एक्स्प्लोर

शिवसेना सेक्युलर झालीय? या प्रश्नावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची अडचण, मदतीला धावले छगन भुजबळ 

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाराष्ट्र विकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर लगेच मुख्यमंत्री ठाकरे यांनी पहिली मंत्रिमंडळ बैठक घेत काही निर्णय देखील घेतले. या मंत्रिमंडळ बैठकीनंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी संबोधित केले.

मुंबई : शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाराष्ट्र विकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर लगेच मुख्यमंत्री ठाकरे यांनी पहिली मंत्रिमंडळ बैठक घेत काही निर्णय देखील घेतले. या मंत्रिमंडळ बैठकीनंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी संबोधित केले. या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने शिवसेना सेक्युलर झाली आहे का? असा प्रश्न विचारल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सेक्युलर म्हणजे काय? असा प्रतिप्रश्न त्यांनी पत्रकाराला केला. त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून शपथ घेतलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ त्यांच्या मदतीला धावून आले. यावेळी भुजबळ म्हणाले की, हा कॉमन मिनिमम प्रोग्रॅम आहे. आणि संविधानाच्या प्रस्तावनेत सेक्युलर अर्थात धर्मनिरपेक्ष शब्द आहे. तुम्ही संविधान वाचून घ्या, तुम्हाला कळेल या शब्दाचा अर्थ, असं म्हणून त्यांनी ठाकरेंची बाजू सावरून घेतली. यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी देखील संविधानात जे दिलं आहे तेच आहे, असं म्हणत विषयाला बगल दिली. हे ही वाचा - 'मी उद्धव बाळासाहेब ठाकरे'... लेखक, कवी, उत्तम फोटोग्राफर ते मुख्यमंत्री, भन्नाट जीवनप्रवास   उद्धव ठाकरेंनी पहिल्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी मोठा निर्णय घेतला. रायगडच्या संवर्धनासाठी जवळपास 606 कोटींचं काम आहे. यासाठी 20 कोटी खर्च झाले आहेत, तर 20 कोटी रुपये मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आले. शेतकऱ्यांबाबतची येत्या दोन दिवसात मोठा निर्णय घेऊ, असा शब्दही उद्धव ठाकरेंनी दिला. अवकाळी पाऊस आणि दुष्काळामुळे राज्यातील शेतकरी त्रस्त आहेत. आमची शेतकऱ्यांना मदत करण्याची इच्छा होती, मात्र हातात काहीही नव्हत. मात्र आता राज्याच्या मुख्य सचिवांना निर्देश दिले आहेत की, मागील सरकारने जे आदेश दिलेले त्यांचं वास्तववादी चित्र काय आहे? याबाबत माहिती द्या. शेतकऱ्यांना तुंटपुंजी मदत करायची नाही, त्यामुळे सर्व माहिती घेऊन त्याबाबत येत्या दोन दिवसात निर्णय घेऊ, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. मी मुख्यमंत्री म्हणून जे आदेश दिलेत त्याला हवं तर श्वेतपत्रिका म्हणा किंवा काही म्हणा पण शेतकऱ्यांना मदत मिळाली की नाही याबाबतचं वास्तव मला कळलं पाहिजे, यासाठी हे निर्देश दिले आहेत. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचं सरकार सर्वसामान्य जनतेचं सरकार असेल. राज्यात कोणालाही दहशत वाटेल असं वातावरण दिसणार नाही. देशातील नंबर एकच राज्य महाराष्ट्र करु आणि राज्याच्या वैभवात भर पडेल असं काम करु, असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्या पत्रकार परिषदेत राज्यातील जनतेला दिलं.
पदभार स्वीकारल्यावर काय करणार ठाकरे सरकार? महाराष्ट्र विकास आघाडीचा किमान समान कार्यक्रम जाहीर
'मी उद्धव बाळासाहेब ठाकरे'...उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्रीपदाची शपथ | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Nepal : नेपाळमधील भीषण महाप्रलयाच्या 11 दिवसानंतर चमत्कार, ढिगाऱ्यातून महिलेला जिवंत बाहेर काढलं-VIDEO
नेपाळमधील भीषण महाप्रलयाच्या 11 दिवसानंतर चमत्कार, ढिगाऱ्यातून महिलेला जिवंत बाहेर काढलं
Dahihandi 2026: मुंबईत दहीहंडी उत्सवात मन हेलावणारी घटना; दोरी बांधलेला विटांचा कॉलम कोसळला, 7 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
मुंबईत दहीहंडी उत्सवात मन हेलावणारी घटना; दोरी बांधलेला विटांचा कॉलम कोसळला, 7 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
कुणाच्या ताटातलं घेऊ नये, हक्कावर गदा आली तर ओबीसीही शांत बसणार नाहीत, मराठा आरक्षणाबाबत नेमकं काय म्हणाले गुलबाराव पाटील? 
कुणाच्या ताटातलं घेऊ नये, हक्कावर गदा आली तर ओबीसीही शांत बसणार नाहीत, मराठा आरक्षणाबाबत नेमकं काय म्हणाले गुलबाराव पाटील? 
Sonam Wangchuk: 'तर सर्वात मोठं आंदोलन होईल', सोनम वांगचुक यांनी आता नेमकी कोणती मागणी केली?
'तर सर्वात मोठं आंदोलन होईल', सोनम वांगचुक यांनी आता नेमकी कोणती मागणी केली?

