BJP: विधानसभेच्या तोंडावर बुलढाण्यात भाजपसह मनसेला मोठं खिंडार! माजी आमदारासह बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश
Buldhana Politics: भाजपा नेते व माजी आमदार धृपतराव सावळे व मनसेचे पश्चिम विदर्भ संपर्क प्रमुख विठ्ठल लोखंडकर हे काँग्रेसमध्ये प्रवेश केला असल्याने निवडणुकीसाठी मोठी तयारी करत असतानाच भाजपला मोठं खिंडार पडलं आहे.
बुलढाणा: निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षांनी मोठी तयारी सुरू केली आहे. लवकरच आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. अशातच राजकीय पक्षांत जागावाटप, उमेदवार, मतदारसंघ दौरे, सभा, पक्षांतर या घडामोडींना वेग आला आहे. निवडणुकीच्या तोंडावर बुलढाण्यात भाजप व मनसेला धक्का मोठा धक्का बसला आहे. भाजपा नेते व माजी आमदार धृपतराव सावळे व मनसेचे पश्चिम विदर्भ संपर्क प्रमुख विठ्ठल लोखंडकर हे काँग्रेसमध्ये प्रवेश केला असल्याने निवडणुकीसाठी मोठी तयारी करत असतानाच भाजपला मोठं खिंडार पडलं आहे.
ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बुलढाण्यात मोठ्या राजकीय उलथापालथ बघायला मिळत आहे. बुलढाण्याचे माजी आमदार व भाजपचे जेष्ठ नेते धृपतराव सावळे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष व पश्चिम विदर्भ संपर्क प्रमुख विठ्ठलराव लोखंडकार यांनी काल सायंकाळी मुंबई येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला बुलढाणा जिल्ह्यात बळ मिळाल्याचे चित्र आहे.
आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या टिळक भवन कार्यालयात प्रभारी श्री. रमेश चेन्नीथला जी यांच्या प्रमुख उपस्थितीत बुलढाण्याचे भाजपाचे माजी अध्यक्ष, मा. आ. श्री धृपदरावभाऊ सावळे, मुखेड-देगलूर विधानसभा मतदारसंघातील मा. आ. श्री. अविनाश घाटे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य राष्ट्रवादी… pic.twitter.com/CGGeVYuiTx
— Nana Patole (@NANA_PATOLE) October 14, 2024
बुलढाण्याचे माजी आमदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते धृपतराव सावळे हे काँग्रेस पक्षात जाणार असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होत्या. धृपतराव सावळे यांच्या घरवापसीमुळे पुन्हा एकदा काँग्रेसला बळ मिळालं आहे.सावळे यांचा सरपंच ते आमदार असा प्रवास आहे. काँग्रेसमधून 21 ऑगस्ट 2015 मध्ये ते भाजपमध्ये गेले होते. काँग्रेसमध्ये घरवापसी करणारे धृपतराव सावळे यांना अनेक कार्यक्रमात डावललं जात असल्याने ते नाराज होते. दरम्यान धृपतराव सावळे काँग्रेसमध्ये जाण्याने बुलढाण्यात भाजपला मोठं खिंडार पडलं आहे. धृपतराव सावळे हे आधी काँग्रेस पक्षात होते.
धृपतराव सावळे यांनी 21 ऑगस्ट 2015 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. धृपतराव सावळे यांचा बुलढाण्यातील जनसंपर्क दांडगा आहे. सरपंच ते आमदार असा त्यांचा राजकीय प्रवास खूप मोठा आहे. सरपंच झाल्यानंतर ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिले होते. जिल्हाध्यक्षांची त्यांची कारकीर्द ही महत्त्वपूर्ण ठरली होती. 2014च्या मागील विधानसभा निवडणूक त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढले होते.
धृपतराव सावळे यांनी बुलढाणा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तसेच जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्षपद देखील काही काळ भूषवले आहे. 2004मध्ये काँग्रेसच्या उमेदवारीवर बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले होते. यादरम्यान ते एस.टी.महामंडळाचे उपाध्यक्ष देखील राहिले. 2009मध्ये त्यांना थांबवून मुखत्यारसिंग राजपूत या ज्येष्ठ नेत्याला काँग्रेसने उमेदवारी दिली होती.