एक्स्प्लोर

Marathi Movie : हिंदी अभिनेत्रीचं मराठीत पदार्पण, चॉकलेट बॉयसोबत जमली जोडी; भूषण प्रधान-निकिता दत्ता प्रेक्षकांच्या भेटीला 

Gharat Ganpati : 'घरत गणपती' या सिनेमाच्या निमित्ताने अभिनेता भूषण प्रधान आणि निकिता दत्ता ही नवी जोडी प्रेक्षकांच्य भेटीला येणार आहेत.

Gharat Ganpati :  'घरत गणपती' (Gharat Ganpati) हा सिनेमा येत्या 26 जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने एका हिंदी अभिनेत्रीचं मराठीत पदार्पण होत आहे. अभिनेत्री निकिता दत्ता ही अभिनेता भूषण प्रधानसोबत (Bhushan Pradhan) या सिनेमाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. चित्रपटातल्या नव्या जोड्यांची चर्चा नेहमी होत असते.एखादी नवी जोडी येणार असेल तर प्रेक्षकही त्या जोडीची उत्सुकतेने वाट पाहतात.

भूषण प्रधान, निकिता दत्ता ही अशीच एक नवी जोडी ‘घरत गणपती’ या चित्रपटातून मराठी रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. पॅनोरमा स्टुडिओज सविनय सादर करत आहेत नॅविअन्स स्टुडिओ यांच्या सहकार्याने ‘घरत गणपती’ हा भव्य मराठी चित्रपट नवज्योत नरेंद्र बांदिवडेकरने दिग्दर्शित केला आहे. कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, नम्रता बांदिवडेकर, नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर, गौरी कालेलकर-चौधरी यांनी ‘घरत गणपती’ चित्रपटाची निर्मिती केली आहे.

कशी आहे भूषण-निकिताची केमिस्ट्री? 

केतन आणि क्रिती अशी या दोघांच्या व्यक्तिरेखेची  नाव आहेत. 'आम्ही नेहमीच आशयसंपन्न भूमिकांना प्राधान्य दिलं असल्याने या भूमिकेबद्दल विचारल्यानंतर आमच्यासाठी ही निश्चितच आनंदाची बाब होती. नात्यातील हळूवार क्षणांना रेखाटणारा हा चित्रपट असून ‘फ्रेश जोडी’ ही या चित्रपटाची गरज होती.त्यानुसार या चित्रपटासाठी आमची निवड झाली. एकत्र काम करताना मजा आली. प्रेक्षकांनाही चित्रपटात आमचा हा जुळलेला सूर नक्कीच दिसेल. तसेच अनुभवी कलाकारांबरोबर काम करताना आम्हाला खूप काही शिकायला मिळालं', अशी प्रतिक्रिया भूषण आणि निकिताने दिली. 

सिनेमात झळकणार हे कलाकार

या दोघांसोबत अश्विनी भावे, अजिंक्य देव, संजय मोने, शुभांगी लाटकर, शुभांगी गोखले, डॉ.शरद भुताडिया, सुषमा देशपांडे, परी तेलंग,आशिष पाथोडे, रूपेश बने, राजसी भावे, समीर खांडेकर, दिव्यलक्ष्मी मैस्नाम अशी कलाकार मंडळी या चित्रपटात आहेत. गणपती उत्सवाच्या आनंददायी सोहळ्याचं आणि घरत कुटुंबातील नात्यांच्या बंधाची गोष्ट घेऊन 'घरत गणपती' हा चित्रपट येत्या 26 जुलैला रसिकांच्या भेटीला येणार आहे. 

पॅनोरमा स्टुडिओज सविनय सादर करत आहेत नॅविअन्स स्टुडिओ यांच्या सहकार्याने ‘घरत गणपती’.  नॅविअन्स स्टुडिओ निर्मित या चित्रपटाच्या वर्ल्ड वाइड वितरणाची जबाबदारी पॅनोरमा स्टुडिओजने सांभाळली आहे तसेच चित्रपटाच्या म्युझिकची जबाबदारी पॅनोरमा म्युझिकने सांभाळली आहे.

ही बातमी वाचा : 

Bollywood Actress : लेन्स लावल्यामुळे प्रसिद्ध अभिनेत्रीच्या डोळ्यांना गंभीर दुखापत, प्रतिक्रिया देत म्हणाली, 'मला दिसणंच बंद झालं...'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ashwini Jagtap: आमदार अश्विनी जगताप 20 नगरसेवकांसह तुतारी फुंकणार, बातमी व्हायरल करणाऱ्याविरोधात भाजपची तक्रार, नेमकं काय आहे प्रकरण?
आमदार अश्विनी जगताप 20 नगरसेवकांसह तुतारी फुंकणार, बातमी व्हायरल करणाऱ्याविरोधात भाजपची तक्रार, नेमकं काय आहे प्रकरण?
Rohit Pawar : राजकारणात आल्यानंतर माझे केस पांढरे झाले, काही जण केस काळे करून तरुणांसारखे ड्रेस घालतात; रोहित पवारांचा राम शिंदेंना टोला
राजकारणात आल्यानंतर माझे केस पांढरे झाले, काही जण केस काळे करून तरुणांसारखे ड्रेस घालतात; रोहित पवारांचा राम शिंदेंना टोला
Sangli Crime : सांगलीत अल्पवयीन मुलीवर जिम चालक तरुणाचा अत्याचार; नराधम अटकेत, नागरिकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
सांगलीत अल्पवयीन मुलीवर जिम चालक तरुणाचा अत्याचार; नराधम अटकेत, नागरिकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
Mumbai  Crime: मुलुंडमध्ये महिलेची आजोबांना विनयभंगाची केस टाकण्याची धमकी, आजोबा लोकल ट्रेनसमोर जाऊन बसले अन्....
मुंबईतील धक्कादायक घटना, महिलेकडून विनयभंगाचा गुन्ह्याची धमकी, वृद्धाची लोकल ट्रेनखाली आत्महत्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Wardha Navneet Rana : फडणवीसांकडून मोदींसमोर कौतुक,नवनीत राणा यांचे डोळे पाणावलेEknath Shinde Wardha  Speech : आआरक्षण कोणी माई का लाल संपवू का शकत नाहीABP Majha Headlines 2 PM 20 Sep 2024 Maharashtra News एबीपी माझा हेडलाईन्सKisan Adhikari Candiddate captivity : किसान अधिकार अभियानाचे पदाधिकारी पोलिसांच्या नजरकैदेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashwini Jagtap: आमदार अश्विनी जगताप 20 नगरसेवकांसह तुतारी फुंकणार, बातमी व्हायरल करणाऱ्याविरोधात भाजपची तक्रार, नेमकं काय आहे प्रकरण?
आमदार अश्विनी जगताप 20 नगरसेवकांसह तुतारी फुंकणार, बातमी व्हायरल करणाऱ्याविरोधात भाजपची तक्रार, नेमकं काय आहे प्रकरण?
Rohit Pawar : राजकारणात आल्यानंतर माझे केस पांढरे झाले, काही जण केस काळे करून तरुणांसारखे ड्रेस घालतात; रोहित पवारांचा राम शिंदेंना टोला
राजकारणात आल्यानंतर माझे केस पांढरे झाले, काही जण केस काळे करून तरुणांसारखे ड्रेस घालतात; रोहित पवारांचा राम शिंदेंना टोला
Sangli Crime : सांगलीत अल्पवयीन मुलीवर जिम चालक तरुणाचा अत्याचार; नराधम अटकेत, नागरिकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
सांगलीत अल्पवयीन मुलीवर जिम चालक तरुणाचा अत्याचार; नराधम अटकेत, नागरिकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
Mumbai  Crime: मुलुंडमध्ये महिलेची आजोबांना विनयभंगाची केस टाकण्याची धमकी, आजोबा लोकल ट्रेनसमोर जाऊन बसले अन्....
मुंबईतील धक्कादायक घटना, महिलेकडून विनयभंगाचा गुन्ह्याची धमकी, वृद्धाची लोकल ट्रेनखाली आत्महत्या
टीम इंडियाला विश्वविजेता बनवणारा आता राजस्थान रॉयल्सला धडे शिकवणार; राहुल द्रविडसोबत करणार काम
टीम इंडियाला विश्वविजेता बनवणारा आता राजस्थान रॉयल्सला धडे शिकवणार; राहुल द्रविडसोबत करणार काम
Gold Rate : चार दिवसात सोन्याच्या दरात 2000 रुपयांची वाढ, सध्या सोन्याचा दर किती? 
Gold Rate : चार दिवसात सोन्याच्या दरात 2000 रुपयांची वाढ, सध्या सोन्याचा दर किती? 
Sharad Pawar : 'भुजबळ साहेबांना हात जोडून आलो...', बड्या OBC नेत्यांने पक्षप्रवेशानंतर सांगितलं अजितदादांची साथ सोडण्याचं कारण
'भुजबळ साहेबांना हात जोडून आलो...', बड्या OBC नेत्यांने पक्षप्रवेशानंतर सांगितलं अजितदादांची साथ सोडण्याचं कारण
Tirupati Laddu : तिरुपती प्रसादाच्या लाडूत आढळली प्राण्यांची चरबी; नेमके कसे तयार होतात हे लाडू? 300 वर्षांपासूनची परंपरा काय?
तिरुपती बालाजी प्रसादाचा लाडू कसा तयार होतो? 300 वर्षांपासून चालत आली पाककृती
Embed widget