एक्स्प्लोर

शेतकऱ्याची आयडिया, जंगली करवंदाची शेती, लाखोचं उत्पन्न

यवतमाळ : सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होणारा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यवतमाळमध्ये, एका शेतकऱ्याने जंगली झाडाची पीक म्हणून शेतकऱ्यांना ओळख करुन दिली आहे. या जंगली झाड-पीकातून त्याने लाखो रुपयाचं उत्पन्न मिळवलं आहे.   गुलाबी-पांढरी फळ कोणती हा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल. पण ही फळ तुमच्या ओळखीचीच आहेत.गावाकडं जिला डोंगरची काळी मैना म्हणून ओळखलं जात तीच ही करवंदं. शेतकऱ्याची आयडिया, जंगली करवंदाची शेती, लाखोचं उत्पन्न यवतमाळच्या पुसद तालुक्यातील जनार्धन जाधव यांनी २० वर्षापूर्वी या रानमेव्याचं महत्त्व ओळखलं. जंगली समजल्या जाणाऱ्या दुर्लक्षित झाडाला त्यांनी आधी बांधावर आणि नंतर थेट शेतीत आणलं.   ७५ वर्षाचा हा तरुण या रानमेव्यापासून वर्षाकाठी १० लाखांपर्यंत उत्पन्न मिळतोय.   इथल्या वरुड गावात ६ एकरावर परसलेली गुलाबी करवंदाची बाग त्यांनी मोठ्या कष्टानं जपली आहे. इथं हिरवी आणि गुलाबी जातीची ४ हजार झाडं आहेत. मे-जून महिन्यात या झाडांना फुलं लागतात, तर पहिल्या पावसानंतर फळधारणा होते.   हे झाड जंगली असलं तरी जनार्दनराव त्यांची विशेष काळजी घेतात. झाडांच्या गरजेनुसार त्यांना सेंद्रीय खतं देतात. त्यामुळं या करवंदाचा आकार मोठा आणि एकसारखा पाहायला मिळतो. विशेष म्हणजे जंगली पीक असल्यानं याच्यावर कोणताही किड-रोग येत नाही.   करवंदाची औषधी गुणधर्म पाहता या रानमेव्याला शहरात मागणी वाढत आहे. करवंदापासून कार्बोहायड्रेट, प्रथिनं आणि क जीवनसत्व मुबलक प्रमाणात मिळतं.   करवंदांचा उपयोग मुरब्बा, जाम-जेली आणि लोणचं बनवण्यासाठी केला जातो. व्यापारी या करवंदांची थेट शेतावर येऊन खरेदी करतात.   *या ६ एकरातून जनार्दन यांना सरासरी ३० ते ३५ टन करवंदांचं उत्पादन मिळतं. *व्यापारी या करवंदांना ३० रुपये किलोचा दर देतात. *यातून वर्षाकाठी त्यांना ९ ते १० लाखांचं उत्पन्न मिळतं. *यात सर्वात मोठा खर्च मजुरीचा आहे. २ ते अडीच लाख रुपये मजुरीवर खर्च होतात. *खर्च वजा जाता सरासरी ६ ते साडेसहा लाखांचं निव्वळ नफा होतो.   जनार्दनरावांनी केलेल्या प्रयोगानंतर या भागातील अनेक शेतकरी करवंदांचं उत्पादन घेत आहेत. तर याच गावातील प्रभाकर टेकर या शेतकऱ्यांना करवंदांची रोपवाटीकाही सुरु केली आहे.   जिथं बहुतांश शेतकरी सोयाबीन आणि कापूस पिकाशिवाय इतर पिकाकडं वळत नाहीत. त्याच यवतमाळ जिल्ह्यातील जनार्दनरावांनी २० वर्षापूर्वी जंगली झाडाला माणसात आणलं. त्याला व्यावसायिक रुप दिलं. त्यांच्या या प्रयोगशीलतेमुळं पुसद तालुक्यातील अनेक शेतकरी करवंदाचा पीक म्हणून विचार करत आहेत आणि आपलं अर्थकारण सुधारण्याकडं पाऊलं टाकत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke Detained By Delhi Police: अभिजीत दिपकेंचं विमान दिल्लीत लँड झालं, पण दिल्ली पोलीस डायरेक्ट विमानात घुसले अन्... दिपके पोलिसांच्या ताब्यात
अभिजीत दिपकेंचं विमान दिल्लीत लँड झालं, पण दिल्ली पोलीस डायरेक्ट विमानात घुसले अन्... दिपके पोलिसांच्या ताब्यात
Akola News: अकोल्यात अवैध सावकारीविरोधात मोठी कारवाई, एपीएमसीसह 28 ठिकाणी छापे; संचालकही चाैकशीच्या फेऱ्यात, 11 जणांच्या तक्रारीनंतर सहकार विभागाच्या नेतृत्वात धाडसत्र
अकोल्यात अवैध सावकारीविरोधात मोठी कारवाई, एपीएमसीसह 28 ठिकाणी छापे; संचालकही चाैकशीच्या फेऱ्यात, 11 जणांच्या तक्रारीनंतर सहकार विभागाच्या नेतृत्वात धाडसत्र
Suryakumar Yadav : टीव्हीसमोर एकटाच बसून पुटपुटत होता सूर्यकुमार यादव; पत्नीने गुपचूप कॅमेरा ऑन केला अन्... IND vs WI मॅचमधील स्ट्रॅटेजी ऐकून सगळेच चक्रावले, पाहा VIDEO
टीव्हीसमोर एकटाच बसून पुटपुटत होता सूर्यकुमार यादव; पत्नीने गुपचूप कॅमेरा ऑन केला अन्... IND vs WI मॅचमधील स्ट्रॅटेजी ऐकून सगळेच चक्रावले, पाहा VIDEO
Nashik Crime News: दारूच्या नशेत मित्रच बनले वैरी! दगडी जात्याने डोक्यात वार करून वाहन चालकाला संपवलं, नाशिकमध्ये खळबळ
दारूच्या नशेत मित्रच बनले वैरी! दगडी जात्याने डोक्यात वार करून वाहन चालकाला संपवलं, नाशिकमध्ये खळबळ

व्हिडीओ

Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP Protest Delhi: आंदोलन पेटण्याआधीच दिल्ली पोलिसांनी ध्रुव राठीला उचललं, आता अभिजीत दिपकेंनाही ताब्यात घेणार? दिल्ली विमानतळावर सुरक्षेत प्रचंड वाढ
आंदोलन पेटण्याआधीच दिल्ली पोलिसांनी ध्रुव राठीला उचललं, आता अभिजीत दिपकेंनाही ताब्यात घेणार? दिल्ली विमानतळावर सुरक्षेत प्रचंड वाढ
Sanjay Raut on Delhi Protest: एक कॉकरोच सरकार को.... संजय राऊतांनी नाना पाटेकरांचा डायलॉग मारत सरकारला डिवचलं, म्हणाले...
एक कॉकरोच सरकार को.... संजय राऊतांनी नाना पाटेकरांचा डायलॉग मारत सरकारला डिवचलं, म्हणाले...
Donald Trump : सलग दुसऱ्या वर्षी शांततेच्या नोबेल पुरस्काराची हुलकावणी, डोनाल्ड ट्रम्प नॉर्वेवर भडकले... तुमचा निर्णय कधीच विसरणार नाही म्हणत थेट इशारा दिला
सलग दुसऱ्या वर्षी शांततेच्या नोबेल पुरस्काराची हुलकावणी, डोनाल्ड ट्रम्प नॉर्वेवर भडकले...
Video: शेतकरी आंदोलनाप्रमाणेच सीजेपी आंदोलनातही रस्त्यात खिळे पसरले, दिल्लीच्या सीमांवरही थेट सिमेंट बॅरिकेड, तिकडं जंतर मंतर 2.0 साठी अवघी जेनझी दिल्लीच्या रस्त्यांवर, अनेकांची धरपकड
Video: शेतकरी आंदोलनाप्रमाणेच सीजेपी आंदोलनातही रस्त्यात खिळे पसरले, दिल्लीच्या सीमांवरही थेट सिमेंट बॅरिकेड, तिकडं जंतर मंतर 2.0 साठी अवघी जेनझी दिल्लीच्या रस्त्यांवर, अनेकांची धरपकड
Delhi CJP Protest: राजधानी दिल्लीत अघोषित लॉकडाऊन! पोलिसांच्या अभेद्य चिरेबंदीला अन् छावण्यांना सुद्धा न घाबरता जेन झी बॅनरसह जंतर मंतरवर सकाळपासूनच धडकली
राजधानी दिल्लीत अघोषित लॉकडाऊन! पोलिसांच्या अभेद्य चिरेबंदीला अन् छावण्यांना सुद्धा न घाबरता जेन झी बॅनरसह जंतर मंतरवर सकाळपासूनच धडकली
Pune MPSC Protest: पुणे MPSC आंदोलनाबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल; नेमकं काय आहे कारण? शिवराज मोरेंसह या 5 नावांचा समावेश
पुणे MPSC आंदोलनाबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल; नेमकं काय आहे कारण? शिवराज मोरेंसह या 5 नावांचा समावेश
CJP Protest: दिल्लीत पोलिसांचा कडक पहारा, 75 रेल्वे रद्द, इंटरनेटही बंद; राजधानीत धडकण्यापूर्वी अभिजीत दिपके म्हणाले, 'जिथे अडवाल, तिथेच जंतर-मंतर...'
दिल्लीत पोलिसांचा कडक पहारा, 75 रेल्वे रद्द, इंटरनेटही बंद; राजधानीत धडकण्यापूर्वी अभिजीत दिपके म्हणाले, 'जिथे अडवाल, तिथेच जंतर-मंतर...'
Delhi CJP Protest: सीजेपीकडून दिल्लीत आरपारची लढाई सुरु केली असताना सोनम वांगचूक जंतर मंतर 2.0 मध्ये का सहभागी होणार नाहीत? नेमकं कारण काय सांगितलं??
सीजेपीकडून दिल्लीत आरपारची लढाई सुरु केली असताना सोनम वांगचूक जंतर मंतर 2.0 मध्ये का सहभागी होणार नाहीत? नेमकं कारण काय सांगितलं??
Embed widget