व्हिडीओ

Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO
Dahihandi 2026 Jai Jawan: 1..2..3..4..5..6..7..8..9..10..11...; जय जवानच्या संदीप ढवळेंची मोठी घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nepal : नेपाळमधील भीषण महाप्रलयाच्या 11 दिवसानंतर चमत्कार, ढिगाऱ्यातून महिलेला जिवंत बाहेर काढलं-VIDEO
नेपाळमधील भीषण महाप्रलयाच्या 11 दिवसानंतर चमत्कार, ढिगाऱ्यातून महिलेला जिवंत बाहेर काढलं
Sonam Wangchuk: 'तर सर्वात मोठं आंदोलन होईल', सोनम वांगचुक यांनी आता नेमकी कोणती मागणी केली?
'तर सर्वात मोठं आंदोलन होईल', सोनम वांगचुक यांनी आता नेमकी कोणती मागणी केली?
Dahihandi 2026: मुंबईत दहीहंडी उत्सवात मन हेलावणारी घटना; दोरी बांधलेला विटांचा कॉलम कोसळला, 7 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
मुंबईत दहीहंडी उत्सवात मन हेलावणारी घटना; दोरी बांधलेला विटांचा कॉलम कोसळला, 7 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
Gold Chain Lost: केंद्रीय मंत्र्यांच्या गळ्यात हार घालायला गेला अन् गळ्यातली सोनसाखळी गमावून बसला; नेत्याला गर्दीचा फटका
केंद्रीय मंत्र्यांच्या गळ्यात हार घालायला गेला अन् गळ्यातली सोनसाखळी गमावून बसला; नेत्याला गर्दीचा फटका
कर्जाच्या परतफेडीवरून महिलेचे अपहरण करून मारहाण, घरी बोलावून ओलीस ठेवलं, नग्न करून व्हिडिओ सुद्धा चित्रित; भयंकर कटात दोन महिला सुद्धा सामील
कर्जाच्या परतफेडीवरून महिलेचे अपहरण करून मारहाण, घरी बोलावून ओलीस ठेवलं, नग्न करून व्हिडिओ सुद्धा चित्रित; भयंकर कटात दोन महिला सुद्धा सामील
Swatantra Bhardwaj : निशू आझादच्या वडिलांना मारहाण, स्वतंत्र भारद्वाजला अटक, कोर्टानं पोलीस कोठडीत पाठवलं...   
निशू आझादच्या वडिलांना मारहाण, दिल्ली पोलिसांकडून स्वतंत्र भारद्वाजला अटक, कोर्टाचा मोठा निर्णय
सोलापुरात मराठा आंदोलक आक्रमक; गोपीचंद पडळकरांचा ताफा अडवला, आमदार म्हणाले, माझा पाठिंबा पण...
सोलापुरात मराठा आंदोलक आक्रमक; गोपीचंद पडळकरांचा ताफा अडवला, आमदार म्हणाले, माझा पाठिंबा पण...
Vidyanand Bapat : विद्यानंद बापटांना एआयच्या माध्यमातून डीजेच्या तालावर नाचवलं; व्हिडीओ व्हायरल, प्रतिक्रिया देताना मोदींच्या एका व्हिडीओचा संदर्भ दिला अन् म्हणाले...
विद्यानंद बापटांना एआयच्या माध्यमातून डीजेच्या तालावर नाचवलं; व्हिडीओ व्हायरल, प्रतिक्रिया देताना मोदींच्या एका व्हिडीओचा संदर्भ दिला अन् म्हणाले...
Embed widget