Maharashtra Cabinet Decision : मोठी बातमी! उत्पादन शुल्कात सुधारणा, राज्य मंत्रिमंडळाचे 3 मोठे निर्णय
Maharashtra Cabinet Decision मुंबई : राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत आज महत्त्वाचे 3 निर्णय घेण्यात आले असून उत्पादन शुल्कात सुधारणा करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आलाय.

Maharashtra Cabinet Decision मुंबई : राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत आज महत्त्वाचे 3 निर्णय घेण्यात (Maharashtra Cabinet Decision) आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली. महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना करण्यात आल्या नंतर महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगास (Maharashtra State Commission for Scheduled Castes) वैधानिक दर्जा देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तर आगामी विधिमंडळ अधिवेशनात हे विधेयक आणणार असल्याची माहिती सामाजिक न्याय विभागाकडून देण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांच्या विद्यावेतना बाबत ही मोठा निर्णय
दरम्यान, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील शासकीय भौतिकोपचार आणि व्यवसायोपचार पदवी विद्यार्थ्यांच्या विद्यावेतना बाबत ही मोठा निर्णय घेण्यात आला असून या विद्यावेतनात 6,250 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात 10,000 ची वाढ करण्यात आली आहे. तर बी.एस्सी. नर्सिंग अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनाही आता 8,000 विद्यावेतन मिळणार आहे. अशी माहिती वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. अशातच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसूल वाढीच्या दृष्टीने ही आजच्या बैठकीत उपाय योजले गेले आहेत. विविध प्रकारच्या दरांमध्ये सुधारणा करण्यात येणार आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात आली आहे.
शिंदेंच्या मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार, मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय घडलं?
दुसरीकडे, आजची महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची मुंबईतील बैठक वेगळ्या करणासाठीही चर्चेत आली आहे. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 'कोण कोणाचा बाप' यावर जोरदार चर्चा रंगल्याची माहिती पुढे आली आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांची तक्रार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी धाराशिव येथील भाषणात शिवसेनेवर नाव न घेता टीका केली होती. सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा मुख्यमंत्री बसला आहे, असं नितेश राणे म्हणाले होते. नितेश राणेंचं हे वाक्य शिवसेना मंत्र्यांच्या जिव्हारी लागले. त्यामुळे आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांनी थेट देवेंद्र फडणवीसांकडेच तक्रार केल्याची माहिती समोर येत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
























