Satara News: वर्धापनदिनी शरद पवार गटाला साताऱ्यात धक्का, पाटणकर भाजपमध्ये गेले, पण शिंदे गटाच्या नेत्याचं टेन्शन वाढलं
Satyajit Patankar joins BJP: शरद पवारांना मोठा धक्का; सत्यजितसिंह पाटणकर यांचा भाजपात प्रवेश, पाटणमध्ये नवा राजकीय भूकंप. साताऱ्यात भाजपची ताकद वाढली, शंभुराजेंसमोर नवं आव्हान

Sharad Pawar Camp NCP & BJP: राष्ट्रवादी शरद पवार गटाला पक्षाच्या वर्धापनदिनी साताऱ्यात मोठा धक्का बसला आहे. पाटण तालुक्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सत्यजितसिंह पाटणकर (Satyajit Patankar) आणि काँग्रेसचे प्रांतिक अध्यक्ष हिंदुराव पाटील यांचा हजारो कार्यकर्त्यांसह भाजपात पक्षप्रवेश केला. भाजपच्या या खेळीमुळे शरद पवार गटाला (NCP) खिंडार पडले असले तरी यामागे वेगळीच खेळी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांना आव्हान देण्यासाठी भाजपने हा डाव टाकल्याची चर्चा आहे.
भाजपाच्या मुंबईतील नरिमन पॉईंट प्रदेश कार्यालयात हा पक्षप्रवेश सुरू आहे. या पक्षप्रवेशासाठी भाजप कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, सातारा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार अतुल भोसले, माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील हे उपस्थित आहेत. सातारा जिल्ह्यात काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी पक्षाला हा मोठा धक्का आहे. तर शंभूराज देसाई यांच्यासाठी हे एक आव्हान असणार आहे. या पक्षप्रवेशामुळे आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये पाटण विधानसभा मतदारसंघात रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.
Satara News: हाडामासाचा पदाधिकारी सहभागी झाल्याचा आनंद : रवींद्र चव्हाण
सत्यजीत पाटणकर यांच्या पक्षप्रवेश सोहळ्यात रवींद्र चव्हाण यांनी भाषण केले. भाजप कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले की, साताऱ्यातून भाजपमध्ये हाडामासाचा पदाधिकारी सहभागी होतं आहे, याचा आनंद आहे. सरकारच्या योजना प्रामाणिकपणे राबवणारा हा पक्ष आहे. आपण ज्या विश्वासाने पक्षात प्रवेश केला आहे, त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असे वक्तव्य त्यांनी केले.
Satyajit Patankar: भाजपसाठी गावागावात जाऊन काम करायचे आहे: सत्यजीत पाटणकर
आपल्या तालुक्याचं भवितव्य ठरवण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश केलाय. अनेक प्रश्न आपल्या तालुक्यातले आपण सोडवले आहेत. शिस्तीने चालणारा हा पक्ष आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. शिस्तीने चालत नव्हतो म्हणूनच आपला पराभव होतं होता. निवडणुका तोंडावर आहेत, वेळ कमी आहे. शेतकरी कामात व्यस्त असतात. गावागावात जाऊन पक्षाचं काम करायचे आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. तर पाटणकर हे तळागाळातील खरे नेतृत्व आहे. त्यांच्या येण्याने भाजपला सातारा जिल्ह्यात मोठी ताकद मिळाली आहे, असे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली आहे. दरम्यान, या पक्षप्रवेशावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कुंभार गावच्या सरपंच सारिका योगेश पाटणकर यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
आणखी वाचा
सत्यजीत पाटणकरांचा भाजपमध्ये प्रवेश, उदयनराजे म्हणाले, बच्चू, बच्चू म्हणून डच्चू देऊ नका!























