Chhatrapati Sambhaji Nagar : फडणवीस कार्यक्रमातून जाताच पेट्यांची पळवा-पळवी; उपस्थित स्वयंसेवकांकडून 'लाभार्थ्यांना' लाठ्यांचा प्रसाद
Chhatrapati Sambhaji Nagar : या ठिकाणी वेगवेगळ्या शासकीय योजनेच्या 'लाभार्थ्यांना' लाभाचे वाटप करण्याचे कार्यक्रम देखील ठेवण्यात आले होते.
Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील (Chhatrapati Sambhaji Nagar District) गंगापूर येथे शुक्रवारी (30 जून) रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते मराठवाडा वॉटरग्रीड (Marathwada Water Grid) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. दरम्यान, यावेळी गंगापूर तालुक्यातील मोठ्याप्रमाणात नागरिक उपस्थित होते. विशेष म्हणजे, या ठिकाणी वेगवेगळ्या शासकीय योजनेच्या 'लाभार्थ्यांना' लाभाचे वाटप करण्याचे कार्यक्रम देखील ठेवण्यात आले होते. मात्र कार्यक्रम संपल्यावर फडणवीस स्टेजवरून खाली उतरताच या ठिकाणी लाभार्थ्यांचा गोंधळ पाहायला मिळाला. विशेष म्हणजे, या गोंधळात उपस्थित स्वयंसेवकांकडून 'लाभार्थ्यांना' लाठ्यांचा प्रसाद देण्यात आल्याचा आरोप होत आहे. त्याचे काही व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
गंगापूर मराठवाडा वॉटरग्रीड या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाचे शुक्रवारी उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी महत्वाच्या नेत्यांसह फडणवीस यांचे भाषण झाले आणि कार्यक्रम संपले. तर यावेळी वेगवेगळ्या शासकीय योजनेच्या 'लाभार्थ्यांना' लाभाचे वाटप करण्याचे कार्यक्रम देखील ठेवण्यात आले होते. मात्र फडणवीस यांचे भाषण संपताच लाभार्थी महिला-पुरुष लाभाच्या वस्तू घेण्यासाठी एकत्र आले. त्यामुळे मोठी गर्दी झाली. तर शासकीय योजनेतून मिळणाऱ्या पेट्या घेण्यासाठी लोकांनी एकच धाव घेतली. दिसेल तो व्यक्ती पेट्या घेऊन पळत होता. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. त्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या स्वयंसेवकांनी हातात असलेल्या लाठ्यांनी पेट्या घेऊन पळणाऱ्या लोकांना लाठ्यांचा प्रसाद दिला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. विशेष म्हणजे लाठ्या मारणारे तरुण कोण होते आणि अशा कार्यक्रमात त्यांच्या हातात मोठ्या-मोठ्या लाठ्या कशासाठी होत्या असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर कार्यक्रमात योग्य नियोजनाचा अभाव असल्याचे देखील पाहायला मिळाले.
महिला पोलिसांनी महिलांना लावले हुसकावून...
दरम्यान, याचवेळी महिला लाभार्थ्यांना देखील काही वस्तू वाटप केल्या जाणार होत्या. पण कार्यक्रम संपताच या वस्तू घेण्यासाठी महिलांची गर्दी झाली. त्यामुळे प्रत्येकजण दिसेल ती वस्तू घेऊन पळत होते. यावेळी महिलांची देखील गर्दी झाली. मात्र लाभाच्या वसरू संपल्यावर देखील काही महिला गर्दी करत असल्याने महिला पोलिसांनी त्यांना हुसकावून लावले. तर खी महिला पोलिसांनी हातातील लाठ्याने त्यांना सौम्य प्रसाद देखील दिला. या घटनेचा देखील व्हिडिओ समोर आला आहे.
फडणवीसांची शरद पवारांवर टीका...
गंगापूर येथील कार्यक्रमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. "औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर असे करण्यात आले. हे जनतेला मान्य आहे, परंतु शरद पवारांना मान्य नाही, मी औरंगाबादच म्हणणार, असे पवार यांनी म्हटले आहे. पवारांनी काहीही म्हटले, तरी संभाजी महाराजांचे योगदान आणि बलिदान कुणीही विसरू शकणार नाही आणि आमच्या मनातून काढू शकणार नाही, असे फडणवीसांनी म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या :