एक्स्प्लोर

इंस्टाग्रामवरील आक्षेपार्ह कमेंटमुळे मलकापूरमध्ये तणाव; पोलिसांकडून गुन्हा दाखल, परिसरात शांतता

Buldhana News : पोलिसांनी तात्काळ बंदोबस्त वाढवत परिस्थिती नियंत्रणात आणली असून, परिसरात तणावपूर्ण शांतता पाहायला मिळत आहे.

Buldhana News : मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर (Social Media) आक्षेपार्ह पोस्ट टाकण्याच्या घटना सतत समोर येत असून, असाच काही प्रकार बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील मलकापूरमध्ये पाहायला मिळाला आहे. इंस्टाग्रामवरील (Instagram) पोस्टवर एका तरुणाने आक्षेपार्ह कमेंट केल्याने मलकापूर येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, एका मोठा जमाव थेट रस्त्यावर उतरून घोषणाबाजी करतांना पाहायला मिळाला. मात्र, पोलिसांनी तात्काळ बंदोबस्त वाढवत परिस्थिती नियंत्रणात आणली असून, परिसरात तणावपूर्ण शांतता पाहायला मिळत आहे. तर, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नका असे अवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहेत. 

अधिक माहितीनुसार, मलकापूर परिसरातील एका तरुणाने इंस्टाग्रामवरील पोस्टवर आक्षेपार्ह कमेंट केली होती. काही काळात याची माहिती सोशल मीडियावर पसरली आणि मलकापूर येथे हजारो तरुणांचा समूह रस्त्यावर उतरला. जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. काही वेळात हा जमाव पोलिस स्टेशन समोर पोहचला. तसेच कारवाईची मागणी करत यावेळी प्रचंड घोषणाबाजी सुरु झाली. दरम्यान, याची माहिती तात्काळ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना देऊन बंदोबस्त वाढवण्यात आला. तसेच, शहरात देखील मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. तसेच, स्वतः अप्पर पोलिस अधीक्षक मलकापूर येथे दाखल झाले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. तसेच आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्याविरोधात तत्काळ गुन्हा देखील दाखल करण्यात आला. 

तब्बल 300 ते 350 जणांवर गुन्हे दाखल...

इंस्टाग्रामवरील पोस्टवर एका तरुणाने आक्षेपार्ह कमेंट केल्यावर सोमवारी रात्री अचानक मोठा जमाव थेट मलकापूर पोलिस स्टेशन अवरात पोहचला. यावेळी जमावाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे, मलकापूर पोलिस स्टेशन अवरात अवैधरीत्या घुसून धार्मिक घोषणाबाजी व शहरात दहशत निर्माण करणाऱ्या 300 ते 350 जणांवर पोलिसांनी गुन्हे दखल केले आहेत. मात्र, यातील अद्याप किती जणांना ताब्यात घेतल याची माहिती मिळू शकली नाही. दरम्यान मलकापूर शहरात तणावपूर्ण शांतता असून, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेऊन असल्याची माहिती पोलिस अधीक्षक सुनील कडासणे यांच्याकडून देण्यात आली आहे. 

अफवांवर विश्वास ठेवू नका...

इंस्टाग्रामवरील पोस्टवर एका तरुणाने आक्षेपार्ह कमेंट केल्याने मलकापूरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. तसेच नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. सोबतच कोणीही अफवा पसरवत असल्यास याची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात यावी आणि अफवा पसरवणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा देखील पोलिसांनी दिला आहे. सध्या मलकापूरमध्ये शांतता असून, पोलीस सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याची माहिती देखील पोलिसांकडून देण्यात आली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

Buldhana Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाचा आणखी एक उमेदवार जाहीर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget