एक्स्प्लोर

निवडणूक २०२४ एक्झिट पोल

(Source:  Dainik Bhaskar)

गर्भपिशवीला टाके घालण्यासाठी रुग्णालयात दाखल, मात्र चुकून गर्भपाताच्याच गोळ्या दिल्या, ढिसाळ कारभारानं संताप

Buldhana News: बुलढाणा जिल्ह्यातील स्त्री रुग्णालयात आरोग्य कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सहा महिन्यांच्या गर्भवतीला गर्भ पिशवीला टाके घालण्यासाठी भरती करण्यात आलं, मात्र तिला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या.

Buldhana News: रुग्णालयातील ढिसाळ कारभाराचा फटका रुग्णांना बसल्याची अनेक उदाहरणं नेहमीच चर्चेत असतात. असाच काहीसा धक्कादायक प्रकार बुलढाण्यात (Buldhana News) समोर आला आहे. बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातील ढिसाळ काराभाराचा फटका एका सहा महिन्याच्या गर्भवती महिलेला बसला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील धक्कादायक प्रकारामुळे एका आईचं मातृत्त्व हिरावलं गेलं. रुग्णालयाच्या ढिसाळ कारभारामुळे महिलेचा गर्भपात होऊन तिला आपल्या बाळाला गमवावं लागलं. दरम्यान, धक्कादायक प्रकारानंतर संतप्त नातेवाईकांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना धारेवर धरत दोषी आरोग्य कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.                    

बुलढाणा जिल्ह्यातील स्त्री रुग्णालयात आरोग्य कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सहा महिन्यांच्या गर्भवती महिलेला गर्भ पिशवीला टाके घालण्यासाठी भरती करण्यात आलं होतं. तिचा नैसर्गिक गर्भपात होऊ नये यासाठी या महिलेला उपचार करण्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. मात्र महिलेवर गर्भपाताचे उपचार करण्यात आल्यानं तिचा गर्भपात होऊन बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप या महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे.             

बुलढाण्यात राहणाऱ्या सौ. विद्या वाघ या सहा महिन्याच्या गर्भवती होत्या. त्या आपल्या चेकअपसाठी बुलढाण्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयात गेल्या. त्यावेळी गर्भवती महिलेला जिल्हा स्त्री रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासलं. त्यावेळी डॉक्टरांच्या लक्षात आलं की, महिलेच्या गर्भ पिशवीचं मुख उघडलं असून ते मोठं झालं आहे. त्यामुळे गर्भारपणातील पुढच्या अडचणी टाळण्यासाठी डॉक्टरांनी गर्भ पिशवीला टाके देण्याची गरज असल्याचं सांगितलं. जर टाके घातले नाहीत, तर नैसर्गिक गर्भपाताचा धोका असल्याचंही डॉक्टरांनी गर्भवती महिला आणि तिच्या नातेवाईकांना सांगितलं. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, महिला गर्भ पिशवीला टाके देण्यासाठी रुग्णालयात दाखल झाली.         

अशातच गर्भवती महिलेचा गर्भपात झाला. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी महिलेला गर्भपात होण्याची औषधं दिल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. तसेच, जिल्हा शल्य चिकित्सक सुभाष चव्हाण यांना चांगलच धारेवर धरलं आहे. मात्र याबाबत डॉ.सुभाष चव्हाण यांनी माध्यमांना ही मोठी चुकी असून यात चौकशी करून प्रतिक्रिया देऊ अस सांगितलं आहे. दरम्यान, या धक्कादायक प्रकारामुळे शासकीय रुग्णालयातील ढिसाळ आणि बेजबादारपणा उघडकीस आला आहे. रुग्णालयाचा ढिसाळ कारभार आणि बेजबाबदारपणा यामुळे महिलेपासून तिचं मातृत्त्व हिरावलं गेलं आहे.         

