एक्स्प्लोर

Madhya Pradesh Rain : मध्य प्रदेशात पावसाचा हाहाकार , उज्जैन आणि ओंकारेश्वरला महाराष्ट्रातील पर्यटक अडकल्याची भीती

Madhya Pradesh Rain : नर्मदा नदीला महापूर आल्याने महाराष्ट्रात येणार इंदूर बुऱ्हाणपूर ते सोलापूर हा महामार्ग मागील 24 तासांपासून बंद ठेवण्यात आला आहे.

बुलढाणा : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) दक्षिण भागात गेल्या  48 तासांपासून मुसळधार पावसाने (Rain) हजेरी लावली आहे. त्यामुळे नर्मदा आणि  शिप्रा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. धोक्याच्या पातळीवरुन या दोन्ही नद्या सध्या वाहत आहेत. ओंकारेश्वर जलाशयातील पाण्याचा मोठा विसर्ग ही नर्मदा नदीमध्ये सोडण्यात आला आहे. त्यामुळे नर्मदा नदीला महापूर आल्याचं पाहायला मिळतयं. तसेच या महापुरामुळे  उज्जैन - इंदूर - बुऱ्हाणपूर - सोलापूर हा महामार्ग मागील 24 तासांपासून बंद ठेवण्यात आलाय.  मोरटक्का येथील नर्मदा नदीच्या पुलापासून केवळ दोन फुटांच्या अंतरावर पाणी आलंय. त्यामुळे हा महामार्ग मागील 24 तासांपासून बंद आहे. 

दरम्यान हा महामार्ग बंद असल्यामुळे पर्यटनासाठी गेलेले अनेक लोक मध्य प्रदेशात अडकल्याचं शक्यता वर्तवण्यात आली. तर पुढील 24 तास पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार असल्याची माहिती खांडव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. सध्या ओंकारेश्वर आणि मोरटक्का परिसरात बचाव कार्याची मोहीम देखील राबवण्यात येतेय. मध्यप्रदेशमध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे 20 हून अधिक जिल्ह्यांमध्ये महापुराची स्थिती उद्भवली आहे. नर्मदा आणि शिप्रा नद्यांनी रौद्र रुप धारण केलंय. नर्मदा नदीवरील धरणांचे सात दरवाजे उघडण्यात आलेत.

नदीकाठच्या गावांना फटका

या पुरामुळे नदीकाठच्या गावांना देखील मोठा फटका बसल्याचं चित्र आहे. तसेच इंदूर,  नर्मदापुरम, रतलाम, उज्जैनमध्ये मुसळधार पावसामुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलीये. ओंकारेश्वरमध्ये धरणाचे 22 दरवाजे उघडण्यात आलेत. त्यामुळे जबलपूर, नरसिंहपुर, रायसेन, नर्मदापुरम,  खंडवा जिल्ह्यांतील गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. मध्य प्रदेशातील आठ जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. तर सध्या  उज्जैनमधील अनेक मंदिरं  आणि घाट पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळतय.  

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पुरामुळे प्रभावित झालेल्या जिल्ह्यांमध्ये तात्काळ मदत पोहचवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच यामध्ये आतापर्यंत 8718 नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे.  तर एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे अनेक जवान सध्या पुरात अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाटी पोहचले आहेत. 

हेही वाचा : 

Weather Update : राजस्थानसह मध्य प्रदेशात जोरदार पाऊस, काही भागात जनजीवन विस्कळीत; आज 'या' राज्यात पावसाचा इशारा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

