"साहेब... महिला अत्याचारावर अधिवेशनात चर्चा करा"; तरुणानं मुख्यमंत्र्यांसह विरोधी पक्षनेत्याला लिहलं स्वतःच्या रक्तानं पत्र
Aurangabad News : रक्ताने लिहलेले पत्र तरुणाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पाठवले आहे.
Aurangabad News : येणाऱ्या 17 जुलैपासून राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहेत. या अधिवेशनात मागील काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेल्या महिला अत्याचार संबंधित घटनांवर चर्चा करावी, अशी विनंती करणारे रक्ताने लिहलेले पत्र तरुणाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) व विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) पाठवले आहे. दीपेश पाटील असे या तरुणाचे नाव आहे. तर या पत्राची दखल घेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आगामी अधिवेशनात नक्कीच हा प्रश्न मांडला जाईल, असे तरुणांला आश्वासन दिले आहेत.
मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते यांना लिहिलेल्या पत्रात तरुणाने म्हटले आहे की, "आपण बघत असाल की, गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्र राज्यांमध्ये महिला अत्याचारांचे प्रमाण वाढले आहेत. विशेष बाब म्हणजे सदरील सर्व घटना प्रेम प्रकरणातून घडलेले आहेत. मुलींना एकतर्फी प्रेमातून विहिरीत, नाल्यात मारून फेकून दिले जात आहेत. खरंतर आपल्याकडे राजकीय अस्थिरतेतीच जास्त चर्चा केली जात आहेत, परंतु महिलांच्या प्रश्नाकडे कोणीही लक्ष देत नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मी आपणास विनंती करतो की, सबब घडणाऱ्या घटनांवर अंकुश कसा लावता येईल याकडे तुम्ही लक्ष द्या. नाहीतर आगामी काळात महिलांवरील या अत्याचारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते. त्यानंतर आपल्या सर्वांच्या हातून ही परिस्थिती बाहेर जाईल. त्यामुळे येणाऱ्या अधिवेशनात यावर गंभीर चर्चा करावी,” अशी विनंती तरुणाने केली आहेत.
या पत्राला आपल्या सोशल मीडियावर शेअर करत दानवे यांनी, तरुणाला असे रक्ताने पत्र लिहू नये अशी विनंती केलेली आहेत. आपले विनंतीची नक्कीच दखल घेण्यात येईल, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे.
महाराष्ट्राचा सुजाण नागरिक दीपेश पाटील याने मुलींवर होणाऱ्या हल्ल्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपल्या रक्ताने पत्र लिहिले आहे. मी शब्द देतो की यंदाच्या अधिवेशनात हा विषय नक्की माझ्याकडून मांडला जाईल. लोकांना माझी विनंतीही राहील की अशा पद्धतीने… pic.twitter.com/FGMsajmxy6
— Ambadas Danve (@iambadasdanve) July 12, 2023
यंदाच्या अधिवेशनात मुद्दा मांडणार...
दरम्यान तरुणाने रक्ताने लिहिलेल्या पत्रावर दानवे यांनी प्रतिकिया दिली असून, महाराष्ट्राचा सुजाण नागरिक दीपेश पाटील याने मुलींवर होणाऱ्या हल्ल्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपल्या रक्ताने पत्र लिहिले आहे. मी शब्द देतो की यंदाच्या अधिवेशनात हा विषय नक्की माझ्याकडून मांडला जाईल. लोकांना माझी विनंतीही राहील की अशा पद्धतीने पत्र लिहून स्वतःला त्रास करून घेऊ नका. आपली तळमळ माझ्याकडून नक्की ऐकली जाईल, अशी प्रतिकिया दानवे यांनी दिली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: