एक्स्प्लोर

Buldana Accident News : बुलढाण्यात खासगी बसचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, एकाचा मृत्यू; तर 20 जण जखमी 

Buldana Accident News : राही ट्रॅव्हल्सच्या खासगी लक्झरी बसचा भीषण अपघात (बस क्र. MH 20 EL4999) झाल्याची घटना घडली. हा अपघात समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg Accident)  झाला आहे.

Buldana Accident News : नागपूरहून औरंगाबादच्या दिशेने जाणाऱ्या राही ट्रॅव्हल्सच्या खासगी लक्झरी बसचा भीषण अपघात (बस क्र. MH 20 EL4999) झाल्याची घटना घडली. हा अपघात समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg Accident)  झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात 20 प्रवासी जखमी झाले आहे. हा अपघात बुलढाणा (Buldana) जिल्ह्यातील देऊळगाव राजा नजीकच्या असोला फाटा गावाजवळ झाला आहे. अपघाताग्रस्त बसमधून प्रवासी बाहेर निघून महामार्गाच्या बाजूला जात असताना मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने दोन प्रवाशांना चिरडले. यामध्ये एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला असून, एक प्रवासी गंभीर जखमी आहे.

अपघातानंतर बस समृद्धी महामार्गाच्या मध्यभागी पलटली होती. या अपघाताग्रस्त बसमधून प्रवासी बाहेर पडत होते. यावेळी मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने दोन प्रवाशांना चिरडले. यामध्ये एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. म्हणजे एकूण 21 प्रवासी जखणी झाल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, जखमींना देऊळगाव राजा आणि जालना येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अपघातग्रस्त बस महामार्गाच्या बाजूला करण्याचं काम सुरू आहे. हा अपघात रात्री साडेचार वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघातातील सहा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या सहा प्रवाशांना जालन्यातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरू झाली आहे. या ठिकाणी सातत्यानं अपघात होत आहेत. राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असणाऱ्या समृद्धी महामार्गाचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं होतं. या महामार्गाचं लोकार्पण झाल्यापासूनच या महामार्गावर अनेक अपघात होत आहेत. त्यामुळं हा समृद्धी महामार्ग हा अपघातांचा महामार्ग झाला आहे का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. नागपूर ते शिर्डी अशा 520 किलोमीटर टप्प्याचं11 डिसेंबर 2022 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं होतं. त्यानंतर हा महामार्ग सुरू करण्यात आला आहे. या मार्गावरील वेगमर्यादा ही 120 किमी प्रतितास इतकी आहे. यामुळं एकही चूक मोठी ठरू शकते. रस्ता चांगला आहे, पण अति वेग मारक ठरत असल्याचे दिसत आहे. तर अनेक वेळा रात्रीचा प्रवासही घातक ठरत आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

