एक्स्प्लोर

चंद्रपुरात अन्न व औषध प्रशासनाची कारवाई, मोठा औषधसाठा जप्त

औषध विक्रेते आणि उत्पादकांनी औषधांच्या जाहिराती व विक्री करताना कायद्याचे पालन करावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.

Chandrapur : चंद्रपूर शहरात अन्न व औषध प्रशासनाची कारवाई केली आहे. चंद्रपूर शहरातील जटपुरा गेट परिसरात एका स्टोअरवर अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने धडक कारवाई करत नियमांचे उल्लंघन करणारा 45 हजार 970 रुपये किमतीचा औषधसाठा जप्त केला. या कारवाईमुळे शहरातील औषध विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. 

जप्त करण्यात आलेल्या औषधांची एकूण किंमत 45 हजार 970 रुपये 

मिळालेल्या माहितीनुसार, अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने एका मेगा स्टोअरमध्ये अचानक तपासणी केली. तपासणीदरम्यान स्टोअरमध्ये विक्रीसाठी ठेवलेल्या काही औषधांवर आक्षेपार्ह दावे आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आढळून आल्या. संबंधित औषधांच्या वेष्टनांवर लठ्ठपणा, दमा, हृदयविकार आणि ताप यांसारख्या आजारांवर गुणकारी असल्याचे दावे करण्यात आले होते. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘औषधे आणि जादुई उपाय (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा, 1954’ अंतर्गत अशा प्रकारच्या जाहिरातींना बंदी आहे. या कायद्यानुसार विशिष्ट आजारांवर निश्चित उपचार किंवा हमखास परिणाम दर्शविणाऱ्या जाहिराती करणे गुन्हा मानला जातो. ग्राहकांची दिशाभूल होऊ नये आणि सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण व्हावे, यासाठी अशा जाहिरातींवर कठोर निर्बंध घालण्यात आले आहेत. तपासणीत गंभीर स्वरुपाचे उल्लंघन आढळून आल्याने FDAच्या पथकाने संबंधित औषधांचा संपूर्ण साठा जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या औषधांची एकूण किंमत 45 हजार 970 रुपये असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली.

दरम्यान, संबंधित प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरु असून, औषध विक्रेते आणि उत्पादकांनी औषधांच्या जाहिराती व विक्री करताना कायद्याचे पालन करावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.

बीडमध्ये मोठी कारवाई

अन्न व औषध प्रशासन िभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे मूळ बीड जिल्ह्यातील आहेत. त्यांच्याच या जिल्ह्यामध्ये आता अन्न व औषध प्रशासनाकडून ेगेगळ्या ठिकाणी धाडी टाकल्या जात आहेत. बीड शहराजळ असलेल्या एका लस्सी उत्पादन केंद्रात मुदत बाह्य झालेले अन्नपदार्थ ापरत असल्याचे समोर आले. त्यामुळे या ठिकाणचा 100 लिटर हून अधिकचा लस्सीचा साठा नष्ट करण्यात आला. तसेच या लस्सी उत्पादन केंद्र चालकार काराई करण्यात आली आहे. याबरोबरच माजलगा शहरात रिफाइंड सोयाबीन तेलाचा साठा जप्त करण्यात आला असून शिरूर मध्ये देखील अशीच काराई करण्यात आलीय. याबरोबरच पाटोदा तालुक्यातील दोन दूध संकलन केंद्राची तपासणी करत दुधाचे नमुने तपासणीसाठी पाठण्यात आले आहेत. अन्न व औषध प्रशासनाकडून सुरू झालेल्या या धाडसत्रामुळे भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत.

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
न्यायालय एकनाथ शिंदेंच्याच बाजूने निर्णय देणार, धनुष्यबाण पेलण्याची ताकद फक्त शिंदेंसाहेबांमध्येच, बच्चू कडूंचा दावा
न्यायालय एकनाथ शिंदेंच्याच बाजूने निर्णय देणार, धनुष्यबाण पेलण्याची ताकद फक्त शिंदेंसाहेबांमध्येच, बच्चू कडूंचा दावा
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
Advertisement

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget