झाल्याचे चित्र आहे. तसेच, आदर्श बँक घोटाळ्याबाबत त्यांनी केलेल्या आक्रमक आंदोलनामुळे त्यांना फायदा होण्याची शक्यता आहे. सोबतच राजकीय घडामोडीमुळे जलील नेहमीच राज्याच्या राजकारणात चर्चेत असतात. त्यामुळे अफसर खान यांना जलील यांचा सामना करतांना आणखी जोमाने काम करावे लागणार असल्याची चर्चा आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

मोठी बातमी : राज्यात पुन्हा 'जय मीम जय भीम' पॅटर्न? वंचितसोबतच्या युतीवर जलील यांचं मोठं वक्तव्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

PM Kisan yojana : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! PM किसानचा 19 वा हप्ता 'या' दिवशी मिळणार, त्यापूर्वी करा 'हे' काम
PM Kisan yojana : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! PM किसानचा 19 वा हप्ता 'या' दिवशी मिळणार, त्यापूर्वी करा 'हे' काम
Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकर सहकुटुंब राष्ट्रपती भवनमध्ये, दिलखुलास गप्पा अन् राष्ट्रपती मुर्मूंसाठी 'खास भेट'
सचिन तेंडुलकर सहकुटुंब राष्ट्रपती भवनमध्ये, दिलखुलास गप्पा अन् राष्ट्रपती मुर्मूंसाठी 'खास भेट'
सोयाबीन खरेदीला 1 महिना मुदतवाढ द्या, अन्यथा राहिलेलं सोयाबीन अरबी समुद्रात फेकून देऊ, तुपकरांचा इशारा
सोयाबीन खरेदीला 1 महिना मुदतवाढ द्या, अन्यथा राहिलेलं सोयाबीन अरबी समुद्रात फेकून देऊ, तुपकरांचा इशारा
शॉकींग! सांगलीत 4 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करुन पेटीत ठेवलं; नराधमास ठोकल्या बेड्या
शॉकींग! सांगलीत 4 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करुन पेटीत ठेवलं; नराधमास ठोकल्या बेड्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Beed:सरपंच हत्येप्रकरणी Krushna Andhale फरार,मात्र कृष्णाच्या गँगची गुंडगिरी,होमगार्ड जवानाला मारहाणJob Majha:भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र येथे विविध क्षेत्रात नोकरीच्या संधी 06 Feb 2025Ajit Pawar AK 47 Funny : महायुतीच्या बातम्या नीट द्या...नाहीतर उडवून टाकू! दादांची फटकेबाजीKaruna Sharma : मुंडे घराण्याचा एकमेवं वारस बेरोजगार आहे,करुणा शर्मांची स्फोटक मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Kisan yojana : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! PM किसानचा 19 वा हप्ता 'या' दिवशी मिळणार, त्यापूर्वी करा 'हे' काम
PM Kisan yojana : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! PM किसानचा 19 वा हप्ता 'या' दिवशी मिळणार, त्यापूर्वी करा 'हे' काम
Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकर सहकुटुंब राष्ट्रपती भवनमध्ये, दिलखुलास गप्पा अन् राष्ट्रपती मुर्मूंसाठी 'खास भेट'
सचिन तेंडुलकर सहकुटुंब राष्ट्रपती भवनमध्ये, दिलखुलास गप्पा अन् राष्ट्रपती मुर्मूंसाठी 'खास भेट'
सोयाबीन खरेदीला 1 महिना मुदतवाढ द्या, अन्यथा राहिलेलं सोयाबीन अरबी समुद्रात फेकून देऊ, तुपकरांचा इशारा
सोयाबीन खरेदीला 1 महिना मुदतवाढ द्या, अन्यथा राहिलेलं सोयाबीन अरबी समुद्रात फेकून देऊ, तुपकरांचा इशारा
शॉकींग! सांगलीत 4 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करुन पेटीत ठेवलं; नराधमास ठोकल्या बेड्या
शॉकींग! सांगलीत 4 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करुन पेटीत ठेवलं; नराधमास ठोकल्या बेड्या
Shreyas Iyer : 11 चौकार आणि षटकार! श्रेयस अय्यरची तोडफोड फलंदाजी; फक्त इतक्या चेंडूत ठोकले अर्धशतक, पाहा तुफानी फटकेबाजीचा Video
11 चौकार आणि षटकार! श्रेयस अय्यरची तोडफोड फलंदाजी; फक्त इतक्या चेंडूत ठोकले अर्धशतक, पाहा तुफानी फटकेबाजीचा Video
Video: आया रे तुफान...  सिंहाच्या जबड्यात हात; 'छावा' सिनेमातील नवं गाणं लाँच; शंभुराजेंचा लेझीम डान्स वगळला
Video: आया रे तुफान... सिंहाच्या जबड्यात हात; 'छावा' सिनेमातील नवं गाणं लाँच; शंभुराजेंचा लेझीम डान्स वगळला
Nashik Crime : पोलीस वेश बदलून बांधकाम साईटवर गेले अन्..., नाशिकमध्ये 8 बांगलादेशी नागरिकांना बेड्या, नेमकं काय घडलं?
पोलीस वेश बदलून बांधकाम साईटवर गेले अन्..., नाशिकमध्ये 8 बांगलादेशी नागरिकांना बेड्या, नेमकं काय घडलं?
MSEB मध्ये वायरी जोडणारे हात जेव्हा 'महावितरण श्री' जिंकतात; कोल्हापूरच्या पठ्ठ्यानं पटकावला किताब
MSEB मध्ये वायरी जोडणारे हात जेव्हा 'महावितरण श्री' पटकावतात; कोल्हापूरच्या पठ्ठ्यानं पटकावला किताब
Embed widget