(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Buldhana : वाण नदीपात्रात आढळले मृत अर्भकांचे अवशेष, अवैध गर्भपात करणारं मोठं रॅकेट सक्रिय; पोलीस चौकशी सुरू
Buldhana Marathi News : येथील आदिवासी भागात अनेक बोगस डॉक्टर कार्यरत असल्याने यापूर्वीही या परिसरात अनेकदा अवैध गर्भपाताच्या घटना उघडकीस आल्या आहेत.
Buldhana Marathi News : बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील कोलद गावाजवळ वाण नदीपात्रात गर्भपातानंतर अनेक अर्भकाचे अवशेष (Dead Babies Found) नदीच्या पाण्यात फेकल्याचं आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मंगळवारी सायंकाळी हा प्रकार उघडकीस आल्याने परिसरातील नागरिकानी नदीपात्रासमोर एकच गर्दी केली होती.
अवैध गर्भपात करणारे एक रॅकेट सक्रिय, पोलीस चौकशी सुरू
येथील आदिवासी भागात आणि विशेषतः मध्यप्रदेशच्या सीमेलगत अनेक बोगस डॉक्टर कार्यरत असल्याने यापूर्वीही या परिसरात अनेकदा अवैध गर्भपाताच्या घटना उघडकीस आल्या होत्या. मात्र आता अनेक गर्भपात केल्यानंतर अर्भकांचे अवशेष नदीपात्रात आढळून आल्याने या भागात अवैध गर्भपात करणारे एक रॅकेट सक्रिय असल्याच समोर येत आहे. या प्रकरणी तामगाव पोलीस चौकशी करत आहे. यावर जिल्ह्यातील आरोग्य अधिकारी अद्याप यावर बोलण्यास तयार नाहीत.
जळगाव जामोदमध्ये नदीपात्रात मृत अवस्थेत पुरुष जातीचे अर्भक
संग्रामपूर तालुक्यातील काटेल कोलदमध्ये असलेल्या वान नदीपात्रात मृत अवस्थेत पुरुष जातीचे अर्भक आढळल्याने सर्व परिसरात खळबळ उडाली होती. हे अर्भक पाच महिन्याचे असून 22 नोव्हेबर रोजी दुपारी घटना उघडकीस आली होती. याबाबत कोलदचे पोलीस पाटील संजय देवूळकर यांनी तामगाव पोलीस स्टेशनला याबाबत फिर्याद दिली होती. पोलिसांनी कलम 318 अन्वये गुन्हा दाखल केला होता. अर्भक आढळल्याची वार्ता पसरताच लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. अर्भकाला पाहून लोक हळहळ व्यक्त केले होते
नाशिकमध्येही घडली होती घटना
देशभरात स्त्रीभ्रूण हत्याच्या घटनांनी खळबळ माजली असतानाच नाशिक शहरातील नासर्डी भागातही नवजात अर्भक नदीपात्रात फेकून दिल्याचे आढळल्याने संताप व्यक्त होत होती. ही घटना उघडकीस येताच हे अमानुष कृत्य करणा-यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी संतप्त रहिवाशांनी केली होती.
पुण्यात मुंढवा पुलाच्या नदीच्या पात्राजवळ नवजात अर्भकाचा मृतदेह
नोव्हेंबर महिन्यात पुण्यातील खराडी येथील जुन्या मुंढवा पुलाच्या परिसरातील नदीच्या पात्राजवळ एका नवजात अर्भकाचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.नदीच्या बंधाऱ्यात या अर्भकाचा मृतदेह असल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले होते. नागरिकांनी याबाबत तत्काळ मुंढवा पोलिस व अग्निशामक दलास माहिती कळविली होती. त्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी नदीपात्रातून मृतदेह बाहेर काढला होती. अनैतिक संबंधातून जन्मलेल्या बाळाला त्याच्या मातापित्यांनी नदीत टाकल्याचा पोलिसांना अंदाज व्यक्त केला होता.
इतर महत्वाच्या बातम्या