एक्स्प्लोर

Buldhana Crime News: क्लबमध्ये जुगारात घबाड मिळालं, प्रकाशशेठ मालामाल; पण वैऱ्यांनी खामगाव बसस्टँडवर खेळ खल्लास केला

Khamgaon News: खामगाव शहरात बस स्टँड परिसरात अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी हॉटेल चालकाची हत्या. क्लबमध्ये जिंकलेल्या पैशाच्या वादातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोलीस सध्या याप्रकरणाचा तपास करत आहेत.

बुलढाणा: खामगाव आणि शेगाव परिसरात वाढलेल्या अवैधधंद्यांचा दुष्परिणाम पुन्हा एकदा खामगावकरांना अनुभवायला मिळाला आहे. सोमवारी रात्री खामगाव बस स्थानकाच्या समोर अतिशय वर्दळीच्या ठिकाणी चार जणांनी हॉटेल व्यावसायिक असलेल्या प्रकाश सोनी (Prakash Soni) यांची चाकूने भोसकून हत्या केली. प्राथमिक माहितीनुसार सोनी यांनी अलीकडेच या परिसरात एक क्लबमध्ये मोठी रक्कम जिंकली होती. त्यातूनच हा वाद उद्भवला. या वादातूनच प्रकाश सोनी यांची भररस्त्यात नागरिकांच्या समोर चौघांनी चाकूने भोसकून हत्या (Murder) केल्याचा थरार खामगाव बस स्थानकासमोर रात्री घडला.  या हत्येत शेगाव येथील चार आरोपी सामील असून त्यापैकी मुख्य आरोपी हा केंद्रीय राखीव पोलीस दलातील निवृत्त शिपाई आहे .  ही हत्या आर्थिक देवाणघेवाणीतून झाली असल्याचं पोलिसांचं म्हणणे आहे. यात पोलिस अधिक माहिती देण्यास तयार नाहीत. मात्र याचा तपास खामगाव शहर पोलीस करत आहेत.

या हत्येचा थरारक व्हिडिओ 'एबीपी माझा'च्या हाती लागला आहे. या व्हीडिओत प्रकाश सोनी यांच्यासोबत असलेले त्यांचे सहकारी आरडाओरड करताना दिसत आहेत. प्रकाश सोनी यांना वाचवण्यासाठी धावपळ सुरु असलेली व्हीडिओत दिसत आहे. यावेळी प्रकाश सोनी यांच्यासोबत असलेल्या तरुणांनी एका व्यक्तीला पकडून ठेवले होते. यादरम्यान प्रकाश सोनी यांना गाडीत टाकून रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी तात्काळ यातील तिघांना अटक केली असून मारेकरी एक जण अद्याप फरार आहे. मात्र खामगाव , शेगाव परिसरात सुरू असलेले क्लब व अवैध व्यवसायामुळे पुन्हा एकदा नागरिकांना हत्येचा थरार बघायला मिळाला आहे.

जळगावात टोळक्याकडून तरुणाची हत्या

काही दिवसांपूर्वी जळगाव शहरातील कालिका माता मंदिर परिसरातील भानू हॉटेलमध्ये एका टोळक्याने तरुणाची निर्घृणपणे हत्या केली होती. किशोर सोनवणे हा युवक आपल्या मित्रांसोबत हॉटेलमध्ये जेवत होता. त्यावेळी सात ते आठजण  हॉटेलमध्ये शिरले. त्यांनी किशोरला बेदम मारायला सुरुवात केली. यानंतर त्याच्यावर धारदार शस्त्रांनी वार करण्यात आले. किशोर सोनावणे बेशुद्ध पडल्यानंतरही टोळक्यातील तरुण त्याला मारत होते. या घटनेचा व्हीडिओ व्हायरल झाला होता.

आणखी वाचा

'बाबा लगीन'चं भीषण रुप! वडील लग्न लावून देत नसल्याने दोन भावांनी बापाला संपवलं, आधी बुटाने मारलं, मग चाकूने वार; छ. संभाजीनगरमधील घटना

गर्लफ्रेंडचं दुसऱ्यावर जडलं प्रेम, बॉयफ्रेंडच्या डोक्यात गेली सनक; एकामागोमाग एक 6 चाकूने 17 वेळा वार करत संपवलं

 बालरोग तज्ञ म्हणून कार्यरत , M.J. ( mass com ) नंतर गेल्या तीन वर्षापासून एबीपी माझा साठी कार्यरत.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Ravikant Tupkar :दुष्काळ सहन करण्याचा ठेका काय फक्त शेतकऱ्यांनीच घेतलाय का? एक वर्ष तुम्हीही दुष्काळ सोसा ना! मायक्रो फायनान्स अन् बँकांच्या वसुलीवरून रविकांत तुपकरांचा प्रहार
दुष्काळ सहन करण्याचा ठेका काय फक्त शेतकऱ्यांनीच घेतलाय का? एक वर्ष तुम्हीही दुष्काळ सोसा ना! मायक्रो फायनान्स अन् बँकांच्या वसुलीवरून शेतकरी नेते रविकांत तुपकरांचा प्रहार
शेगावहून दर्शन घेऊन परतताना हायवेवर भीषण अपघात; दुचाकीवरील तीन तरुण ठार, परिसरात हळहळ
शेगावहून दर्शन घेऊन परतताना हायवेवर भीषण अपघात; दुचाकीवरील तीन तरुण ठार, परिसरात हळहळ
Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर प्रवाशांच्या जीवाशी खेळ! 120 किमी वेगमर्यादा असलेल्या एक्सेस कंट्रोल महामार्गावर चक्क गुरांचा कळप
समृद्धी महामार्गावर प्रवाशांच्या जीवाशी खेळ! 120 किमी वेगमर्यादा असलेल्या एक्सेस कंट्रोल महामार्गावर चक्क गुरांचा कळप
सरकारच्या नरडीवर पाय ठेवून शेतकऱ्यांना मदत मिळवून देऊ, मागण्या मान्य न झाल्यास नागपूर अधिवेशन कसं होतं ते पाहू, रविकांत तुपकरांचा इशारा
सरकारच्या नरडीवर पाय ठेवून शेतकऱ्यांना मदत मिळवून देऊ, मागण्या मान्य न झाल्यास नागपूर अधिवेशन कसं होतं ते पाहू, रविकांत तुपकरांचा इशारा

व्हिडीओ

Shiv Sena PC : सोनिया गांधींच्या पुस्तकाचा निषेध,शिवसेनेने पुस्तकाचा 'तो' मजकूर फाडला
Shaina NC Balasaheb Thackeray Photo: ओहहह नोनोनो....; शिंदेंच्या शायना एनसींनी चुकून बाळासाहेबांचा फोटो फाडला, पेडणेकर संतापल्या
Amit Shah vs Uddhav Thackeray : 'कोरोना'तले फोन,आरोपांचा टोन Special Report
Rohit Pawar vs Devendra Fadnavis : आरोपांची बरसात,पण घरातूनच मिळेना साथ Special Report
Eknath Shinde On Uddhav Thackeray :अमित शाहांवर टीका करणारेच सर्वात मोठे थापाडे, उद्धव ठाकरेंवर टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shaina NC Balasaheb Thackeray Photo: ओहहह नोनोनो....; शिंदेंच्या शायना एनसींनी चुकून बाळासाहेबांचा फोटो फाडला, पेडणेकर संतापल्या
ओहहह नोनोनो....; शिंदेंच्या शायना एनसींनी चुकून बाळासाहेबांचा फोटो फाडला, पेडणेकर संतापल्या
Jaykumar Gore on Satara District Bank Chairman Election 2026: शंभुराज देसाईंनी धक्काबुक्कीचा वचपा काढला, अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर जयकुमार गोरेंचा चेहरा पडला, शांतपणे बाहेर चालत आले अन् म्हणाले...
शंभुराज देसाईंनी धक्काबुक्कीचा वचपा काढला, जयकुमार गोरेंचा चेहरा पडला, निवडणुकीनंतर बाहेर चालत आले अन् म्हणाले...
Uday Samant on BJP: मी पायाने बांधलेली गाठ हाताने सुटणार नाही; मंत्री उदय सामंतांचा भाजपच्या दादागिरीवरुन टोला
मी पायाने बांधलेली गाठ हाताने सुटणार नाही; मंत्री उदय सामंतांचा भाजपच्या दादागिरीवरुन टोला
Beed Crime News: पहाटेच्या सुमारस पत्नीला डोक्यात दगड घालून संपवलं; शेतात गेला, वाळलेल्या कपाशीला आग लावली अन् त्यात उडी घेतली, बीडमध्ये नेमकं काय घडलं?
पहाटेच्या सुमारस पत्नीला डोक्यात दगड घालून संपवलं; शेतात गेला, वाळलेल्या कपाशीला आग लावली अन् त्यात उडी घेतली, बीडमध्ये नेमकं काय घडलं?
Sanjay Raut and Devendra Fadnavis : पुढचा बॉम्ब पडल्यावर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतील, मुंबईतील एसआरए घोटाळ्यावरुन संजय राऊतांचा खळबळजनक दावा, नेमकं काय म्हणाले?
पुढचा बॉम्ब पडल्यावर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतील, मुंबईतील एसआरए घोटाळ्यावरुन संजय राऊतांचा खळबळजनक दावा, नेमकं काय म्हणाले?
Lateef Bhat Indian Army : कुलगामच्या मास्टरमाइंडला कंठस्नान, लश्कर कमांडर लतीफ भट्ट चकमकीत ठार; कुलगाममध्ये भारतीय सैन्याची मोठी कारवाई
कुलगामच्या मास्टरमाइंडला कंठस्नान, लश्कर कमांडर लतीफ भट्ट चकमकीत ठार; कुलगाममध्ये भारतीय सैन्याची मोठी कारवाई
Thane Crime: वेळ 4 वाजून 46 मिनिटे; अचानक एकापाठोपाठ एक 20 अश्लील व्हिडीओ ‘स्टेटस’वर अपलोड; ठाण्याच्या पोलीस आयुक्तांचंच व्हॉट्सॲप ‘हॅक’,यंत्रणांची धावपळ, नेमकं काय घडलं?
वेळ 4 वाजून 46 मिनिटे; अचानक एकापाठोपाठ एक 20 अश्लील व्हिडीओ ‘स्टेटस’वर अपलोड; ठाण्याच्या पोलीस आयुक्तांचंच व्हॉट्सॲप ‘हॅक’,यंत्रणांची धावपळ, नेमकं काय घडलं?
Satara District Bank : सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा आज फैसला; भाजप की राष्ट्रवादी, कुणाचं पारडं जड? जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी महायुतीत रस्सीखेच; अध्यक्षपदावरून भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने
सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा आज फैसला; भाजप की राष्ट्रवादी, कुणाचं पारडं जड? जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी महायुतीत रस्सीखेच; अध्यक्षपदावरून भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने
Embed widget