Chandrashekhar Bawankule : मुनगंटीवारांच्या भाषणाला ट्विस्ट करण्यात आलं; सुधीर भाऊंच्या वक्तव्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांचं स्पष्टीकरण, म्हणाले...
Chanrashekhar Bavankule : सुधीर मनगंटीवार यांच्या आधी ज्यांनी कोणी भाषण केलं त्यावर त्यांनी मिश्किलपणे टिपणी केली असल्याची प्रतिक्रिया राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.

Chandrashekhar Bawankule : सुधीर मनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांचं भाषण मी ऐकलं, भाषणाला ट्विस्ट करण्यात आलं. त्यांची भूमिका सरकार बदलायचे नाही अशी आहे. त्यांच्या पहिले जे कोणी भाषण केलं त्यावर त्यांनी मिश्किलपणे टिपणी केली असल्याची प्रतिक्रिया राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chanrashekhar Bavankule) यांनी दिली आहे.
नाशिकमधल्या व्याख्यानमालेत बोलताना भाजप नेते सुधीर मनगंटीवार म्हणाले होते की, "जो या कार्यक्रमाला येतो त्यांचा प्रमोशन होतो असं आयोजकांनी सांगितले. पण माझं प्रमोशन होण्यासाठी माझं सरकार राहिले पहिजे. या व्याख्यानमालेत काँग्रेसचे प्रणिती शिंदे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे अरविंद सावंत देखील मार्गदर्शन करणार आहेत. या दोघांचं प्रमोशन होण्यासाठी सरकारमध्ये बदल होणं गरजेचं आहे, याची देखील मुनगंटीवारांनी आठवण करून दिली. आता मुनगंटीवारांच्या मुखी सरकार बदलाची भाषा येऊ लागल्यानं चर्चांना उधाण आलंय. दरम्यान यावर बोलताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण देत भाष्य केलं आहे.
अवकाळी संदर्भात तातडीने सर्वेक्षण करावं
अमरावतीमध्ये काल(10 एप्रिल) आणि नागपुरात आज (11 एप्रिल) मी अवकाळी पावसाचा संपूर्ण आढावा घेतो आहे. आज जवळपास 13 बैठकीत तेरा तालुक्यात त्या संबंधित आढावा आहे. दरम्यान 14 एप्रिल आहे, दीक्षाभूमी येथे मोठ्या प्रमाणात येणारे जे अनुयायी आहेत. संविधान चौक आणि ड्रॅगन पॅलेस सर्व भागात ज्या ज्या ठिकाणी आंबेडकर जयंती साजरी होणार त्या ठिकाणी पोलीस व्यवस्था चोख असावी, अनुयायांना कुठलाही त्रास न व्हावा, याची काळजी घेतो आहे. सोबतच हनुमान जयंती आणि शोभायात्रा विषयी देखील चर्चा करणार आहे. सिंचन विभागाची बैठक घेणार आहे. त्यात विस्तीर्ण आढावा घेणार असल्याची माहिती ही महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्याप्रमाणे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान झालं आहे, त्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठक लावून तातडीने सर्वेक्षण करावं आणि अहवाल सरकारकडे सादर करावा, असेही ते म्हणाले.
अमित शाहांच्या दौऱ्यांचे राजकीय भांडवल करू नये- बावनकुळे
दरम्यान, अमित शहा यांचा राजकीय दौरा नसून ते किल्ले रायगडावर जात आहे. तेथे कार्यक्रम असल्यामुळे ते तिथे त्या साठी जात आहे. महायुतीच्या पक्षातील एका नेत्याने हे निमंत्रण दिलंय. मलाही आमंत्रण दिलं आहे. रायगडमध्ये येण्या बाबत निमंत्रण दिलं, ते त्यानी स्वीकारलं. यात काही वावगं नाही किंवा राजकीय दौरा नाही. संस्कृती म्हणून अमित शाह जात आहे. त्याचं राजकीय भांडवल करू नये, असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
सरकारकडून वाळूघाट कंट्रोल करण्याची योजना
ज्या अधिकाऱ्यांनी वाळू माफियांसोबत हात मिळवणी केलीय, त्या दहा ते पंधरा अधिकाऱ्यांची यादी आली आहे. सरकारने वेगवेगळ्या माध्यमातून वाळूघाट कंट्रोल करण्याची योजना केली आहे. पर्यावरणाची परवानगी नसताना भंडाऱ्यात रेतीघाट सुरू होते. त्यांना विभागीय आयुक्तांनी सूचना दिल्या होत्या. या ठिकाणी कारवाईची गरज होती. पण झाली नाही. चंद्रपूर, भंडारा, जालना, जाफराबाद यासह अनेक ठिकाणी तक्रारी आल्या आहेत. राहुरीतूनही तक्रार आली आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरीतून ही तक्रारी आल्या आहेत. ज्या-ज्या ठिकाणी असे होत आहे तिथे सरकार सुमोटो कारवाई करत आहे. असेही महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी सांगितलं.
हे ही वाचा
