देवेंद्र फडणवीस यांचे पंतप्रधान मोदींच्या साक्षीने शेतकऱ्यांना वचन; हमीभावापेक्षा अधिक दराने होणार कापूस, सोयाबीनची खरेदी
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पंतप्रधान मोदींच्या साक्षीने शेतकऱ्यांना वचन; हमीभावापेक्षा अधिक दराने होणार कापूस, सोयाबीनची खरेदी
VBA Candidate श्याम ते शमिभा... उच्चविद्याविभूषित शमिभा पाटील, वंचितच्या तृतीयपंथीय उमेदवार कोण?
श्याम ते शमिभा... उच्चविद्याविभूषित शमिभा पाटील, वंचितच्या तृतीयपंथीय उमेदवार कोण?
विधानसभेची खडाजंगी : हदगावमध्ये माधवराव पाटलांशी पुन्हा कोहळीकर भिडणार, तर ठाकरेंकडून सुभाष वानखेडेंचींही तयारी 
विधानसभेची खडाजंगी : हदगावमध्ये माधवराव पाटलांशी पुन्हा कोहळीकर भिडणार, तर ठाकरेंकडून सुभाष वानखेडेंचींही तयारी 
China Beautiful Governor Zhong Yang : स्टाफमधील 58 जणांसोबत शारीरिक संबंध अन् 71 कोटींची लाच घेतली; 'ब्यूटीफूल गव्हर्नर'ला 13 वर्षांची जेलवारी!
स्टाफमधील 58 जणांसोबत शारीरिक संबंध अन् 71 कोटींची लाच घेतली; 'ब्यूटीफूल गव्हर्नर'ला 13 वर्षांची जेलवारी!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sunil Tatkare On Mahayuti : महायुतीत असलो तरी फुले-शाहू- आंबेडकरांचा मार्ग सोडला नाही-तटकरेDhangar Reservation Protest : मालेगावमध्ये धनगर बांधवांचं आंदोलन, पुणे-इंदौर महामार्ग रोखलाABP Majha Marathi News Headlines 02 PM TOP Headlines 02 PM 21 September 2024Ajit Pawar On Ladki Bahin Yojna : पैसे लाटले तर तुरुंगात रवानगी,  योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांना दादांची तंबी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देवेंद्र फडणवीस यांचे पंतप्रधान मोदींच्या साक्षीने शेतकऱ्यांना वचन; हमीभावापेक्षा अधिक दराने होणार कापूस, सोयाबीनची खरेदी
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पंतप्रधान मोदींच्या साक्षीने शेतकऱ्यांना वचन; हमीभावापेक्षा अधिक दराने होणार कापूस, सोयाबीनची खरेदी
VBA Candidate श्याम ते शमिभा... उच्चविद्याविभूषित शमिभा पाटील, वंचितच्या तृतीयपंथीय उमेदवार कोण?
श्याम ते शमिभा... उच्चविद्याविभूषित शमिभा पाटील, वंचितच्या तृतीयपंथीय उमेदवार कोण?
विधानसभेची खडाजंगी : हदगावमध्ये माधवराव पाटलांशी पुन्हा कोहळीकर भिडणार, तर ठाकरेंकडून सुभाष वानखेडेंचींही तयारी 
विधानसभेची खडाजंगी : हदगावमध्ये माधवराव पाटलांशी पुन्हा कोहळीकर भिडणार, तर ठाकरेंकडून सुभाष वानखेडेंचींही तयारी 
China Beautiful Governor Zhong Yang : स्टाफमधील 58 जणांसोबत शारीरिक संबंध अन् 71 कोटींची लाच घेतली; 'ब्यूटीफूल गव्हर्नर'ला 13 वर्षांची जेलवारी!
स्टाफमधील 58 जणांसोबत शारीरिक संबंध अन् 71 कोटींची लाच घेतली; 'ब्यूटीफूल गव्हर्नर'ला 13 वर्षांची जेलवारी!
मनोज जरांगेंची ईडीमार्फत चौकशी करा, ओबीसी आंदोलकांची केंद्र आणि राज्य सरकारकडे मागणी
मनोज जरांगेंची ईडीमार्फत चौकशी करा, ओबीसी आंदोलकांची केंद्र आणि राज्य सरकारकडे मागणी
Lebanon Pager Serial Blasts : लेबनॉनमधील 'दे दणादण' पेजर स्फोटात भारतीय वंशाच्या उद्योजकाचे नाव समोर! 7 भाषा बोलणारी सीईओ सुद्धा रडारवर
लेबनॉनमधील 'दे दणादण' पेजर स्फोटात भारतीय वंशाच्या उद्योजकाचे नाव समोर! 7 भाषा बोलणारी सीईओ सुद्धा रडारवर
Nitin Gadkari: पुणे-मुंबई एक्सप्रेस वे करताना माझी चूक; गडकरींनी सांगितला अधिकाऱ्यांचा किस्सा
पुणे-मुंबई एक्सप्रेस वे करताना माझी चूक; गडकरींनी सांगितला अधिकाऱ्यांचा किस्सा
Pune Crime News: मध्यरात्री दरवाजा ठोठावला...; 3 मुलीसमोरच व्यक्तीची निर्घृण खून, तपासात पत्नी निघाली दोषी, अनैतिक संबंधांना अडथळा ठरलेल्या पतीला धाडलं यमसदनी
मध्यरात्री दरवाजा ठोठावला...; 3 मुलीसमोरच व्यक्तीची निर्घृण खून, तपासात पत्नी निघाली दोषी, अनैतिक संबंधांना अडथळा ठरलेल्या पतीला धाडलं यमसदनी
Embed widget