Chandrapur Farmer Sold Kidney : सावकारांचा पैशांसाठी तगादा; यु-ट्यूब सर्च करून गाठलं कंबोडिया, कोलकत्यात सर्व तपासण्या नंतर 8 लाख रुपयांना विकली किडनी
Chandrapur Farmer Sold Kidney : दुर्दैवाने त्याची जनावरे मेली आणि तो सावकारचे कर्ज फेडू शकला नाही. तेव्हापासून या खाजगी सावकाराने वारंवार पैसे देण्याचा तगादा लावला.

Chandrapur Farmer Sold Kidney : कर्जाचा परतावा करण्यासाठी सावकारांनी शेतकऱ्याला किडनी (Kidney) विकायला लावल्याचा धक्कादायक आरोप चंद्रपूर जिल्ह्यातील एका तरुण शेतकऱ्याने केला आहे. नागभीड तालुक्यातील मिंथुर येथे राहणाऱ्या रोशन कुडे या शेतकऱ्याने हा आरोप केला आहे. काही वर्षांपूर्वी रोशन याने दुधाचा व्यवसाय (Milk business) सुरू करण्यासाठी एक लाख रुपये व्याजाने खाजगी सावकाराकडून घेतले होते. मात्र, दुर्दैवाने त्याची जनावरे मेली आणि तो सावकारचे कर्ज फेडू शकला नाही. तेव्हापासून या खाजगी सावकाराने वारंवार पैसे देण्याचा तगादा लावला.
दिवसेंदिवस पैसे थकत गेल्याने मुद्दलाची रक्कम आणि व्याजाच्या रकमेत (Loan Interest) मोठी वाढ झाली. अखेर त्या सावकाराने पैसे फेडण्यासाठी शेतकऱ्याला त्याची किडनी विकण्याचा सल्ला दिला आणि त्या सावकाराच्या सल्ल्यानेच रोशन कुठे या शेतकऱ्याने आधी कोलकाता (Kolkata) आणि नंतर तिथून कंबोडिया (Kambodia news) येथे जाऊन 8 लाख रुपयांना स्वत:ची किडनी विकली. सावकारामुळेच माझ्यावर ही वेळ आल्याचा आरोप करत पीडित शेतकऱ्याने सावकारावर कारवाईची मागणी केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
Chandrapur Farmer Sold Kidney : यु-ट्यूब सर्च करून गाठलं कंबोडिया
सावकारांचा पैशांसाठी तगादा सुरू असल्यामुळे किडनी विकून पैसे परतफेड करण्याचा निर्णय घेतला. यासाठी यु-ट्यूब सर्च करून आपण कंबोडिया या देशात गेलो. तत्पूर्वी कोलकाता येथे आवश्यक तपासण्या करण्यात आल्या. यानंतर कंबोडिया देशात आठ लाख रुपयांना किडनी विकली आणि तेही सावकारांनी बळकावल्याचे शेतकरी रोशन कुळे यांनी पोलिसांना सांगितल्याचे समजते.
Chandrapur Farmer Sold Kidney : रोशन कुडे यांच्या वडिलांनी सांगितली आपबिती
सावकाराच्या जाचाला कंटाळून किडनी विकणाऱ्या शेतकरी रोशन कुडे यांच्या वडिलांनी त्यांचा मुलगा सावकारी पाशात कसा फसत गेला आणि अखेर त्याला आपली किडनी का विकावी लागली, याची विस्तृत हृदयद्रावक व्यथा एबीपी माझाच्या कॅमेरासमोर मांडली आहे. कोरोना काळात डबघाईला आलेला दुधाचा व्यवसाय आणि त्यानंतर आलेल्या लंपी आजारामुळे रोशन कुडे सावकाराकडून घेतलेले अवघे एक लाख रुपयांचे कर्ज फेडू शकले नाही. मात्र दुसरीकडे सावकार त्याला पद्धतशीर आपल्या जाळ्यात अडकवत राहिले. व्याजावर व्याज चढवत लाखो रुपयांची रक्कम त्याच्याकडून लाटली आणि अखेर त्याला किडनी विकण्यास भाग पाडलं, अशी व्यथा शिवदास कुडे यांनी मांडली आहे. (Chandrapur Farmer Sold kidney for loan repayment)
Chandrashekhar Bawankule : हा प्रकार गंभीर माहिती घेऊन यावर कडक कार्यवाही करू
कर्जाच्या परताव्यासाठी सावकार आणि किडनी विकायला लावली हा गंभीर प्रकार आहे. असा प्रकार झाला असेल तर त्यावर कडक कारवाई करू , अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणार दिलीय. चंद्रपूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला कर्जाचा परतावा करण्यासाठी सावकारणे किडनी विकायला लावल्याचा दावा रोशन खुडे या शेतकऱ्याने केला होता. यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकारची तातडीने माहिती घेऊ आणि यावर कडक कार्यवाही करू, हा प्रकार गंभीर आहे. असेही ते म्हणाले.
आणखी वाचा