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi In Kolhapur : शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तीविरोधात लढाई ते आरक्षण मर्यादेची भिंत तोडणारच! राहुल गांधींनी रणशिंग फुंकले!
शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तीविरोधात लढाई ते आरक्षण मर्यादेची भिंत तोडणारच! राहुल गांधींनी रणशिंग फुंकले!
Tomato Price : टोमॅटोची 'लाली' वाढली, बळीराजाला दिलासा, 1 किलो टोमॅटो घेण्यासाठी द्यावे लागतात 'एवढे' पैसे 
टोमॅटोची 'लाली' वाढली, बळीराजाला दिलासा, 1 किलो टोमॅटो घेण्यासाठी द्यावे लागतात 'एवढे' पैसे 
Mangal Gochar 2024 : दिवाळीपूर्वीच मंगळाची चाल बदलणार; 3 राशींचं नशीब हिऱ्यासारखं चमकणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
दिवाळीपूर्वीच मंगळाची चाल बदलणार; 3 राशींचं नशीब हिऱ्यासारखं चमकणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
मोठी बातमी! क्रॉस व्होटिंगचा ठपका असलेले काँग्रेस आमदार अचानक शरद पवारांच्या भेटीला, नेमकं काय आहे कारण?
मोठी बातमी! क्रॉस व्होटिंगचा ठपका असलेले काँग्रेस आमदार अचानक शरद पवारांच्या भेटीला, नेमकं काय आहे कारण?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nitin Gadkari Sangli : मुंबई-पुणे-बंगळूर महामार्ग बांधणार, पाच ठिकाणी उतरणार विमानRamRaje Nimbalkar Join NCP | तुतारी हाती घ्यायची का? असं विचारताच कार्यकर्त्यांचा एकच जल्लोषRaj Thackeray Nashik : मनसेच्या 500 पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे देणार कानमंत्रएबीपी माझा हेडलाईन्स : Abp Majha Headlines : 07 AM 06 October 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi In Kolhapur : शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तीविरोधात लढाई ते आरक्षण मर्यादेची भिंत तोडणारच! राहुल गांधींनी रणशिंग फुंकले!
शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तीविरोधात लढाई ते आरक्षण मर्यादेची भिंत तोडणारच! राहुल गांधींनी रणशिंग फुंकले!
Tomato Price : टोमॅटोची 'लाली' वाढली, बळीराजाला दिलासा, 1 किलो टोमॅटो घेण्यासाठी द्यावे लागतात 'एवढे' पैसे 
टोमॅटोची 'लाली' वाढली, बळीराजाला दिलासा, 1 किलो टोमॅटो घेण्यासाठी द्यावे लागतात 'एवढे' पैसे 
Mangal Gochar 2024 : दिवाळीपूर्वीच मंगळाची चाल बदलणार; 3 राशींचं नशीब हिऱ्यासारखं चमकणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
दिवाळीपूर्वीच मंगळाची चाल बदलणार; 3 राशींचं नशीब हिऱ्यासारखं चमकणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
मोठी बातमी! क्रॉस व्होटिंगचा ठपका असलेले काँग्रेस आमदार अचानक शरद पवारांच्या भेटीला, नेमकं काय आहे कारण?
मोठी बातमी! क्रॉस व्होटिंगचा ठपका असलेले काँग्रेस आमदार अचानक शरद पवारांच्या भेटीला, नेमकं काय आहे कारण?
Ahmednagar News : मंदिराच्या परिसरात दारु आणि मांसविक्रीच्या दुकानांवर बंदी घाला, वारकऱ्यांच्या मागणीवर विखे पाटील म्हणाले...
मंदिराच्या परिसरात दारु आणि मांसविक्रीच्या दुकानांवर बंदी घाला, वारकऱ्यांच्या मागणीवर विखे पाटील म्हणाले...
Sadabhau Khot : मुस्लिमांच्या सासऱ्यांनंतर आता शरद पवारांचा अलिबाबा म्हणून उल्लेख; सदाभाऊ खोत यांची घणाघाती टीका
मुस्लिमांच्या सासऱ्यांनंतर आता शरद पवारांचा अलिबाबा म्हणून उल्लेख; सदाभाऊ खोत यांची घणाघाती टीका
Pune Lalit Patil case: ललित पाटील प्रकरणातील 'ते' 5 बडतर्फ पोलीस पुन्हा सेवेत; नव्याने केली नियुक्ती, नेमकं काय आहे कारण?
ललित पाटील प्रकरणातील 'ते' 5 बडतर्फ पोलीस पुन्हा सेवेत; नव्याने केली नियुक्ती, नेमकं काय आहे कारण?
IND W vs PAK W : भारत आणि पाकिस्तान आमने सामने येणार, टी 20 वर्ल्ड कपमध्ये हायव्होल्टेज लढत, हरमनप्रीत कौरपुढं करो वा मरो स्थिती
भारतापुढं करो या मरो स्थिती, पाकिस्तानवर विजय मिळवावा लागणार, हरमनप्रीत कौरच्या टीमपुढं मोठं आव्हान  
Embed widget