एक्स्प्लोर

शिक्कामोर्तब... आता समृद्धी नव्हे तर 'हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग'

या महामार्गास दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याचा भाजपचा प्रस्ताव होता. या मार्गाला अटलजींचे नाव देण्याची घोषणा आपण यापूर्वीच केली असल्याचे सांगत अशाप्रकारे दबावाचे राजकारण खेळू नका अशा शब्दांत फडणवीस यांनी सांगितलं होतं.

मुंबई : नागपूर विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र व कोकणाला जोडणाऱ्या नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाचे ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग’ असे नामकरण करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. या संदर्भात आज महाराष्ट्र शासनाने परिपत्रक काढून निर्णय घेतला आहे. मुंबई-नागपूर द्रुतगती समृद्धी महामार्गाला दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. यावर आज फायनली शिक्कामोर्तब झालं आहे. दरम्यान समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याच्या निर्णयाला काही लोकांनी विरोध देखील केला होता. शिक्कामोर्तब... आता समृद्धी नव्हे तर 'हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन होऊ घातलेल्या समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचे नाव कसे देऊ शकता? बाळासाहेबांनी शेतकऱ्यांसाठी काय केले असे प्रश्न उपस्थित करत त्यांनी बाळासाहेबांच्या नावाला विरोध केला आहे. त्याऐवजी शेतकऱ्यांसाठी काम करणारे ज्योतिबा फुले किंवा पीडित शोषितांसाठी काम करणाऱ्या बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव समृद्धी महामार्गाला द्या, अशी मागणी या कार्यकर्त्यांनी केली आहे. दरम्यान, विधीमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला समृद्धी महामार्गाच्या नावावरुन विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी 'नाव दिलं' असं म्हणत त्याचवेळी स्पष्ट केलं होतं. हेही वाचा - समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्यास विरोध या महामार्गास दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याचा भाजपचा प्रस्ताव होता. या मार्गाला अटलजींचे नाव देण्याची घोषणा आपण यापूर्वीच केली असल्याचे सांगत अशाप्रकारे दबावाचे राजकारण खेळू नका अशा शब्दांत फडणवीस यांनी सांगितलं होतं. त्यावेळी फडणवीस आणि सेना नेत्यांमध्ये झालेल्या शाब्दीक वादानंतर या महामार्गास ठाकरेंचे नाव न दिल्यास राजीनामा देण्याचा इशाराही शिवसेनेच्या मंडळींनी दिला होता. समृद्धी महामार्गासाठी 56 हजार कोटींचा खर्च महाराष्ट्र समृद्धी महामार्ग प्रकल्प हा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांशी प्रकल्पांपैकी एक होता. यासाठी सुमारे 56 हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. मुंबई-नागपूर या शहरांमधील 710 किलोमीटरचा प्रवास यामुळे सहा तासांत होणार आहे. तब्बल 120 मीटर रुंदीचा हा महामार्ग कोकण, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या पाच महसूल विभागांतील ठाणे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, वाशिम, अमरावती, वर्धा आणि नागपूर या 10 जिल्ह्यातील 27 तालुक्यांच्या 350 गावांमधून जाणार आहे. या प्रकल्पासाठीचे भूसंपादनाचं पूर्ण झाले असून काम प्रगतीपथावर आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 10 August 2026: आजचा मंगळवार 6 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, बाप्पा कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा मंगळवार 6 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, बाप्पा कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
पनवेलमध्ये ‘युवोत्कर्ष- The Youth Conclave’ उत्साहात संपन्न, युवकांचा मोठा सहभाग
पनवेलमध्ये ‘युवोत्कर्ष- The Youth Conclave’ उत्साहात संपन्न, युवकांचा मोठा सहभाग
Sharad Pawar VIDEO : मोदींवर वार, मदतीला पवार! पवारांचे खासदार मोंदींच्या भेटीला, योगायोग की भविष्यातील रणनीतीचे संकेत?
मोदींवर वार, मदतीला पवार! पवारांचे खासदार मोंदींच्या भेटीला, योगायोग की भविष्यातील रणनीतीचे संकेत?

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget