एक्स्प्लोर

लोकार्पणापूर्वीच Samruddhi Highway वरुन वाहनं सुसाट, अपघातानंतरही महामार्गावर वाहनांची वर्दळ

Samruddhi Highway : लोकार्पण झालेलं नसतानाही समृद्धी महामार्गावरुन खाजगी प्रवासी वाहने, ट्रक सुसाट वेगाने धावताना दिसत आहेत. अपघातानंतरही वाहनांनी वर्दळ कमी झालेली दिसत नाही.

Samruddhi Highway : बुलढाणा : समृद्धी महामार्ग हा अजूनही लोकार्पणाच्या प्रतीक्षेत आहे. नागपूर ते शिर्डीपर्यंत हा महामार्ग काही ठिकाणी पुलाचं काम सोडलं तर जवळपास पूर्णत्वास आलेला आहे. परंतु वाहतुकीसाठी याची कोणतीही तांत्रिक चाचणी झालेली नाही. मात्र तरीही या महामार्गावरुन खाजगी प्रवासी वाहने, ट्रक सुसाट वेगाने धावताना दिसत आहेत. तीन-चार दिवसांपूर्वीच बुलढाण्यातील मेहकर इथल्या व्यापाऱ्यांच्या कारला गंभीर अपघात होऊन एक व्यापाऱ्याला आपला जीव गमवावा लागला होता. त्यामुळे समृद्धी महामार्ग प्रशासनाने या मार्गावरुन वाहतूक करु नये, असं आवाहन देखील केलं होतं. पण तरीही आज सकाळी या महामार्गावर खाजगी प्रवासी वाहतूक करणारी वाहने, ट्रक सुसाट जाताना दिसत आहेत.

चालकाचं नियंत्रण सुटून 12 जून रोजी अपघात 
समृद्धी महामार्ग सुरु होण्यापूर्वीच त्यावरुन वाहतूक सुरु असल्याने अपघातांना सुरुवात झाली आहे. काही व्यावसायिक औरंगाबादमधून समृद्धी महामार्गावरुन मेहकरकडे येत होते. अचानक मुसळधार पाऊस सुरु झाला. त्याचवेळी तांदुळवाडी शिवारात पोहोचले असताना चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं. परिणामी कार महामार्गावरील डिव्हायडरच्या खड्ड्यात पलटून अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की कारने तीन ते चार वेळा पलटी घेऊन खड्डयात अडकली. या अपघातात मेहकर इथले व्यावसायिक बळीराम खोकले यांनी जागीच प्राण सोडले तर इतर दोघे गंभीर जखमी झाले. या अपघातात कारचा चुराडा झाला.

समृद्धी महामार्गावर अनेक ठिकाणी काम सुरु
समृद्धी महामार्गाचं लोकार्पण दोन वेळा पुढे ढकलण्यात आलं आहे. याचं मुख्य कारण म्हणजे अजूनही समृद्धी महामार्गचं काम हे अनेक ठिकाणी अपूर्ण आहे. वाशीम जिल्ह्यात दोन ठिकाणी मोठ्या पुलाचं काम सुरु असून बुलढाण्यात खडकपूर्णा नदीवरील पुलाचं काम करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी छोटे-मोठे गॅप जोडण्यात येत असल्याने या महामार्गावरुन वाहतूक करणं धोकादायक आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर आणि देऊळगाव राजा येथील महामार्गावरील एन्ट्री पॉईंट्सवर कुणाचेही निर्बंध नसल्याने नागरिक आपली वाहने समृद्धी महामार्गावर घेऊन जातात. या मार्गावरुन नागपूरच्या दिशेने किंवा औरंगाबाद, शिर्डीकडे प्रवास करतात. महामार्गावर सध्या वाहने कमी असल्याने वाहनचालक सुसाट वेगाने जात असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे महामार्गावर अपघात होताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसात या परिसरात महामार्गावर छोटे मोठे चार अपघात घडले असून आता यावर निर्बंध घालणं गरजेचं झालं आहे.

महामार्गावरुन वाहतूक करणं धोकादायक
हा महामार्ग लवकरच पूर्णत्वाकडे जाणार असला तरी देखील तांत्रिक तपासणीनंतरच या मार्गावरुन वाहतुकीची परवानगी दिली जाणार आहे. त्यामुळे या महामार्गावरुन सुसाट वाहने घेऊन जाणं धोकादायक असून नागरिकांनी प्रवास करु नये असं आवाहन करण्यात येत आहे. शिवाय संबंधित विभागाचे अधिकारी यावर बंधन घालतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Senate Election : सिनेट निवडणुकीत आदित्य ठाकरेंकडून ABVP चा सुफडासाफDharmaveer 2 Review : धर्मवीर - 2! फर्स्ट डे... फर्स्ट शो, फर्स्ट रिव्ह्यूZero Hour Full : फडणवीसांच्या ऑफिसची तोडफोड तेधर्मवीर 2 चा रिव्ह्यू;सविस्तर चर्चाZero Hour Maharashtra Politics : अश्लाघ्य भाषा वापरणाऱ्यांचे कान कोण टोचणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
Embed widget