एक्स्प्लोर

काय सांगता! पत्त्यांच्या क्लबमध्ये चक्क मुख्यमंत्री शिंदेंसह आठवलेंचा फोटो; आरपीआय जिल्हाध्यक्षांच्या घरावर पोलिसांचा छापा

Chhatrapati Sambhaji Nagar News : हा पत्याचा क्लब आरपीआय (आठवले गट) पक्षाचा जिल्हाध्यक्ष चालवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांकडून (Chhatrapati Sambhaji Nagar City Police) गेल्या काही दिवसांपासून अवैधरित्या सुरु असलेल्या धंद्यावर कारवाई धडका सुरु आहे. दरम्यान शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने अशीच काही कारवाई एका पत्त्याचा क्लबवर केली आहे. विशेष म्हणजे हा पत्याचा क्लब आरपीआय (आठवले गट) पक्षाचा जिल्हाध्यक्ष चालवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तर पोलिसांनी कारवाई केलेल्या या क्लबमध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale), राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांसोबतचे फोटो लावलेले असल्याचे देखील समोर आले आहे. बाळकृष्ण इंगळे असे जिल्हाध्यक्षाचे नाव आहे. 

केंद्रासह राज्यातील सत्ताधारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) जिल्हाध्यक्षाच्या बाळकृष्ण इंगळे बंगल्यात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी रात्री छापा मारून इंगळेसह आठ जणांना बेड्या ठोकल्या असून, 35 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. हे सर्व आरोपी झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळत होते. विशेष म्हणजे क्लबमध्ये एका रूमचे रोजचे भाडे तीन हजार व पत्त्याच्या एका डावावर दहा टक्के कमिशन इंगळे घेत होता.

बंगल्याच्या बाहेर आठवलेंच्या नावाची पाटी...

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तोरणागडनगर म्हाडा कॉलनीतील 'जनाई' नावाच्या बंगल्यात जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक कल्याण शेळके यांच्या पथकास मिळाली होती. त्यानुसार इंगळेच्या 'जनाई' नावाच्या बंगल्यावर छापा मारण्यासाठी पोलीस पोहचले. दरम्यान या बंगल्याच्या बाहेर लावण्यात आलेल्या पाटीवर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे नेते म्हणून नाव टाकलेले आहे. त्यामुळे यापूर्वी कोणी येथे कारवाई करण्यासाठी पुढे येत नव्हता. मात्र शेळके यांच्या पथकाने थेट छापा टाकला. पोलिसांनी छापा टाकल्यावर तिथे आठजण पैसे लावून जुगार खेळत होते. त्यांच्या ताब्यातून 35 हजार 300 रुपयांच्या रोखसह 1  लाख 2 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

असा मिळायचा ग्राहकांना प्रवेश

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पक्षाचा जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण इंगळेच्या क्लबमध्ये फक्त ओळखीच्या जुगाऱ्यांनाच प्रवेश दिला जात होता. त्याच्या घराला संरक्षक भिंत आणि गेट असल्याने आतमध्ये जुगार अड्डा सुरु असल्याचा कुणालाच संशय येत नव्हता. दरम्यान याची महिती मिळाल्याने गुन्हे शाखेच्या पोलिसांनी डमी ग्राहक गेटवर पाठविले. त्यावेळी तेथील कामगाराला ग्राहक ओळखीचे वाटल्याने त्याने गेट उघडले. त्यानंतर सिग्नल मिळताच पोलिसांनी छापा टाकत क्लबचा पर्दाफाश केला.

यांच्यावर गुन्हा दाखल...

आरोपींमध्ये रिपाइंचे जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण पंढरीनाथ इंगळे (रा. तोरणागडनगर, म्हाडा कॉलनी) याच्यासह वसीम हरुण कासम कुरेशी (रा. पटेलनगर, चिकलठाणा) अक्षय अशोक मगरे (रा. चिकलठाणा), राजेंद्र काशिनाथ मरमट (रा. हनुमाननगर), गणेश भगवान पवार, दत्ता अमृत सुरवसे (दोघे रा. विजयनगर), अनिल सपकाळे (रा. भालगाव फाटा) आणि आकाश कल्याणराव जाधव (रा. मुकुंदनगर) समावेश आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Chhatrapati Sambhaji Nagar : बोर्ड लावण्यासाठी बिल्डिंगवर चढला अन् भयंकर घडलं; तरुणाचा जागीच जीव गेला

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Gadchiroli Crime: परिचारिकेला शरीर सुखाची मागणी, आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई; मुंबईतून आला निलंबनाचा आदेश
परिचारिकेला शरीर सुखाची मागणी, आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई; मुंबईतून आला निलंबनाचा आदेश
कोण होतास तू, काय झालास तू? अमित शाहांचा व्हिडिओ शेअर करत फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला
कोण होतास तू, काय झालास तू? अमित शाहांचा व्हिडिओ शेअर करत फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Sangli : सांगली महानगरपालिकेत कोणाचा गुलाल? कोण मारणार बाजी?
Mahapalikecha Mahasangram Amravati : रस्ते नालेसफाईच्या मुद्द्यावरून अमरावतीकरांचा संतप्त सवाल
Mahapalikecha Mahasangram Parbhani : कचऱ्याच्या मुद्यावरुन काँग्रेस-भाजपमध्ये वार-पलटवार, कोण मारणार बाजी
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : महेंद्र दळवींकडून पुन्हा एकदा सुनील तटकरेंवर संशय व्यक्त
Anjali Damania : पुणे मुंढवा जमीन प्रकरणातील जमिनीवर थेट अजित पवारांचाच डोळा? अंजली दमानियांचा आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Gadchiroli Crime: परिचारिकेला शरीर सुखाची मागणी, आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई; मुंबईतून आला निलंबनाचा आदेश
परिचारिकेला शरीर सुखाची मागणी, आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई; मुंबईतून आला निलंबनाचा आदेश
कोण होतास तू, काय झालास तू? अमित शाहांचा व्हिडिओ शेअर करत फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला
कोण होतास तू, काय झालास तू? अमित शाहांचा व्हिडिओ शेअर करत फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला
Varsha Gaikwad : लोकशाहीचे वस्त्रहरण होत असताना निवडणूक आयोग धृतराष्ट्राच्या भूमिकेत; वर्षा गायकवाडांची टीका
लोकशाहीचे वस्त्रहरण होत असताना निवडणूक आयोग धृतराष्ट्राच्या भूमिकेत; वर्षा गायकवाडांची टीका
Raju Shetti: ऊस गळीत हंगाम सुरु होऊन 40 दिवस उलटले, 129 कारखान्यांनी 2 हजार कोटींची एफआरपी थकवली; राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे कारवाईची मागणी
ऊस गळीत हंगाम सुरु होऊन 40 दिवस उलटले, 129 कारखान्यांनी 2 हजार कोटींची एफआरपी थकवली; राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे कारवाईची मागणी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2025 | बुधवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2025 | बुधवार 
Shahid Afridi: कायम शेलक्या शिव्या खाणारा शाहीद आफ्रिदी चक्क रोहित अन् विराटच्या मदतीला धावला, पण गंभीरवर भलताच भडकला!
कायम शेलक्या शिव्या खाणारा शाहीद आफ्रिदी चक्क रोहित अन् विराटच्या मदतीला धावला, पण गंभीरवर भलताच भडकला!
Embed widget