Buldhana News: प्रकल्प पूर्ण होऊन 25 वर्ष झालीत, अद्याप मोबदला मिळालाच नाही, बुलढाण्यात पुन्हा तीव्र जलसमाधी आंदोलन
Buldhana News: अलीकडेच बुलढाणा जिल्ह्यातील जिगाव प्रकल्प स्थळी जलसमाधी आंदोलनादरम्यान एका आंदोलकाने जलसमाधी घेतली होती. हा मुद्दा ताजा असतानाच आता उतावळी प्रकल्पग्रस्त शेतकरी आक्रमक झाले आहे.

Buldhana News: अलीकडेच बुलढाणा जिल्ह्यातील जिगाव प्रकल्प स्थळी जलसमाधी आंदोलनादरम्यान एका आंदोलकाने जलसमाधी घेतली होती. हा मुद्दा ताजा असतानाच आता जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील देऊळगाव साखरशा येथील उतावळी प्रकल्पग्रस्त शेतकरी आक्रमक झाले आहे. गेल्या पंचवीस वर्षापासून प्रकल्प पूर्ण झाला. मात्र अद्यापही मोबदला मिळाला नसल्याने वाढीव मोबदला देण्याच्या मागणीसाठी हे प्रकल्पग्रस्त येत्या 2 सप्टेंबर रोजी उतावळी प्रकल्पात कुटुंबीयांसह जलसमाधी आंदोलन करणार आहेत. जिगावनंतर आता उतावळी प्रकल्पग्रस्त जलसमाधी तीव्र आंदोलन करणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, उतावळी प्रकल्पाला 1998 साली मंजुरात मिळाली आणि 2004 साली हा मोठा प्रकल्प पूर्ण झाला. मात्र, अद्यापही प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मोबदला किंवा वाढीव मोबदला मिळाला नसल्याने हे शेतकरी आता आक्रमक झाल्याचे बघायला मिळत आहे. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आता आक्रमक पवित्रा घेत थेट जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
लोकशाहीत आंदोलन करणे गुन्हा आहे का? माझ्या पतीच्या मृत्यूस प्रशासन जवाबदार
लोकशाहीच्या नियमानुसार माझ्या पतीने जनतेच्या भल्यासाठी आंदोलन केलं. मात्र एक महिना आधीपासूनच जिल्हा प्रशासनाला माहिती देऊनही जिल्हा प्रशासनाने आंदोलनाची दखल घेतली नाही. तसेच खबरदारीच्या उपायोजना केल्या नसल्याने माझ्या पतीच्या मृत्यूस जिल्हा प्रशासन जबाबदार असल्याचा गंभीर आरोप जलसमाधी घेतलेल्या विनोद पवार यांच्या पत्नीने केला आहे. आंदोलनाच्या वेळी जर प्रशासनाने माहिती असूनही योग्य ती खबरदारी न घेतल्याने माझ्या पती जीव गमवावा लागला. लोकशाहीत ही क्रूर थट्टा असल्याचं विनोद पवार यांच्या कुटुंबियांनी म्हटलं आहे.
44 तासांनंतर 14 किमी अंतरावर सापडला मृतदेह
तर ज्या रस्त्यासाठी माझ्या वडिलांनी जीव दिला त्या रस्त्याला माझ्या वडिलांचे नाव द्यावं, अशी मागणी त्यांच्या मुलीने केली आहे. विशेष म्हणजे अद्यापही जिल्हा प्रशासनातील कुठलाही अधिकारी विनोद पवार यांच्या कुटुंबीयांच्या सांत्वन पर भेटीला गेलेला नाही किंवा कुठली मदतही त्यांना केली नाही. त्यामुळे दिवसेंदिवस या परिवारात रोष वाढत आहे. 15 ऑगस्ट रोजी जिगाव प्रकल्पस्थळे आडोळ गावच्या नागरिकांनी जलसमाधी आंदोलन पुकारलं होतं. त्यावेळी विनोद पवार हे पूर्ण नदीच्या पाण्यात उडी घेतल्याने वाहून गेले व त्यातच त्यांचा मृत्यू झाला. तब्बल 44 तासानंतर शोध आणि बचाव पथकास जलसमाधी आंदोलनकर्ता विनोद पवार याचा मृतदेह सापडला. विनोद पवार मृतदेह पूर्णा नदीत गाळात फसलेला आढळला. आंदोलन स्थळापासून 14 किलोमीटर दूर धुपेश्वर नजीक पूर्णा नदीच्या पात्रात पवारला जलसमाधी मिळाली होती.
इतर महत्वाच्या बातम्या
























