एक्स्प्लोर

Akola Gram Panchayat Result: अकोल्यात संमिश्र कौल, वंचितला अपेक्षित यश नाही; भाजप, काँग्रेस आघाडीवर, इतरांच काय?

काँग्रेस, भाजप आणि स्थानिक आघाड्यांसाठी गटासाठी ही निवडणूक लाभदायक ठरली आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार आणि अजित पवार गटाला चमकदार कामगिरी करता आलेली नाही.  

अकोला :  आगामी विधानसभा निवडणुकीआधी (Akola GramPanchayat Election Result 2023)  सत्‍वपरीक्षा मानल्‍या गेलेल्‍या ग्रामपंचायतींच्‍या निवडणुकीत अकोला जिल्‍ह्यात संमिश्र कौल दिसून आला आहे. काँग्रेस, भाजप आणि स्थानिक आघाड्यांसाठी गटासाठी ही निवडणूक लाभदायक ठरली आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार आणि अजित पवार गटाला चमकदार कामगिरी करता आलेली नाही. तर वंचितला अपेक्षित यश मिळाले नाही. 

अकोला जिल्ह्यातील 14 पैकी प्रत्येकी तीन ग्रामपंचायतींवर भाजप, काँग्रेस आणि स्थानिक आघाड्यांचा झेंडा फडकवला आहे.  बार्शीटाकळी तालुक्यातील दोन ग्रामपंचायती शरद पवार गटाच्या ताब्यात आहेत तर पातूर तालूक्यातील कोसगाव ग्रामपंचायतीवर अजित पवार गटाची सत्ता आली आहे.  भाजपचे नेते आणि माजी गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या गावात वंचितने बाजी मारली आहे. रणजीत पाटलांचे काका अनिल पाटील वंचितच्या पाठिंब्याने सरपंचपदी निवडून आले आहेत.  घुंगशीत पाटील घराण्यात फूट पडली आहे.  रणजीत पाटलांचे चुलतभाऊ असलेले राहुल पाटील सरपंच पदाच्या निवडणुकीत तिसऱ्या स्थानी आहेत. 

निवडणूक झालेल्या एकूण ग्रामपंचायत : 14

बिनविरोध : 01

अकोला तालुका : एकूण ग्रामपंचायत : 04 (Akola Talula GramPanchayat Election)

1) कापशी : वेणूताई उमाळे : भाजप
2) काटीपाटी : संगिता कासमपुरे : स्थानिक आघाडी
3) एकलारा : राजेश बेले : भाजप
4) मारोडी : पुजा वाघमारे : स्थानिक आघाडी

बार्शीटाकळी तालुका : एकूण ग्रामपंचायत : 04 (Barshi Takali GramPanchayat Election)

1) खोपडी : काँग्रेस 
2) दोनद खुर्द : सागर कावरे, राष्ट्रवादी शरद पवार गट
3) खांबोरा : राष्ट्रवादी शरद पवार गट
4) जांभरून : काँग्रेस

मूर्तिजापूर तालुका : 02 (Murtijapur Gram Panchayat Result)

1) घुंगशी : अनिल पाटील पवित्रकार : वंचित
2) गाजीपूर टाकळी : मिना सचिन दिवनाले : वंचित

पातूर तालुका : एकूण ग्रामपंचायत : 01 (Patur Taluka Gram Panchayat Result) 

1) कोसगाव : रत्नमाला करवते : राष्ट्रवादी अजित पवार गट

तेल्हारा तालुका : एकूण ग्रामपंचायत : 03 (Telhara Taluka Gram Panchayat Result)

1) बारूखेडा : अविरोध : स्थानिक आघाडी
2) पिंपरखेड : भाजप
3) झरीबाजार : काँग्रेस

अकोला जिल्हा ग्रामपंचायत निवडणूक अंतिम निकाल

  • भाजप : 03
  • वंचित : 02
  • काँग्रेस : 03
  • स्थानिक आघाड्या : 03
  • राष्ट्रवादी शरद : 02
  • राष्ट्रवादी अजित : 01

अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर तालुक्यातल्या घुंगशी ग्रामपंचायतीवर वंचितचा झेंडा

घुंगशी माजी गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांचे गाव आहे.  सरपंचपदी माजी गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांचे काका अनिल पाटील पवित्रकार 54 मतांनी विजयी झाले आहेत. काँग्रेसचे उमेदवार संजय देशमुख यांचा  पराभव केला. डॉ. रणजीत पाटील यांचे चुलतभाऊ राहूल पाटील सरपंचपदाच्या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. घुंगशी ग्रामपंचायतीत पाटील घराण्यात दोन पॅनल पडत  फूट पडली होती. डॉ. रणजीत पाटलांचा आशीर्वाद चुलतभाऊ राहुल पाटील यांच्या पाठीशी आहे. डॉ. रणजीत पाटलांच्या काकांनी  पुतण्याला धोबीपछाड केला आहे.  सदस्यांपैकी सर्वच्या सर्व जागा जिंकत अनिल पाटील यांची गावावर सत्ता आली आहे.  काँग्रेसच्या ताब्यातील ग्रामपंचायत  हिसकावून घेतली आहे. 

हे ही वाचा:

Gram Panchayat Election Result: गावकऱ्यांचा प्रस्थापित राजकीय पुढाऱ्यांना तगडा झटका! अनेक नेत्यांना गाव सांभाळताना घाम फुटला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget