एक्स्प्लोर

'बाबा लगीन'चं भीषण रुप! वडील लग्न लावून देत नसल्याने दोन भावांनी बापाला संपवलं, आधी बुटाने मारलं, मग चाकूने वार; छ. संभाजीनगरमधील घटना

Sambhaji Nagar Crime: वडिल मुलांच्या लग्नाचे मनावर घेत नाहीत म्हणून मुलांनी वडिलांवर चाकूने वार केल्याची घटना संभाजीनगरमध्ये घडली आहे.

छत्रपती संभाजीनगर :  वडील लग्न करुन देत नाहीत म्हणून दोन मुलांनी बापावर चाकूने वार केले. छत्रपती संभाजीनगर (Sambhaji Nagar Crime) जवळच्या वडगाव कोल्हाटी इथे ही घटना घडली. या घटनेत 48 वर्षीय संपत वाहूळ यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर पोपट वाहूळ आणि प्रकाश वाहूळ या दोघांना वाळूज पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station)  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,  संपत वाहुळ या 48 वर्षीय व्यक्ती वडगाव कोल्हाटी येथे आपल्या कुटुंबासह राहत होते. त्यांचा मुलगा पोपट  वाहुळ (28) आणि प्रकाश वाहुळ (26) ही दोन्ही मुले  एका कंपनीत काम करत होती. तर वाहुळ यांच्या नावावर शेती होती. 8 मे रोजी संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान लहान मुलगा प्रकाश कामावरून घरी आला. त्यावेळी वडील संपत वाहुळे हे घरात एकटेच होती. कामावर आलेल्य प्रकाश रागात होता. कामावरून आल्याबरोबर त्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि नंतर  कामवरील बुटाने वडिलांना मारहाण केली. त्यानंतर मोठा मुलगा पोपट देखील कामावरून आला. त्याने देखील वडिलांना आमचे वय वाढत आहे, तरी सुद्धा आमच्या लग्नाचे मनावर का घेत नाही, अशी विचारणा केली. त्यावर वडिलांनी तुम्ही दोघेही नीट वागत नाही, असे  सांगितले. 

दोन्ही भाऊ वडिलांवर तुटून पडले 

वडिलांचे उत्तर ऐकून दोन्ही मुलांचा राग अनावर झाला. मोठा मुलगा प्रकाशने जवळील चाकू काढत वडिलांवर सपासप वार केले. दोन्ही मुले बापावर तुटून पडले बापाने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला. जीव वाचवण्याासाठी ते बाहेर पळाले तर मोठ्या मुलाने पकडले आणि लहान मुलाने त्यांच्यावर वार केले. आरडा ओरड ऐकून संपत वाहुळ यांचे भाऊ रामनाथ वाहुल, संजय वाहुळ, आकाश व संदीप वाहुळ हे मदतीस धाऊन आले, त्यावेळी हा आता वाचला तर गोळी घालून मारून टाकू अशी धमकी मुलांनी दिली.  यामध्ये ते रक्तबंबाळ  झाले.  त्यानंतर संपत वाहुळ यांनाघाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रात्री 11.30 वाजता त्यांचा मृत्यू झाला.   

वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

 याप्रकरणी दोन्ही मुलांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. उपचार सुरू असतांना 23 मे रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पुढील तापास पोलीस करत आहे. या घटनेनंतर परिसरात मुलाच्या कृत्याबद्दल संताप तर वडिलांसाठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.  

हे ही वाचा :

बापलेक पोहत होते, तेवढ्या फोन आला, वडील फोनवर बोलण्यासाठी निघून गेले, पण जेव्हा परतले तोपर्यंत नियतीन डाव साधलेला!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हम्पीमध्ये इस्रायली पर्यटक आणि होमस्टेच्या मालकावर सामूहिक बलात्कार; नराधमाने त्यांच्या 3 मित्रांनाही मारहाण करून कालव्यात फेकले, एकाचा मृतदेह सापडला
हम्पीमध्ये इस्रायली पर्यटक आणि होमस्टेच्या मालकावर सामूहिक बलात्कार; नराधमाने त्यांच्या 3 मित्रांनाही मारहाण करून कालव्यात फेकले, एकाचा मृतदेह सापडला
मोठी बातमी : खोक्या भाईच्या घरावर वनविभागाची धाड, वन्यजीवांच्या शिकारीचं घबाड सापडलं, धारदार शस्त्र, जाळीसह आढळलं बरंच काही...
खोक्या भाईच्या घरावर वनविभागाची धाड, वन्यजीवांच्या शिकारीचं घबाड सापडलं, धारदार शस्त्र, जाळीसह आढळलं बरंच काही...
Jonty Rhodes Catch Video : जॉन्टी ऱ्होड्स, नाम तो सुना ही होगा! वयाच्या 55व्या वर्षी चित्त्यासारखी झेप घेत फिल्डिंग अन् अवघं स्टेडियम अवाक् झालं
Video : जॉन्टी ऱ्होड्स, नाम तो सुना ही होगा! वयाच्या 55व्या वर्षी चित्त्यासारखी झेप घेत फिल्डिंग अन् अवघं स्टेडियम अवाक् झालं
International Women's Day 2025 : केवळ अभिनयातच नाही तर व्यवसायातही 'या' सुंदरींचा बोलबाला; कमावतात कोट्यवधी रुपये; जाणून घ्या बॉलिवूडच्या बिझनेस वूमनबद्दल
केवळ अभिनयातच नाही तर व्यवसायातही 'या' सुंदरींचा बोलबाला; कमावतात कोट्यवधी रुपये; जाणून घ्या बॉलिवूडच्या बिझनेस वूमनबद्दल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Satish Bhosale Home Raid | सतीश भोसले उर्फ खोक्याच्या घरी छाप्यात सापडलं शिकारीचं घबाड, धारदार शस्त्र, जाळी, आणि बरंच काही..Rohini Khadse Letter to Presidentअत्याचारी मानसिकतेचा, बलात्कारी प्रवृत्तीचा खून करायचाय:रोहिणी खडसेBurhanpur Gold coins : Chhaaava पाहून खोदकाम, सोन्याचे शिक्के मिळवण्यासाठी धावाधावPune Crime Drunk Boy BMW VIDEO:मद्यधुंद अवस्थेत लघुशंका,अश्लील चाळे BMW कार मधून आलेल्या तरूणाचा माज

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हम्पीमध्ये इस्रायली पर्यटक आणि होमस्टेच्या मालकावर सामूहिक बलात्कार; नराधमाने त्यांच्या 3 मित्रांनाही मारहाण करून कालव्यात फेकले, एकाचा मृतदेह सापडला
हम्पीमध्ये इस्रायली पर्यटक आणि होमस्टेच्या मालकावर सामूहिक बलात्कार; नराधमाने त्यांच्या 3 मित्रांनाही मारहाण करून कालव्यात फेकले, एकाचा मृतदेह सापडला
मोठी बातमी : खोक्या भाईच्या घरावर वनविभागाची धाड, वन्यजीवांच्या शिकारीचं घबाड सापडलं, धारदार शस्त्र, जाळीसह आढळलं बरंच काही...
खोक्या भाईच्या घरावर वनविभागाची धाड, वन्यजीवांच्या शिकारीचं घबाड सापडलं, धारदार शस्त्र, जाळीसह आढळलं बरंच काही...
Jonty Rhodes Catch Video : जॉन्टी ऱ्होड्स, नाम तो सुना ही होगा! वयाच्या 55व्या वर्षी चित्त्यासारखी झेप घेत फिल्डिंग अन् अवघं स्टेडियम अवाक् झालं
Video : जॉन्टी ऱ्होड्स, नाम तो सुना ही होगा! वयाच्या 55व्या वर्षी चित्त्यासारखी झेप घेत फिल्डिंग अन् अवघं स्टेडियम अवाक् झालं
International Women's Day 2025 : केवळ अभिनयातच नाही तर व्यवसायातही 'या' सुंदरींचा बोलबाला; कमावतात कोट्यवधी रुपये; जाणून घ्या बॉलिवूडच्या बिझनेस वूमनबद्दल
केवळ अभिनयातच नाही तर व्यवसायातही 'या' सुंदरींचा बोलबाला; कमावतात कोट्यवधी रुपये; जाणून घ्या बॉलिवूडच्या बिझनेस वूमनबद्दल
गोल्डन बॅट आणि गोल्डन बॉलचा मानकरी कोण?
गोल्डन बॅट आणि गोल्डन बॉलचा मानकरी कोण?
Chhaava : छावा चित्रपट पाहिला अन् त्या किल्ल्यावर सोनं शोधण्यासाठी बायका पोरांसह अवघं गाव फुटलं!
छावा चित्रपट पाहिला अन् त्या किल्ल्यावर सोनं शोधण्यासाठी बायका पोरांसह अवघं गाव फुटलं!
Paduka Darshan Sohala 2025 : संत ज्ञानेश्वर, संत तुकारामांच्या यादीत डॉ. बालाजी तांबेंचं नाव? वारकरी संप्रदायातून तीव्र रोष, नेमकं प्रकरण काय? 
संत ज्ञानेश्वर, संत तुकारामांच्या यादीत डॉ. बालाजी तांबेंचं नाव? वारकरी संप्रदायातून तीव्र रोष, नेमकं प्रकरण काय? 
Vanuatu Citizenship : इन्कम टॅक्स नाही, क्रिप्टोवाल्यांची चांदी! तालुक्याएवढी सुद्धा लोकसंख्या नसलेला देश अन् भारताच्या कैक पटीने 'वजनदार' पासपोर्ट; ललित मोदीने निवडलेल्या टीचभर देशाची कहाणी
इन्कम टॅक्स नाही, क्रिप्टोवाल्यांची चांदी! तालुक्याएवढी सुद्धा लोकसंख्या नसलेला देश अन् भारताच्या कैक पटीने 'वजनदार' पासपोर्ट; ललित मोदीने निवडलेल्या टीचभर देशाची कहाणी
Embed widget