Bollywood Actress : लेन्स लावल्यामुळे प्रसिद्ध अभिनेत्रीच्या डोळ्यांना गंभीर दुखापत, प्रतिक्रिया देत म्हणाली, 'मला दिसणंच बंद झालं...'
Bollywood Actress : एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या डोळ्यांना इजा झाली असून तिला आता सगळ्यांच गोष्टींसाठी अडचणी येत आहेत.
![Bollywood Actress : लेन्स लावल्यामुळे प्रसिद्ध अभिनेत्रीच्या डोळ्यांना गंभीर दुखापत, प्रतिक्रिया देत म्हणाली, 'मला दिसणंच बंद झालं...' Jasmin Bhasin suffers corneal damage, Lens mishap leaves her in pain Bollywood Actress : लेन्स लावल्यामुळे प्रसिद्ध अभिनेत्रीच्या डोळ्यांना गंभीर दुखापत, प्रतिक्रिया देत म्हणाली, 'मला दिसणंच बंद झालं...'](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/21/2d769e7d226a6cb93b31525e0e884aba1721549938903720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Jasmin Bhasin Lens Mishap: अभिनेत्री जॅस्मिन भसीन (Jasmin Bhasin) सध्या कठीण काळातून जात आहे. तिच्या डोळ्यांना गंभीर इजा झाली असल्याची माहिती सध्या समोर आली आहे. लेन्स लावल्यामुळे तिला ही दुखापत झाल्याची देखील माहिती तिने दिली आहे. इतकंच नव्हे तिला लेन्स लावल्यामुळे दिसणं देखील बंद झाल्याचं तिने सांगितलं.
जॅस्मिन 17 जुलैला एका कार्यक्रमासाठी दिल्लीत होती. तयार होत असताना तिने लेन्स लावले. ते लेन्स घातल्याबरोबरच तिचे डोळे खराब झाले. लेन्स घातल्यानंतर डोळे जळू लागले. त्यावेळी ताबडतोड डॉक्टरांकडे जाण्याची गरज होती, पण कामामुळे ती त्याक्षणी डॉक्टरांकडे जाऊ शकली नाही. तिने आधी कार्यक्रमाला जायचं ठरवलं आणि मग डॉक्टरांकडे जायचं ठरवलं.
जॅस्मिनने काय म्हटलं?
प्रतिक्रिया देताना तिने म्हटलं की, जेव्हा मी ते लेन्स घातले तेव्हा माझ्या डोळ्यांत जळजळ होऊ लागली. ते दुखू लागले आणि काही वेळाने मला दिसणंच बंद झालं. मी संपूर्ण कार्यक्रमात सनग्लासेस घातले होते. कार्यक्रम झाल्यानंतर मी डॉक्टरांकडे जायचं ठरवल होतं. डॉक्टरांनी सांगितले की, डोळ्यांचा कॉर्निया खराब झाला आहे. यानंतर डोळ्यांवर पट्टी लावण्यात आली. सध्या अभिनेत्री मुंबईत परतली असून तिच्यावर मुंबईत पुढील उपचार केले जाणार आहेत.
आता जॅस्मिनचे डोळे कसे आहेत?
तिच्या डोळ्यांवर सध्या उपचार सुरु आहे. त्यावर तिने म्हटलं की, मला अजूनही खूप वेदना होत आहेत. डॉक्टरांनी सांगितले होते की मी चार ते पाच दिवसांत बरी होईन. पण तोपर्यंत मला माझ्या डोळ्यांची योग्य काळजी घ्यावी लागेल. हे माझ्यासाठी सोपे नाही कारण मी काहीही पाहू शकत नाही. या दुखण्यामुळे मला रात्री झोपायला त्रास होत आहे.
View this post on Instagram
ही बातमी वाचा :
ऐश्वर्या-अभिषेकच्या घटस्फोटाची चर्चा, अभिनेत्रीच्या जवळच्या मित्राचं नाव चर्चेत; कोण आहे जिरक?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)