एक्स्प्लोर

बुलढाणा जिल्ह्यात घातक शस्त्रांची तस्करी करणाऱ्या रॅकेट सक्रिय; 14 देशी पिस्तुल, 25 मॅगझीन, 8 जिवंत काडतूस जप्त

कारवाईत 14 देशी पिस्टल, 25 मॅगझीन, आठ जीवंत काडतुसे जप्त केली आहे. त्यामुळे मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात घातक हत्यार तस्करीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. 

बुलढाणा : ठाणे पोलिसांनी बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा पोलीस स्टेशन हद्दीत धडक कारवाई करून एकच खळबळ उडवून दिली आहे.  ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या मालमत्ता गुन्हे शोध पथकाने संग्रामपूर तालुक्यातील टुनकी वसाली परिसरात छापा टाकून मोठ्या प्रमाणात अवैध शस्त्र साठा जप्त केला आहे. या कारवाईत 14 देशी पिस्टल, 25 मॅगझीन, आठ जीवंत काडतुसे जप्त केली आहे. त्यामुळे मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात घातक हत्यार तस्करीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. 

 बुलढाणा जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग फक्त गुटखा कारवाईसाठी  प्रसिद्ध असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. सोनाळा पोलिसांनी या कारवाईवर बोलने टाळले. यावेळी अटकेतील आरोपीच्या नातेवाईकांच्या घराची झडती घेण्यात आली. त्यादरम्यान यात मुख्य असलेला आरोपी तेरसिंग सिकलकार हा आढळून आला नाही. ठाणे पोलीसांनी घरजप्ती पंचनामा व फरार आरोपी तेरसिग यास हजर करण्यास निवेदन पत्र दिल्याची मोघम नोंद सोनाळा पोलीस स्टेशन मध्ये घेण्यात आली आहे.

ठाणे पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार मध्य प्रदेशातून ठाणे शहरातील राबोडी पोलीस स्टेशन हद्दीत घातक हत्यारांची तस्करीसाठी गेलेले रमेश मिसरीया किराडे )वय 25),  मून्ना अमाशा अलवे (वय 34 रा. पाचोरी ता. दातपाडी जि. बऱ्हाणपूर, मध्यप्रदेश) या दोन्ही आरोपींना 1 जूनला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तीन देसी बनावटीचे पिस्टल, सह मॅग्झीन आणि चार जिवंत काडतुसे हस्तगत केली. यासंदर्भात राबोडी पोलीस स्टेशनला कलम 3, 7, 25 भादवी सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१), 125  प्रमाणे गुन्हा दाखल आहे. ठाणे पोलिसांनी आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी विक्रीसाठी आणलेली 14 देसी पिस्टल, 25 मॅगझीन, आठ जीवंत काडतूस नातेवाईकांकडे लपवून ठेवल्याची कबुली दिली. 

ठाणे पोलिसांनी एका आरोपीला घेऊन थेट संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा पोलीस स्टेशन गाठले. व हद्दीतील टूनकी वसाली परिसरातील गावात नातेवाईकांना माहिती न पडू देता घरात लपवून ठेवलेले घातक हत्यार जप्त केले. घराच्या झडतीत  14 देसी पिस्टल, 25 मॅगझीन, आठ जीवंत काडतूसे आढळून आले असून ठाणे पोलिसांनी जप्त केले आहे. ठाणे पोलिसांच्या या कारवाईने बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांवर व  कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सदर कारवाई ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या गुन्हे शोध पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंद रावराणे यांनी केली आहे. सोनाळा पोलीस स्टेशन हद्दीतील टूनकी वसाली परिसरातील आदिवासी पट्ट्यात सर्व गुण्यागोविंदाने राहत आहेत. मात्र मध्य प्रदेशातील घातक हत्यार तस्करी करणारे या परीसराचे नाव धूळीस मिळवत आहे. अशा घटनांमुळे या परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

एटीएसच्या पथकाने केली होती मोठी कारवाई

दिड वर्षापूर्वी 13 नोव्हेंबर 2021 ला झारखंड ए टी एस च्या कारवाईत मध्यप्रदेशातील पाचोरी हे गाव अवैध हत्यार विक्रीचे केंद्र असल्याचे आढळून आले होते. तो धागा पकडत झारखंड दहशतवाद विरोधी पथकाने 20 नोव्हेंबर 2021 ला संग्रामपूर तालुक्यातील ग्राम टूनकी येथे मध्यप्रदेशातील तीन आरोपींना रंगेहात पकडून त्यांच्या कडून तब्बल 14 देशी पिस्तूल व 160 जिवंत काडतुसे जप्त केली होती. गत 18 महिन्यांनंतर ठाणे पोलिसांनी सोनाळा पोलीस स्टेशन हद्दीत धडाकेबाज कारवाई करीत घातक हत्यार जप्त केल्याने स्थानिक पोलीस प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.घातक हत्यारांची तस्करी करणाऱ्या दोन्ही आरोपींना ठाणे न्यायालयाने 10 जून पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : ABP MajhaCentral Department On Bangladeshiबांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाईचे महाराष्ट्र सरकारला आदेशBird flu Maharashtra | राज्यात बर्ड फ्ल्यूने पोल्ट्री व्यावसायिकांचं वाढवलं टेंशन Special ReportSpecial Report Walmik Karadवाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयीन कोठडीचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Embed widget