Nashik Sinnar Accident : सिन्नर अपघात: ना सूचना, ना बोर्ड, ना ब्लिंकर लाईट, डायव्हर्जनमुळे होत्याचं नव्हतं झालं! 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Accident : भरधाव बोलेरो पिकअपची आयशरला भीषण धडक, प्रवाशी अक्षरश: बाहेर फेकले गेले; 9 जणांचा मृत्यू, 11 जण गंभीर जखमी
भरधाव बोलेरो पिकअपची आयशरला भीषण धडक, प्रवाशी अक्षरश: बाहेर फेकले गेले; 9 जणांचा मृत्यू, 11 जण गंभीर जखमी
Sunita Williams : सुनीता विल्यम्स यांचा 15 दिवसात दुसऱ्यांदा स्पेसवॉक, वयाच्या 59व्या वर्षी अंतराळात केला भीम पराक्रम; संशोधनासाठी घेतले सूक्ष्मजीवांचे नमुने
Video : सुनीता विल्यम्स यांचा 15 दिवसात दुसऱ्यांदा स्पेसवॉक, वयाच्या 59व्या वर्षी अंतराळात केला भीम पराक्रम; संशोधनासाठी घेतले सूक्ष्मजीवांचे नमुने
Nitesh Rane : परीक्षा केंद्रावर बुरखा नको, नितेश राणेंना मुस्लीम विद्यार्थिनींकडून ओपन चॅलेंज; शिक्षण मंत्र्यांकडे मोठी मागणी
परीक्षा केंद्रावर बुरखा नको, नितेश राणेंना मुस्लीम विद्यार्थिनींकडून ओपन चॅलेंज; शिक्षण मंत्र्यांकडे मोठी मागणी
Guillain-Barré Syndrome outbreak in Pune : पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा जीबीएसने पहिला रुग्ण दगावला, 36 वर्षीय तरुणानं घेतला अखेरचा श्वास
पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा जीबीएसने पहिला रुग्ण दगावला, 36 वर्षीय तरुणानं घेतला अखेरचा श्वास
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ahilyanagar Leopard Rescue : 80 फूट खोल विहिरीत पडलेल्या बिबट्याला 'असं' केलं रेस्क्यू!ABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines 9AM 31 January 2024 सकाळी ९ च्या हेडलाईन्सNamdevshastri Maharaj PC On  Dhananjay Munde : नामदेव महाराज शास्त्रींकडून धनंजय मुंडे यांची पाठराखणABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8AM 31 January 2024 सकाळी ८ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident : भरधाव बोलेरो पिकअपची आयशरला भीषण धडक, प्रवाशी अक्षरश: बाहेर फेकले गेले; 9 जणांचा मृत्यू, 11 जण गंभीर जखमी
भरधाव बोलेरो पिकअपची आयशरला भीषण धडक, प्रवाशी अक्षरश: बाहेर फेकले गेले; 9 जणांचा मृत्यू, 11 जण गंभीर जखमी
Sunita Williams : सुनीता विल्यम्स यांचा 15 दिवसात दुसऱ्यांदा स्पेसवॉक, वयाच्या 59व्या वर्षी अंतराळात केला भीम पराक्रम; संशोधनासाठी घेतले सूक्ष्मजीवांचे नमुने
Video : सुनीता विल्यम्स यांचा 15 दिवसात दुसऱ्यांदा स्पेसवॉक, वयाच्या 59व्या वर्षी अंतराळात केला भीम पराक्रम; संशोधनासाठी घेतले सूक्ष्मजीवांचे नमुने
Nitesh Rane : परीक्षा केंद्रावर बुरखा नको, नितेश राणेंना मुस्लीम विद्यार्थिनींकडून ओपन चॅलेंज; शिक्षण मंत्र्यांकडे मोठी मागणी
परीक्षा केंद्रावर बुरखा नको, नितेश राणेंना मुस्लीम विद्यार्थिनींकडून ओपन चॅलेंज; शिक्षण मंत्र्यांकडे मोठी मागणी
Guillain-Barré Syndrome outbreak in Pune : पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा जीबीएसने पहिला रुग्ण दगावला, 36 वर्षीय तरुणानं घेतला अखेरचा श्वास
पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा जीबीएसने पहिला रुग्ण दगावला, 36 वर्षीय तरुणानं घेतला अखेरचा श्वास
Donald Trump on India and China : डोनाल्ड ट्रम्प यांची आता एकाचवेळी भारत आणि चीनला थेट धमकी! म्हणाले, 'तसे करण्याचा प्रयत्न जरी केला, तरी..'
डोनाल्ड ट्रम्प यांची आता एकाचवेळी भारत आणि चीनला थेट धमकी! म्हणाले, 'तसे करण्याचा प्रयत्न जरी केला, तरी..'
Dhananjay Munde Bhagwangad: नामदेवशास्त्रींनी एका झटक्यात वंजारी समाज धनंजय मुंडेच्या पाठिशी उभा केला, भाजपसोबत अजितदादांना इशारा?
नामदेवशास्त्रींनी एका झटक्यात वंजारी समाज धनंजय मुंडेच्या पाठिशी उभा केला, भाजपसोबत अजितदादांना इशारा?
Economic Survey 2025 : आर्थिक पाहणी अहवाल कोण तयार करतं? अर्थमंत्री निर्मला सीतारामन अहवाल कधी सादर करणार?
आर्थिक पाहणी अहवाल कोण तयार करतं? अर्थमंत्री निर्मला सीतारामन अहवाल कधी सादर करणार?
भगवानगडावर आलेल्या धनंजय मुंडेंच्या हाताला सलाईन, नामदेवशास्त्रींचा मोठा दावा; म्हणाले, किती सहन...
भगवानगडावर आलेल्या धनंजय मुंडेंच्या हाताला सलाईन, नामदेवशास्त्रींचा मोठा दावा; म्हणाले, किती सहन...
Embed widget