(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बुलढाण्यात ग्रामपंचायतीचे निकाल संमिश्र; आमदार संजय कुटेंना मोठा धक्का, जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत काँग्रेसकडे
बुलढाण्यात जिल्ह्यात भाजपच्या डॉ.संजय कुटेंना (Sanjay Kute) धक्का बसला आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठी असलेली व भाजपकडे असलेली जामोद ग्रामपंचायत आता काँग्रेसच्या ताब्यात गेली आहे.
बुलढाणा: जिल्ह्यातील (Buldhana News) सर्वच्या सर्व 48 ग्रामपंचायतीचे निकाल (Gram Panchayat Election) हाती आले असून जिल्ह्यात हे निकाल समिश्र स्वरूपाचे आहेत. बुलढाणा जिल्ह्यात महायुतीला 23 ग्रामपंचायती, महाविकास आघाडीला 14 ग्रामपंचायत तर स्थानिक आघाड्यांना 11 ग्रामपंचायतीवर विजय मिळवता आला आहे. बुलढाण्यात जिल्ह्यात भाजपच्या डॉ.संजय कुटेंना (Sanjay Kute) धक्का बसला आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठी असलेली व भाजपकडे असलेली जामोद ग्रामपंचायत आता काँग्रेसच्या ताब्यात गेली आहे.
बुलढाणा जिल्ह्यात सर्वात चर्चेची ग्रामपंचायतची निवडणूक होती ती जळगाव जामोद तालुक्यातील जामोद ग्रामपंचायतची. ही ग्रामपंचायत याआधी भाजपच्या ताब्यात होती. मात्र या ठिकाणी उलटफेर झाला व 17 पैकी 15 जागा जिंकत काँग्रेसने या ग्रामपंचायतीवर ताबा मिळवला आहे. ही ग्रामपंचायतची निवडणूक डॉ. संजय कुटे यांनी मोठ्या प्रतिष्ठेची केली होती. जळगाव जामोद तालुक्यात एकूण तीन ग्रामपंचायती च्या निवडणुका होत्या. त्यापैकी दोन ग्रामपंचायत या काँग्रेसने जिंकल्या आहेत तर एक ग्रामपंचायती स्थानिक आघाडीने जिंकली आहे. बुलढाणा जिल्ह्यात शिंदे गटाचाही दबदबा राहिला आहे. बुलढाणा व मेहकर तालुक्यात शिंदे गटाने अनेक ग्रामपंचायतीवर आपला झेंडा रोवला आहे तर जिल्ह्यात काँग्रेसनेही मोठी आघाडी घेतली आहे.
बुलढाणा अंतिम निकाल
- महायुती - 23
- मविआ - 14
- स्थानिक आघाडी - 11
बुलढाणा जिल्ह्यात भाजपच्या डॉ.संजय कुटेंना धक्का
बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठी असलेली व भाजपकडे असलेली जामोद ग्रामपंचायत आता काँग्रेसच्या ताब्यात गेली आहे. जळगाव जामोद तालुक्यात जामोद ग्रामपंचायत ही भाजपासाठी वर्चस्वाची लढाई होती.मात्र भाजप कडून काढून घेत ही ग्रामपंचायत काँग्रेसने जिंकली आहे. 17 पैकी 14 जागांवर विजय मिळवत काँग्रेसच्या गंगुबाई दामदर विजयी झाल्या आहेत.
भाजप ठरला नंबर वन
राज्यातील तब्बल 2 हजार 359 ग्रामपंचायतीचा (Maharashtra Gram Panchayat Election Result) निकाल समोर येत आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सध्या निकालाचे कल पाहता सर्वात मोठा पक्ष भाजपच ठरला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप 1 नंबरचा पक्ष ठरलाय. तर 2 नंबरला राष्ट्रवादी अजित पवार गट आहे. तीन नंबरला शिंदे उद्धव ठाकरे गट आहे आहे. चौथ्या क्रमांकावर काँग्रेस आहे. तर पाचव्या क्रमांकावर राष्ट्रवादी शरद पवार गट, तर पाचव्या क्रमांकावर ठाकरे गट आहे. प्रत्येक पक्षानं आपआपल्या विजयाचे वेगवेगळे आकडे सांगून दावे केलेत.
हे ही वाचा :