एक्स्प्लोर

Manoj Jarange : आमचं वाटोळं कोण करतंय, 'त्या' सहा जणांची नावं 24 तारखेला सांगतो; मनोज जरांगे पाटलांचा इशारा कुणाला? 

Manoj Jarange : येत्या 24 डिसेंबरला मराठा समाजाचे वाटोळं करणाऱ्या सहा जणांची नावे सांगतो असा इशाराच मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी दिला आहे. 

छत्रपती संभाजीनगर  : 'तुम्ही कुणासाठी काम करता हे आम्हाला आता कळलं असून तुमच्या सल्ल्याची आम्हाला गरज नाही, वेळोवेळी वेगवगेळी वक्तव्य करून तुम्ही सरड्यासारखे रंग बदलत आहात. तुमच्यासारखा विरोधी पक्ष देशात कुणी नाही, तुमची विचारधारा मराठ्यांविषयी विष पेरणारी असून मराठ्यांचे मुडदे पडायला तुम्ही जबाबदार आहात, असे आरोप करत येत्या 24 डिसेंबरला मराठा समाजाचे वाटोळं करणाऱ्या सहा जणांची नावेही सांगतो असा इशाराच मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी दिला आहे. 

मराठा आरक्षणावरून राज्यात (Maratha Reservation) रान पेटले असून छगन भुजबळ-मनोज जरांगे यांच्यातला (Chhagan Bhujbal) शाब्दिक वाद शमतो ना शमतो तोवरच नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विरोधी पक्षनेते विजय वड्डेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्यांनंतर मनोज जरांगे यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. विजय वड्डेट्टीवार (Vijay Vaddettiwar) यांनी म्हटले की, 'मराठा तरुणांनी अभ्यास करून विचार करून आपण कोणाला साथ देत आहे, आपला भलं कशात आहे, हित कशात आहे, याचा विचार करावा...असे विधान केले आहे. यावर प्रत्युत्तर देताना मनोज जरांगे यांनी चांगलीच खरडपट्टी काढली आहे. ते म्हणाले की, आम्हाला मोडायचा सामूहिक कट तुम्ही रचला होता. आता फालतू शब्द बोलून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करत आहात. पण आमची मुलं दूधखुळी नाहीत, मराठ्यांचे मुडदे पडायला तुम्ही जबाबदार आहात, आता तुमच्या सल्ल्याची सुद्धा गरज नाही, अशा शब्दांत जरांगे यांनी वड्डेट्टीवार यांना सुनावले आहे. 

मनोज जरांगे यावेळी म्हणाले की, अशा लोकांना गोरगरीब आठवत नाही. मात्र आता हे कुणासाठी काम करता हे कळलं आहे. कधी काय तर कधी काय? तुम्ही सरड्यासारखे रंग बदलत आहात. तुमच्यासारखा विरोधी पक्ष देशात कुणी नाही. मुळात यांची विचारधारा मराठ्यांविषयी विष पेरणारी आहे. हा मनोज जरांगे राजकारणासाठी करतो, असे एकही मराठा ओबीसी महणू शकत नाही. तुम्हाला मराठा समाजशिवाय माया नाही, आम्हाला तुम्ही सांगू नका, काय करायचं, अभ्यास करायचा की नाही, आमच्या मुलांच्या बुद्धी ठेप्यावर आहे, आमच्या मुलांना तुम्ही सांगायची गरज नाही. तुमच्यासारख्या लोकांनीच आम्हाला संपवलं आहे. आम्हाला मोडायचा सामूहिक कट तुम्ही रचला होता. आता फालतू शब्द बोलून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करत आहेत, पण हे होऊ देणार नाही, असा सज्जड दमच मनोज जरांगे यांनी दिला आहे. 

येत्या 24 तारखेला सगळं सांगतो.... 

दरम्यान, याचवेळी मनोज जरांगे यांनी विजय वड्डेट्टीवार यांना इशारा देत इतर राजकीय नेत्यांना घाम फोडला आहे. जरांगे म्हणाले की, तुम्ही काय चीज आहे, हे आम्हाला आता कळले, तुम्ही 5 ते 6 जण काय नमुने आहेत, हे आम्हाला कळलं. त्यामुळे तुम्ही आता आमचे मराठ्यांचे शत्रू झालात. आता कुणबी नोंदीचे पुरावे मिळू लागले म्हणून  काहीही बोलू लागले आहेत. मात्र थोडं थांबा, मराठे आता काही दिवसात तुम्हाला सल्ले शिकवतील, असं जरांगे म्हणाले. शिवाय विजय वड्डेट्टीवर यांच्यावर निशाणा साधत 'असला विरोधी पक्ष नेता असतो का? असले विचार करून तुमचा पक्ष कसा राहील, राहुल गांधीने हेच शिकवलं का तुम्हालाअसा सवाल करत मराठा समाजाचे वाटोळं करणाऱ्या त्या 6 जणांचे नाव 24 तारखेला सांगतो, असा इशाराच मनोज जरांगे यांनी दिला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

राजकीय लोकांच्या भल्यासाठी आरक्षण मिळावं यासाठी Manoj Jarange आग्रही

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
Kolhapur News : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
कोल्हापूर : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
Bharat Gogawale : मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
SSC & HSC Board Exam Time Table 2025 : मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nasim Khan Security : माझ्यावर हल्ला करण्याचा कट, नसीम खान यांचा दावाSudhir Mungantiwar : मुख्यमंत्री भाजपचाच असेल असं अमित शाहांनी कधीच म्हटलेलं नाहीMaharashtra SuperFast | महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा एका क्लिकवर एबीपी माझाSachin Dodke on Vidhan Sabha : मतदान संपलं, सचिन दोडके म्हणतात आता भात काढणी करायची इच्छा आहे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
Kolhapur News : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
कोल्हापूर : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
Bharat Gogawale : मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
SSC & HSC Board Exam Time Table 2025 : मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-भाजपमधून आलेल्या नेत्यांवर मोठी जबाबदारी
सर्वांचं लक्ष महाराष्ट्राकडे लागलेलं असताना नवी दिल्लीत अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-आपमधून आलेल्या नेत्यांना संधी
मी 25 ते 30 मतदारसंघात फोन केले, फडणवीसांनी सांगितलं; वाढलेली टक्केवारी अन् लाडकी बहीणचा फायदा कोणाला
मी 25 ते 30 मतदारसंघात फोन केले, फडणवीसांनी सांगितलं; वाढलेली टक्केवारी अन् लाडकी बहीणचा फायदा कोणाला
Rajesaheb Deshmukh: धनंजय मुंडेंच्या आरोपावर राजेसाहेब देशमुखांचं स्पष्टीकरण; 122 मतदान केंद्रावर फेर मतदानाची मागणी, सांगितली इनसाईड स्टोरी
धनंजय मुंडेंच्या आरोपावर राजेसाहेब देशमुखांचं स्पष्टीकरण; 122 मतदान केंद्रावर फेर मतदानाची मागणी, सांगितली इनसाईड स्टोरी
Shani 2024 : तब्बल 30 वर्षांनंतर राहु आणि शनीची युती; 2025 पासून 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
तब्बल 30 वर्षांनंतर राहु आणि शनीची युती; 2025 पासून 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
Embed widget